अपनी पसंद की जिंदगी


मी अहमदपूरला महात्मा गांधी महाविद्यालयात शिकत होतो, त्या वेळी प्रा. निशिकांत देशपांडे यांच्यासोबत अंबाजोगाईला जाऊन अमरला पहिल्यांदा भेटल्याचे मला आठवते. मी १९८५ साली चंद्रकांत झेरीकुंठे यांच्यासोबत ‘दैनिक लोकमन’ची सुरुवात केली. त्यानंतर पत्रकार अमर हबीबची ओळख होऊ लागली. शेतकरी संघटनेच्या चळवळीने ८६-८७ मध्ये चांगला जोर धरलेला होता. मी शेतकरी घरातून आलेलो असल्याने व शेतीतील दु:खांची अनुभूती असल्याने मी ‘लोकमन’मध्ये शेतकरी संघटनेच्या बातम्यांना प्राधान्य देत होतो. त्या विषयावर अग्रलेखही लिहीत होतो. अमर त्या काळात संघटनेत सक्रिय होता. आमची खरी ओळख झाली ती अमर लातूरला आल्यानंतर.

 अमर दैनिक ‘मराठवाडात’ लातूर आवृत्तीचा संपादक म्हणून रुजू झाल्याचे मला कळले. मी जाऊन त्याला भेटलो. त्यानंतर आमच्या नियमित भेटी होऊ लागल्या. त्यांची लेखनशैली व प्रश्नांची समज मला प्रभावित करणारी होती. आमची विचारांची दिशा एकच होती. त्यामुळे ‘वेव्ह लेंग्थं’ जुळली. अमरने काही दिवस लातुरात रूम केली होती. पुढे त्याने बसने व मोटारसायकलवर अंबाजोगाईहून ‘ये-जा’ सुरू केली.

प्रितालीची दौ़ड सायकलवर!


निडी हे रोह्याजवळचे खेडेगाव, पण त्या गावाचे नाव देशपातळीवर गाजत आहे, ते प्रिताली शिंदेमुळे. मुलगी शिकली प्रगती झाली हे इथे खरे ठरले! ती रविकांत व रंजिता शिंदे यांची कन्या. तिने प्रगतीची पावले टाकण्यास आठवीपासूनच सुरुवात केली व ती सायकलमुळे-वेगवान गतीमुळे ध्येयमंदिराकडे जात राहिली. प्रिताली सध्या बालेवाडी(पुणे) येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल, येथे फर्स्ट इयर बी.कॉम. करत आहे. तिचे पहिले ते चौथीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण निडी येथे झाले. ती पाचवीपासून मेढे या गावी शाळेत येत असे. निडीपासून मेढे गाव दोन किलोमीटर अंतरावर आहे. म्हणून वडिलांनी तिला सायकल घेऊन दिली. तिचे सायकलने येणे-जाणे रोज सुरू झाले. ती नववीपर्यंत हायस्कूलमध्ये होती. चार वर्षांत सायकलची गरज हा तिचा हळुहळू छंद व मग ध्येय बनले.

मेढा हायस्कूलच्या शिक्षकांनी तसेच प्रकाश पानसरे या तिच्या मार्गदर्शकांनी तिच्यातले गुण ओळखून तिला पुढे जाण्यास प्रोत्साहन दिले. शाळेत जाताना उशीर होऊ नये यासाठी प्रिताली वेगाने सायकल चालवत असे. ते पाहून ही मुलगी सायकलिंगमध्‍ये प्राविण्‍य मिळवू शकेल असा विश्‍वास पानसरेसरांना वाटला. त्‍यांनी त्याबाबत तिच्‍या आईवडिलांशी चर्चा केली आणि पानसरेसरांकडे प्रितालीचे प्रशिक्षण सुरू झाले. ध्येय ही जीवनाची गरज आहे हे आकलन झाल्यावर तिने ध्येयाची अर्धी मजल मारली असे पानसरे म्हणतात.

प्रकाश कामत यांचा ध्वनिमुद्रिकांचा खजिना


छंद हे सहसा 'स्वांत सुखाय' असतात. मात्र काही वेळा स्वत:च्या आनंदासाठी जोपासलेल्या छंदाची व्याप्ती एवढी रुंदावते, की त्यातून सांस्कृतिक ठेवा निर्माण होतो. ध्वनिमुद्रिकांचे संग्राहक डॉ. प्रकाश कामत यांनी आपल्या छंदातून सांस्कृतिक क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या अनोख्या छंदाची दखल घेऊन 2001 साली ‘लिम्का बुक ऑफ रेकोर्डस् ’ने त्यांचे नाव विक्रमांच्या यादीत समाविष्ट केले आहे.

अवकाश निर्मिती - समाजहिताची तळमळ


शाळेचा वर्ग चालू आहे. मुलांचे चेहरे उत्फुल्ल, त्यांच्या डोळ्यांत चमकतोय शिकण्याचा, कुतूहलशमनाचा, काहीतरी छान समजल्याचा आनंद. मुलं इतकी उत्साहात, ती जणू कोणतातरी खेळच खेळतायत! आणि खरंच, खेळच सुरू आहे तिथं. काही शिक्षक, शाळेचा एखादा कर्मचारी आणि काही मुलं असे सातजण एका ओळीत उभे आहेत. सात जणांना मिळून एक वाक्य तयार करायचंय. एक अर्थपूर्ण वाक्य. कुणालाच माहीत नाही, दुसर्‍याच्या मनात कोणता शब्द आहे. एकानं कोणतातरी शब्द उच्चारून सुरुवात करायची. पुढच्यानं त्यात भर टाकत त्यात अर्थ भरायचा. कर्ता, कर्म, सर्वनाम, विशेषण, क्रियापद असे सहा शब्द आणि शेवटी विरामचिन्ह मिळून वाक्य तयार झालं. वाक्य तयार करणारी आणि बघणारी सारी मुलं आनंदानं टाळ्या पिटू लागली. सारा वर्ग एक नवी गोष्ट शिकल्याच्या आनंदानं भरून गेला.

हरी घंटीवाला


एखाद्या गोष्टीची जनतेला जाहीरपणे माहिती देण्यासाठी पूर्वी दवंडीचा वापर केला जाई. लसीकरण मोहीम, गावातील यात्रा, जनजागरण मोहीम यांसारख्या विषयांबाबतीत नागरिकांना माहिती व्हावी या हेतूने गावागावात दवंडी देण्यात येत असे. त्या निमित्ताने लोक एकत्र येत, घडामोडीबाबत चर्चा करत, पण माहिती तंत्रज्ञानाच्या युगात ही पध्दत कालबाह्य झाली आहे. चावडीवरील गप्पा बंद झाल्या असून त्यांना दूरचित्रवाणीवरील चर्चांचे आणि इंटरनेटवरील सोशल नेटवर्किंगचे स्वरूप आले आहे. माहिती कळवण्यासाठी दवंडी देणे कमीपणाचे मानले जात आहे.

गावागावातील दवंडीचा आवाज केव्हाच बंद झाला असला तरी शिवडी, चुनाभट्टी आणि जीटीबी नगर या, मुंबईतील सहा किलोमीटर परिसरातल्या नागरिकांना दवंडीची गुंज नित्यनेमाने ऐकायला मिळते. दवंडीवाला आपल्या येण्याची वर्दी थाळीरूपी घंटा वाजवत देतो. त्याचे नाव हरिचंद भार्तुराम डिक्का. स्थानिक लोक त्याला ‘हरी घंटीवाला’ या नावाने ओळखतात. अठावन्‍न वर्षांचा हरी घंटीवाला जन्म, मृत्यू, शोकसभा, संमेलन, धार्मिक घडामोडी यांपासून ते वीज, पाणी, रस्ते, वाहतूक, आरोग्य आदी कोणत्याही विषयाची पण स्थानिकांशी संबंधित प्रत्येक बातमी तो लोकांपर्यंत पोचवतो.

त्याच्या येण्याची चाहूल लागताच स्थानिक एकत्र गोळा होतात. घंटानाद ऐकून बातमीचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करतात आणि हरी घंटीवाला आपल्या पहाडी आवाजात काही वेळातच त्यांना घडामोडीची विस्तृत माहिती करून देतो. स्थानिकांमध्ये त्या संदर्भात चर्चा रंगू लागते, पण तो मात्र आपले काम पूर्ण करण्याकरता अरुंद चाळींतून वाट काढत पुढे निघून जातो. 

समृद्ध सुखद


सुखद राणेमहाराष्ट्रातील एकशेआठ किल्ले पादाक्रांत करणारा, मुंबई-कन्याकुमारी-मुंबई अशी सायकल भ्रमंती करणारा, तरुणाईने इतिहासाचा मागोवा घ्यावा, इतिहासातून स्फूर्ती घ्यावी यासाठी रायगड जिल्ह्यात छायाचित्रांची प्रदर्शने भरवणारा व व्याख्याने करणारा सुखद राणे हा तरुण अक्षरश: स्वप्न जगतो.

उद्योगातील अभिनवतेची कास

प्रतिनिधी 30/11/2011

 मनीषा राजन आठवलेरोह्याच्या मनीषा राजन आठवले यांचे जीवन म्हणजे कर्तबगारी आणि ‘इनोव्हेशन्स’ची आच या, प्रचलित शब्दप्रयोगांचे उत्तम उदाहरण होय. त्यांनी स्वत: मायक्रोबायॉलॉजी मध्ये पदवीशिक्षण घेतले, पुण्यात पॅथॉलॉजी प्रयोगशाळेत काही महिने काम केले. त्या ‘डी.एम.एल.टी’ हा त्याच क्षेत्रातला अभ्यासक्रम करणार; त्याआधीच त्या रोह्याच्या डॉ.राजन मनोहर आठवले यांच्याशी विवाहबद्ध झाल्या. कोणत्याही मुलीची लग्नानंतरची दहा वर्षे जशी जातात, तशीच मनीषा यांचीही गेली. त्या काळात अनिष व अनुज यांचा जन्म झाला. कोणीही गृहिणी करील त्याप्रमाणे त्या ‘बर्थ डे केक’ वगैरे बनवत व घरच्या, कुटुंबाच्या आनंदात भर घालत, पण त्यांची दृष्टी असे ती पती -राजनच्या दवाखान्यात. राजन आयुर्वेदिक डॉक्टर. ते स्वत: औषधे बनवून रुग्णांना देतात. मनीषा यांनी त्यांना मदत करणे आरंभले आणि त्यातून त्यांची स्वत:ची औषधनिर्मिती सुरू झाली.

निर-अहंकारी!


उस्‍मानाबादच्या अणदूर गावी डॉ. शशिकांत व शुभांगी अहंकारी यांनी पंचवीस वर्षांपूर्वी ‘जानकी रुग्णालय’ सुरू केले ते सेवाभावनेने. त्या एका वास्तूमधून भलेमोठे सामाजिक कार्य उभे राहिले आहे. त्याचा पसारा सत्तर खेड्यांमधे आहे. परंतु त्या विस्तारापलीकडे त्यांनी आरोग्य व स्त्रियांवरील अन्याय याबद्दल जी जागृती निर्माण केली आहे आणि त्यामधून जी पर्यायी व्यवस्था उभी राहू पाहत आहे, ती महत्त्वाची!

ऋजुता दिवेकर - तू आहेस तुझ्या अंतरंगात!

प्रतिनिधी 16/11/2011

गिरगावातील चाळीत एकत्र कुटुंबात राहणं- घरचं वातावरणही रुढीप्रिय-परंपरानिष्ठ, रूइया कॉलेज मधील मराठी वातावरणातील शिक्षण..... पण नंतरच्या दहा वर्षांत ऋजुता दिवेकर नामवंत पोषक आहारतज्ञ बनून गेली. तिची ख्याती देशभर पसरली. एवढंच नव्हे तर सीएनएन या अमेरिकन वाहिनीच्या ‘हॉट लिस्ट’मधील आशियातील तिघींपैकी एक म्हणून तिला लौकिक मिळाला.

ती एकदम प्रकाशझोतात येण्याचं कारण म्हणजे, तिचं ‘डोण्ट लूज युवर माइंड, लूज युवर वेट ’ हे पुस्तक साक्षात करिना कपूरच्या प्रमुख उपस्थितीत, सेलिब्रेटी वातावरणात प्रसिद्ध झालं! करिनानं स्वत: तिथं तिच्या पोषक आहारमंत्राचं कौतुक केलं. ती म्हणाली, “ऋजुतामुळेच मी ‘साईज झिरो’ गाठू शकले.” त्यावेळी करिनाचं वजन फक्त अठ्ठेचाळीस किलो झालं होतं. ती सडपातळ झाली होती आणि तरी तिची ऊर्जा ठणठणीत होती. त्या आधी तिचं वजन अडसष्ट किलो होतं आणि ‘टशन’ नावाच्या सिनेमासाठी तिला बारीक व्हायचं होतं. शायरा नावाच्या तिच्या मैत्रिणीनं तिला ऋजुताचा नंबर दिला आणि ती ऋजुताची ‘क्लायंट’ बनली.

ऋजुतानं करिनाला तिचे आवडते पराठे, पोहे, चीज, पनीर हे पदार्थ खाण्यास मुभा दिल्यामुळे करिना खूश होती. ही वर्षा-दीड वर्षापूर्वीची गोष्ट. तेव्हापासून ऋजुता दिवेकर हे चर्चेत असणारं आणि प्रसिध्दीचं वलय लाभलेलं नाव बनलं. त्या नावाला न ओळखणारे सुशिक्षित अपवादात्मक असतील! तिला मिळालेल्या प्रसिध्दीचं कोणाला अप्रूप आहे तर कोणी तिच्या कर्तृत्वानं दिपून गेला आहे. तिची पुस्तकं वाचलेला त्यांचं गुणगान गातो, तर न वाचलेला ती मिळवून वाचण्यासाठी धडपडतो.

रायगड-राजगड यांच्या तीनशे फे-यांतील संशोधन!

प्रतिनिधी 07/11/2011

मिलिंद पराडकर यांच्या पुस्तकाचे जुलैमधील गिरिमित्र संमेलनात (2011) प्रकाशन झाले, तो क्षण त्यांच्यासाठी स्वप्नपूर्तीचा होता! ते स्वप्न त्यांच्या आईने पाहिले होते. मिलिंदने गडदुर्गांचा जो अभ्यास केला तो पुस्तकरू  पाने यावा असे तिला वाटे. तो क्षण आला पण तोवर ती मात्र राहिली नव्हती! आईला तसे वाटणे हे स्वाभाविक होते, कारण मिलिंदच्या वेडाचे, छंदाचे रूपांतर तिच्याच समोर अभ्यासात होत गेलेले तिने पाहिले होते. मिलिंदला त्याच्या या अभ्यासामधून पीएच.डी. पदवी प्राप्त झाली. मात्र त्यासाठी त्याने काही वर्षे अपार मेहनत घेतली.

मिलिंद सांगत होते, ‘या अभ्यासादरम्यान काही अभूतपूर्व माहिती माझ्या हाती आली. रायगडावरील इमारती लांबीरुंदीचे जे प्रमाण योजून रचल्या गेल्या ते सूत्र मला गवसले. ते मी साधार अन सचित्र असे प्रबंधात मांडले आहे’.

‘प्राचीन भारतीय दुर्गशास्त्र आणि हिंदवी स्वराज्याच्या दोन राजधान्या- राजगड व रायगड : एक तुलनात्मक अभ्यास’ हा त्यांचा प्रबंधविषय. मिलिंद यांचा प्रबंध फेब्रुवारी 2008 ते मार्च 2010 ह्या काळात लिहून पूर्ण झाला. त्याचे पुस्तकरूपातील प्रकाशन संमेलनात  झाले. सर्वच गिर्यारोहकांच्या दृष्टीने तो अभिमानाचा क्षण होता. गेल्या दोन-तीन दशकामध्ये गिरिभ्रमणाचे वेड खूप वाढत गेले आहे. परंतु ते छंदाच्या, हौशीच्या, किंवा फारतर सामाजिक कार्याच्या दृष्टीने महत्त्वाचे वाटत आले आहे. या विषयाचा अभ्यास फार थोड्या लोकांनी केला.