हस्ता गाव (Hasta)
हस्ता गाव हे औरंगाबाद जिल्ह्यात कन्नड तालुक्यात वसलेले आहे. कन्नडपासून पंधरा किलोमीटर अंतरावर हस्ता गाव आहे. मुख्य रस्त्यापासून अर्धा किलोमीटर आत डोंगराच्या कुशीत वसलेले आहे. गावात येण्यासाठी कन्नड तालुक्यातून एसटी मिळते. ती हस्ता स्टॉपपर्यंत येते. हस्तास्टॉप हा गावापासून अर्ध्या तासावर आहे. गावाची लोकसंख्या एक हजार नऊशेबावन्न आहे. गावात तीन मंदिरे आहेत आणि एक मस्जिद आहे. त्यात मारूती मंदिर, नरसे महाराज तसेच, गणपती मंदिर यांचा समावेश होतो. गावचे ग्रामदैवत नरसे महाराज आहे. नरसे महाराजांची प्रत्येक वर्षी मे महिन्यात यात्रा असते. यात्रा पाच दिवस असते. त्या पाच दिवसांत सुरूवातीला तमाशा असतो. त्यानंतर सर्व देवांची सोंगे पुढील चार दिवस निघत असतात.