पक्षी निरीक्षणाने ज्ञानकक्षा रुंदावल्या
करंजाळे गाव माळशेज घाटाच्या सुरुवातीला, निसर्गाच्या सानिध्यात वसले आहे. चहुबाजूंना हिरवे हिरवे डोंगर, विशाल धरणाचा सहवास आणि त्या सर्वांना छेदत जाणारा नगर-मुंबई महामार्ग... त्या महामार्गाला लागून, करंजाळे गावची छोटीशी शाळा आहे. शाळा दिसण्यास एकदम मनमोहक आहे. कौलारू इमारतीसमोर छोटेसे मैदान आहे. इमारतीच्या भोवताली सुरेख ‘वॉल कंपाऊड’ आहे. त्याला खेटून गुलमोहर, सुबाभळ आणि अशोक यांची झाडे आहेत.