रवी गावंडे - अवलिया ग्रामसेवक
28/09/2016
रवी गावंडे हा माणूस अफलातून आहे. ते रूढार्थाने ग्रामसेवक नाहीत. मात्र त्यांनी स्वीकारलेली जबाबदारी तीच आहे. ते यवतमाळ जिल्ह्याच्या नेर तालुक्यातील त्यांच्या पाथ्रड गावात शेती आणि पाणी व्यवस्थापन यांच्या संदर्भात 'आदर्श ग्रामविकास' योजनेअंतर्गत 2012 सालापासून काम करत आहेत. ते काम जेवढे विशेष वाटते, तेवढाच रवी गावंडे यांचा जीवनप्रवास सुद्धा!