बालनाट्य चळवळ आणि पारखीसर
सडसडीत बांधा, कमावलेला आवाज आणि अभिनय करण्याबरोबर अभिनय शिकवण्याचे कसब... ते पारखीसर!
पारखीसरांच्या व्यक्तिमत्त्वामधील विविध पैलू इतरांना कायमच थक्क करतात! ते लेखन, अभिनय, दिग्दर्शन, नकलांचे कसब अशा सर्व क्षेत्रांत अग्रेसर...
पारखीसर सामाजिक बांधिलकी, गुरुंबद्दल कृतज्ञता या गुणांनी युक्त.
पारखीसर विविध सामाजिक उपक्रमांत हिरीरीने सहभागी होतात. मुलांतील गुणांचा समाजाला उपयोग झाला पाहिजे, म्हणून चांगला नागरिक घडवण्याबरोबरच पथनाट्यासारख्या विविध उपक्रमांमधून ते सामाजिक भान जपतात.
त्यांचे गुरू भालबा केळकर. त्यांच्या स्मृती जागृत राहव्यात म्हणून त्यांनी भालबा केळकर स्मृती बालनाट्य स्पर्धा सुरू केल्या, त्यास बावीस वर्षे झाली. पारखीसरांनी नाट्यछटाकार दिवाकर यांच्या स्मृती जपण्यासाठी दिवाकर स्मृती नाट्यछटा स्पर्धा सुरू केल्या. त्याला एकवीस वर्षे झाली.