मरणोत्तर निःशुल्क सेवा!


ज्‍योती शेट्ये

   वाढत्‍या महागाईने सर्वसामान्‍य जनतेचे जगणे नकोसे केले आहे. सरकार महागाईवर नियंत्रण ठेवण्‍यात कमी पडत आहे. या पार्श्‍वभूमीवर नुकत्‍याच घडलेल्‍या दोन घटनांमधील विरोधाभास  ज्‍योती शेट्ये यांनी मांडला आहे. रूग्‍णावर उपचार करण्‍यासाठी डॉक्‍टरने वेळेवर पोहचू नये, मात्र त्‍याच्‍या अंत्‍ययात्रेला मूठमाती देण्‍यास न चुकता यावे, अशी सध्‍या सरकारची वर्तणूक असल्‍याचे दिसते.

ज्‍योती शेट्ये

     10 ऑगस्‍ट 2011 (लोकसत्‍ता) – डोंबिवलीच्‍या महापौर वैजयंती गुजर यांच्‍या पुढाकाराने येथील स्‍मशानभूमीत एल. पी. जी. वर चालणारी विद्युतदाहिनी सुरू करण्‍यात आली आहे. या दाहिनीत प्रत्‍येक मृत व्‍यक्‍तीच्‍या अंत्‍यविधीसाठी पालिकेकडून सुमारे 1,750 रूपये खर्च केले जातात. या शवदाहिनीतील सेवा पालिकेकडून विनाशुल्‍क उपलब्‍ध करून देण्‍यात आली आहे. ही सेवा विनाशुल्‍क असल्‍याने नागरिकांकडून ती पसंत केली जात असल्‍याचे उपअभियंत्‍यांकडून सांगण्‍यात आले.

     12 ऑगस्‍ट 2011 (लोकसत्‍ता) – वाढत्‍या महागाईला कंटाळून ठाणे येथील भीमराव भंडारे या साठ वर्षांच्‍या गृहस्‍थाने गळफास घेऊन आत्‍महत्‍या केली. गळफास घेण्‍यापूर्वी त्‍यांनी लिहीलेल्‍या चिठ्ठीत ‘आपण महागाईला कंटाळून आत्‍महत्‍या करत आहोत. याला सरकार जबाबदार आहे’ असे म्‍हटले आहे.

     दिवसेंदिवस जगणे महाग होत असतानाच ‘सरकारच्‍या कृपेने’ मरणोत्‍तर निःशुल्‍क सेवा उपलब्‍ध झाली आहे. महागाईला आळा घालून जनतेचे जीतेपणीचे खर्च कमी करण्‍यात सरकार अपयशी ठरत असले, तरी सर्वसामान्‍यांच्‍या मरणानंतरचे खर्च कमी करण्‍याचा ‘स्‍तुत्‍य’ प्रयत्‍न सरकारने सुरू केला आहे. सरकारने डोंबिवलीप्रमाणे ही सेवा सर्वत्र उपलब्‍ध करून द्यावी.

ज्‍योती शेट्ये, मोबाईल – 9830737301, ईमेल - jyotishalaka@gmail.com

{jcomments on}

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.