सरकारचे डोके (!)

प्रतिनिधी 19/04/2012

अण्‍णा हजारेंना सरकारकडून अटक करण्‍यात आल्‍यानंतर देशभरात निषेध व्‍यक्‍त केला जाऊ लागला. त्‍यांना संविधानाने दिलेला निषेधाचा अधिकार सरकारकडून नाकारण्‍यात आला. ही सगळी परिस्थिती पाहता डॉ. रविन थत्‍ते यांना टिळकांनी लिहीलेला ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?’ या अग्रलेखाचे स्‍मरण झाले. ही सर्व परिस्थिती पाहिल्‍यानंतर आपल्‍यात आणि इजिप्‍तमध्‍ये काय फरक उरला? असा सवाल ते करतात. तथापी या अटकेमधूनही काही चांगले घडेल, अशी आशाही त्‍यांन वाटते.

स्‍वातंत्र्यूपर्व काळात लोकमान्‍य टिळकांनी ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?’ या मथळ्याखाली अग्रलेख लिहिला होता. आजच्‍या सगळ्या घडामोडींना हा अग्रलेख चपखल बसेल. मला असे वाटते, की हे सरकार कपिल सिब्‍बल आणि मनीष तिवारीसारख्‍या धटिंगणांच्‍या हातात गेले आहे. दिग्विजय सिंह तर वेडाच आहे! मनमोहनसिंह हतबल, सोनिया गांधी आजारी, राहुल गांधी निष्‍प्रभ आणि मुखर्जी व चिदंबरम वेड पांघरून पेडगावला गेले आहेत. अण्‍णा हजारे यांना झालेल्‍या या अटकेतून काहीतरी चांगलेच निष्‍पन्‍न होईल असा माझा विश्‍वास आहे. मात्र वर्तमान परिस्थिती पाहिल्‍यानंतर आपल्‍यात आणि इजिप्‍तमध्‍ये किंवा सिरियामध्‍ये काय फरक उरला हेच समजेनासे झाले आहे?

डॉ.रविन थत्‍ते, प्‍लास्टिक सर्जन, भ्रमणध्वनी: 9820523616

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.