ग्रंथोपजीवी

ग्रंथोपजीवी


शिळेतील अहिल्या
लेखक  - अनुराधा फाटक
स्त्रियांच्या दगडबनून गेलेल्या मनातून असंख्य प्रश्नांचे घुमारे फुटतात, इतरांच्याही मनात प्रश्न निर्माण करतात. अशाच काही अहिल्यांच्या प्रश्नांची ही कहाण्या.
प्रकाशक - अमोल पाटील
किंमत -  110/-

 

 


वन नाईट@द कॉल सेंटर

चेतन भगत (अनुवाद - सुप्रिया वकिल)

Five Point Someone नंतर चेतन भगत ह्यांच तितकच चर्चेत असलेलं हे पुस्तक वाचकांना निश्चितच निराळ्या अनुभवविश्चाची सफर घडवेल. नर्मविनोदाचा शिडकावा देणारी ही कांदबरी सद्यास्थितीवर भेदकपणे प्रकाश टाकत वाचकाना नक्तीच अंतर्मुख करेल.

मेहता प्रकाशन

किंमत 220/-

 

 

 

3. अग्निबाणाचा इतिहास

निरंजन घाटे

पुरागापासून आग्निबाणांचा उल्लेख आढळतो. चंद्रावर पाठवले गेलेले अग्निबाण सर्वात शक्तीशाली होते. अग्निबाणाचा इतिहास मराठी वाचकांसमोर प्रथमच आला आहे.

दिलीपराज प्रकाशन

किंमत - 100/-

 

4. उपाय साधेसोपे

शशी देशपांडे

एक गानप्रेमी आणि एक कम्यूनिस्ट अशा दोन अतिशय वेगळ्या स्त्रियांच्या जीवनाचा वेध घेणारी ही कांदबरी, कथानक विस्कळीत भासावा इतक गुंतागुतीचे नातेसंबध असलेल्या पात्रांच्या पसा-यातून सुसंगत कथा विगत नेण्याचा आणि मानवी भावविश्वाच खोल दर्शन घडवण्याचं शशी देशपांडे यांचे कौशल्य कादंबरीत प्रत्ययाला येत.

पेंग्विन बुक्स

किंमत - 150/

 

5. अडीच अक्षरे

नरेंद्र बोडके

प्रेम हा अडीच अक्षरी शब्द ! जो माणसाच अवघ आयुष्य व्यापक रहातो. त्या प्रेमाच्या वेगवेगळ्या छटा जाणून घेण्याचा प्रयत्न करणारे लेखन. प्रेमाचा विश्वव्यापी स्वरुप लक्षात आणून द्याव म्हणून सुखात झालेली वर्तमानपत्रात सदर प्रसिद्ध होत असे. ही अडीच अक्षर आता पुस्तक रुपाने फुलली आहेत.

वसंत बुक स्टाँल

किंमत - 150/-