जलतज्ज्ञ राजेंद्रसिंग यांची काही उद्घोषिते
• खरे पाहू गेल्यास, दोनशे मिलिमीटर पाऊससुद्धा सर्वसाधारण जीवन जगण्यासाठी पुरेसा आहे. महाराष्ट्रात तर त्या मानाने भरपूर पाऊस पडतो. इतके असूनसुद्धा वारंवार दुष्काळ लांछनास्पद आहेत.
• महाराष्ट्रातील पडत असलेले दुष्काळ हे नैसर्गिक नसून मानवनिर्मित आहेत. पुरेसा पाऊस पडत असूनसुद्धा त्या पावसाचे योग्य संवर्धन न केल्यामुळे अशा महाराष्ट्राला दुष्काळांना तोंड सारखे द्यावे लागत आहे.
• महाराष्ट्रातील जलसाठ्यांवर सातत्याने आक्रमण होत आहेत. सर्व जलसाठ्यांची योग्य नोंद ठेवून त्यांच्या सीमा रेखांकित करण्याची नितांत गरज आहे. तसे केले नाही तर कित्येक जलसाठे काळाच्या ओघात गायब झालेले आढळतील.
• महाराष्ट्राचे जलधोरण हे जनतेला हितकारी नसून कंत्राटदारांच्या नफ्याला बळकटी देणारे आहे. त्यामुळे सर्वसामान्य समाज पाण्यापासून वंचित आहे.
• महाराष्ट्रातील ऊस हे पीक घेण्याचा अट्टाहास अनाकलनीय आहे. ते एकटेच पीक विविध धरणांद्वारे जमा केलेले पाणी वापरून टाकते आणि बाकीच्या पिकांकडे साहजिकच दुर्लक्ष होत आहे.
• सध्याचेच धोरण राबवण्याचा प्रयत्न केला तर लवकरच महाराष्ट्राचे वाळवंटात रूपांतरण झाल्यास राहणार नाही.
• महाराष्ट्रातील पारंपरिक जलस्रोतांकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे परंपरागत जलसाठे नष्ट होत चालले आहेत व त्यामुळे उन्हाळ्याच्या काळात पाण्याचे मोठे दुर्भीक्ष्य जाणवत आहे.
• महाराष्ट्रातील चौऱ्याऐंशी टक्के शेती ही जमिनीतील पाणी उपशावर आधारित आहे. तो भूजल उपसा महाराष्ट्राला दीर्घकाळात संकटाकडे नेल्याशिवाय राहणार नाही.
• पाण्याबद्दल समाजात जनजागृती आवश्यक आहे. त्यासाठी जलसाक्षरता आंदोलन मोठ्या प्रमाणात राबवण्याची गरज आहे. विविध माध्यमांचा वापर करून जलसाक्षर समाज निर्माण करणे ही काळाची गरज आहे.
हे ही लेख वाचा-
शाश्वत विकासासाठी, पाण्याची शाश्वती शक्य आहे का?
देशहितासाठी जनतेचा जाहीरनामा
लेखी अभिप्राय
All man are including in our social work.
उसाच्या पाण्यासाठी वेगळा टॅक्स लावावा.
Add new comment