हलगी नावाचे चर्मवाद्य

प्रतिनिधी 10/05/2019

-halgiहलगी हे पारंपरिक वाद्य आहे. त्याचा समावेश चर्मवाद्यात होतो. हलगी वादनात विशिष्ट ठेका (ताल) माणसाला नृत्य करण्यास भाग पाडतो. अलिकडच्या काही वर्षांमध्ये डीजे आणि बँजो वगैरेंमुळे हलगीवादनाची कला दुर्लक्षित होत आहे; तरीही गणेशोत्सव, यात्राकाळात आणि विविध जयंती उत्सवांच्या मिरवणुकांमध्ये हलगी वाद्य वाजवले जाते. हलगी हे डफासारखे पण त्याच्याहून लहान असते. त्याचा आकार सामान्यपणे ताटाएवढा असतो. लाकडी किंवा लोखंडी पट्टीचे कडे एका बाजूने कातड्याने मढवून हलगी बनवतात. हलगीने वाद्य मेळ्यात कडाक्याचा रंग भरतो. ती छातीवर डाव्या बाजूला उभी धरून तिच्यावर उजव्या हाताच्या थापा देत ती वाजवतात. हलगीला ‘कडे’ असेही म्हणतात. तमाशाचा मुख्य नायक ती वाजवतो म्हणून त्याला ‘कडेकरी’ म्हणतात. हलगीवादन श्रवणामुळे मनाला व शरीराला प्रसन्नता मिळते. हलगी हे वाद्य वापरण्यास हलकेफुलके असून, वादनासाठी त्यावर विशिष्ट टिपरू किंवा बारीक छोट्या लवचीक सड्या वापरल्या जातात. गावातील हलगीवादनाचे ग्रूप किंवा वाद्यवृंद यांना इतर गावांतून विशिष्ट कार्यक्रमांसाठी निमंत्रित केले जाते. त्यावेळी ते त्यांचे मानधन ठरवून त्या कार्यक्रमासाठी त्यांची ‘सेवा’ पार पाडत असतात.

-प्रतिनिधी
 

लेखी अभिप्राय

लेख वाचून हलगीचा आवाजच कानात घुमायला लागला.

सुरज शिंदे10/05/2019

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.