मकरसंक्रातीचा सण फलटण आणि माण तालुक्यांच्या सीमेवरील सीतेच्या मंदिरात साजरा करण्याची पद्धत न्यारीच आहे ! महिला सीतेची आरती करून, मकर संक्रांतीचे सुगड तिच्या पायाशी अर्पण करून मकर संक्रातीचा सण साजरा करतात. महाराष्ट्राच्या विविध भागांतून हजारो महिला सीतेला सौभाग्याचे वाण देण्यासाठी तेथे येतात. ते सीतामाई देवस्थान सह्याद्रीच्या निसर्गरम्य डोंगररांगांमध्ये आहे. तो डोंगर सीतामाईचा डोंगर म्हणूनच ओळखला जातो...
फलटणला महानुभाव पंथीयांची ‘दक्षिणकाशी’ म्हणून ओळखले जात असे. तेथे महानुभाव पंथियांची अनेक मंदिरे आहेत. महानुभाव साहित्यात फलटणचा उल्लेख ‘पालेठाण’ म्हणून केलेला आढळतो. फलटणचे ‘जब्रेश्वर मंदिर’ आजही राजवाडा व श्रीराम मंदिर यांच्या जवळ रस्त्याच्या मधोमध उभे आहे...
शेवगाव तालुक्याहच्या नागलवाडी या गावचे काशी केदारेश्वर हे महादेवाचे मंदिर ऋषी काशिनाथबाबा यांच्या वास्तव्याने पावन मानले जाते. ते ठिकाण निसर्गरम्य वातावरणामध्ये आहे. चहुबाजूंनी डोंगर व मध्ये दरी; झाडे-वेली यांनी वेढलेला परिसर मन मोहून टाकतो ! मंदिरही सुबक आहे. जवळच पाण्याचे तळे आहे...
किन्होळा हे हे गाव डोंगराच्या पायथ्याशी वसलेले आहे. या गावामध्ये जवळजवळ पस्तीस व्यक्ती शिक्षक या पदावर असून ‘शिक्षकांचे गाव’ अशी या गावाची ख्याती पंचक्रोशीत आहे. मात्र असे शैक्षणिक वातावरण गावात कशामुळे निर्माण झाले हे सांगता येत नाही. पण यांतील बरीच घरे दोन पिढ्या तरी शिक्षकी पेशात आहेत. गावाला सांस्कृतिक परंपरा लाभली आहे...
बोरी अरब हे गाव यवतमाळ जिल्ह्याच्या दारव्हा या तालुक्यात येते. तेथील नदीला अडान नदी म्हणतात. त्या नदीमध्ये असलेल्या एका ठिकाणाला ‘लगीनबुडी’ असे म्हणतात. त्या गावचे माठ आणि चहा प्रसिद्ध आहेत. तेथे कापसाचा कारखानाही आहे...
दावलवाडी हे गाव जालना जिल्ह्याच्या बदनापूर या तालुक्यात आहे. ते जालन्यापासून आठ किलोमीटर तर बदनापूर या तालुक्याच्या केंद्रापासून दहा किलोमीटर अंतरावर वसले आहे. या गावाने आर.आर. पाटील ग्रामविकास मंत्री असताना, ‘संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियाना’त जिल्ह्यात 2002 मध्ये दुसरा क्रमांक तर पुढच्याच वर्षी 2003 मध्ये पहिला क्रमांक मिळवला होता. गावाला राष्ट्रपती पुरस्कार 2000 ते 2005 या काळातील उल्लेखनीय कामाबद्दल मिळालेला आहे...
बदनापूर हा जालना जिल्ह्यातील एक तालुका. बदनापूर हे जालन्यापासून वीस किलोमीटर अंतरावर आहे. जालना जिल्हा मोसंबी फळासाठी राज्यामध्ये प्रसिद्ध आहे. त्यामुळे बदनापूर येथे मोसंबी संशोधन केंद्र आहे. बदनापूर येथील कृषी संशोधन केंद्रात कडधान्याच्या वेगवेगळ्या जातींची बियाणी यांबाबत संशोधन चालते. त्या संशोधन केंद्राचे नाव कृषी क्षेत्रात अग्रक्रमाने घेतले जाते...
ओळगावचे वयोवृद्ध आजोबा लक्ष्मण मांजरेकर खूष आहेत, कारण गेली चाळीसेक वर्षे गावात दारूबंदी आहे. त्यामुळे तक्रारींचं आणि भांडणांचं प्रमाण जवळपास नाहीसं झालं आहे. गावात कमालीची शांतता आहे.” ओळगावात दारूबंदीने आणि ग्रामस्थांच्या एकीने तेथे मोठी क्रांती घडवली आहे. दापोली तालुक्यातील ओळगाव रस्त्यापासून थोडे आत झाडीत लपलेले आहे. तेथे ऊसाची शेती केली जाई...
कोळथरे हे स्वच्छ आणि सुंदर समुद्रकिनाऱ्यासाठी प्रसिद्ध असलेले दापोली तालुक्यातील गाव ! तेथील समुद्र हा पर्यटकांच्या आकर्षणाचा भाग आहे. ते गाव दाभोळमधील बुरोंडीच्या पुढे मुख्य रस्त्यापासून खाली, समुद्रकिनारी वसलेले आहे. तेथील पंचनदी ही छोटीशी नदी जेथे समुद्राला मिळते तेथील परिसर निसर्गरम्य आहे. भारताच्या क्रिकेट संघातील एके काळचा जलदगती गोलंदाज अजित आगरकर यांचे कोळथरे हे गाव...
माझ्या मुरुड गावच्या गावकऱ्यांची भाषा अगदी रोखठोक ! ते बोलताना नाकाचा वापर करतात की काय, असे ऐकणाऱ्याला वाटेल. त्यांनी बरेचसे शब्द मोडून घेऊन मुखात बसवलेले आहेत. म्हणजे घ्यायचं, द्यायचं, करायचं असे म्हणायचे असेल तर ते घैचं, दैचं, कराचं असे बोलतात...