महाराष्ट्रातल्या गावखेड्यांपासून आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पसरलेले मराठी उद्योजक, खेळाडू, कलाकार, विचारवंत, अभ्यासक, संशोधक अशा अनेक कर्तृत्ववान व्यक्तींची माहिती येथे प्रसिद्ध केली जाते.
सर्वसामान्य मुस्लिम मुलीला आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी, कित्येकदा घरातल्या माणसांशी, समाजातील माणसांशी, कडवी झुंज द्यावी लागते. तशीच झुंज मुंबईला जोगेश्वरीत राहणा-या इर्फानालाही द्यावी लागली....
जंगलातून वाट फुटेल तिकडे भटकणे; निसर्गाचे - त्यातील प्राणी-पक्षी-वनस्पती यांचे निरीक्षण करणे; हिमालय कुमाऊंच्या टेकड्या-लेह-लडाख अशा ठिकाणी ट्रेकला जाणे, बाईकवरूनही अनेक सफरी करणे, निसर्गातील...
गौरी चितळे माहेरच्या स्मिता लोंढे! त्यांचे शिक्षण दहावी पास, एवढेच. त्यांनी आईवडिलांना आर्थिक मदत म्हणून नर्सिंगचा कोर्स पूर्ण करून हॉस्पिटलमध्ये नोकरी स्वीकारली. त्यांचे गाव...
डॉ.जी.व्ही. ऊर्फ आप्पासाहेब मंडलीक यांचे शिक्षण मुंबईच्या ग्रँट मेडिकल कॉलेजमधून झाले. त्यांनी त्यांचा वैद्यकीय व्यवसाय एम बी बी एस झाल्याबरोबर, 1939 साली सुरू केला. डॉ. जी.व्ही. हे दापोलीतील पहिले एम बी बी एस डॉक्टर होत. डॉ. जी.व्ही. यांचा विवाह पुण्याच्या शकुंतला गोखले यांच्याशी 1939 सालच्या डिंसेबर महिन्यात झाला. तो प्रेमविवाह होता. दोघेही एकमेकांना ओळखत होते. लग्नानंतर त्या शैलजा ऊर्फ शैला मंडलीक झाल्या. कोकणासारख्या ठिकाणी त्या काळी वैद्यकीय व्यवसाय करणे खूप कठीण होते. दापोली हे जरी तालुक्याचे ठिकाण असले तरी खेडेगावासारखे होते. डॉक्टर आप्पांना सायकलने वा पायी जाऊन त्यांचे रुग्ण तपासावे लागत होते...
भारतातील पखवाजवादकांचे पहिलेच पखवाजपर्व भोपाळमध्ये 2013 साली आयोजित करण्यात आले होते. त्या कार्यक्रमात पखवाजवादन करणारी गार्गी ही पहिली महिला कलाकार होती. पखवाजपर्व धृपद संस्थान भोपाळ न्यास आणि डीडी भारती यांच्या वतीने भरले होते. गार्गी देवदास शेजवळ ही महाराष्ट्राची. गार्गी मुंबई, पुणे; तसेच, भारतातील विविध ठिकाणी तिच्या गुरूंसोबत पखवाजवादन करत असते.
जिल्हा परिषदेच्या या शाळेत प्रवेश मिळावा म्हणून यंदा चार हजार विद्यार्थी वेटिंग लिस्टमध्ये होते. भारतातील पहिली आणि जगातील तिसरी 'झिरो एनर्जी स्कूल' म्हणून वाबळेवाडीच्या...
अनंत फंदी हे संगमनेरचे. पूर्वजांचा धंदा सफारीचा, गोंधळीपणाचा, भवानीबाबा नामक साधूने फंदीला धोंडा मारला. तेव्हापासून त्याला कवित्वस्फूर्ती झाली! ‘फंदी अनंत कवनाचा सागर’ असे त्या...
गेली सुमारे तीन दशके भारत देश उदारीकरण-खाजगीकरण-जागतिकीकरण ह्या संक्रमणातून जात आहे. ‘स्पर्धात्मकता’, ‘विदेशी गुंतवणूक’, ‘खाजगी क्षेत्राला प्राधान्य’ ही दैनंदिन व्यवहाराची परिभाषा बनली आहे. भारतीय...
सुहास बहुळकर हे उत्तम व्यक्तिचित्रकार म्हणून विख्यात आहेत; तसेच संशोधक-लेखक म्हणूनही. त्यांचा हे करावे, की ते असा पेच गेली दोन-तीन दशके चालू होताच; तो कामाच्या दडपणाखाली आपोआप सुटला आणि ते संशोधन-लेखनाच्या नादी गेली काही वर्षे लागले ते लागलेच...
नागपूरचे रवी आणि अनुपमा सहस्त्रबुद्धे अमेरिकेला ग्रीनकार्ड घेऊनच 1992 साली गेले. तेव्हा त्यांचे दोन्ही मुलगे लहान होते. रवीची इंजिनीयर म्हणून करियर उत्तम होती. पुण्यात...