मी पाहिलेले दैनिकांचे संपादक

रवींद्र पिंगे यांचा दैनिकांच्या संपादकांबद्दलचा जुना लेख. त्यात ते म्हणतात, दैनिकांची वाट पाहणाऱ्यांपैकी मी नव्हेच नव्हे. दैनिके चार दिवस दिसली नाहीत तर माझे मन बिलकुल अस्वस्थ होणार नाही. अनेकदा, वर्तमानपत्र घरात येऊनही मी इतर व्यापांमुळे त्यांच्याकडे पाहतसुद्धा नाही. गेल्या अर्धशतकात मी जी काही वर्तमानपत्रे वाचली, त्यात तीन संपादकांची शैली मला अप्रतिम वाटली: फ्रँक मोराईस, रावसाहेब पटवर्धन आणि ग. प्र. प्रधान. त्यांच्यात अभिजात असा खानदानीपणा आहे. भाषाप्रभुत्व असामान्य आहे. विचारांना नैतिक अधिष्ठान आहे. आविष्कार सौम्य आहे. आवाहन आहे. आव्हान नाहीच आणि आग्रहाचे नावच नाही. तसे घरंदाज लेखन मला भुरळ घालते...

कथा, सामा वेलादीच्या पराक्रमाची ! (The story of Adiwasi youth who got British Albert...

6
राज्यातील अतिमागास, दुर्गम व नक्षलग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात ‘जॉर्जपेठा’ व ‘ग्लासफर्डपेठा’ नावाची दोन गावे आहेत. ‘जॉर्जपेठा’ हे नाव ब्रिटिश वन अधिकारी ह्यू शॉ जॉर्ज यांच्या नावावरून पडले आहे. ‘जॉर्ज’ यांच्या जीवनातील ही सत्यकथा रोमहर्षक आणि तितकीच चित्तथरारक आहे. ती 1924 च्या सुमारास, म्हणजे शंभर वर्षांपूर्वी घडली. ती सत्यकथा गडचिरोली (विभाजनपूर्व चांदा) जिल्ह्यातील अतिदुर्गम, घनदाट जंगलातील गर्द, निबिड अरण्यात अशा प्रकारे गुडूप झाली की तिचा पुढे मागमूसही उरला नाही ...

महाराष्ट्राचे काव्यतीर्थ – केशवसुत (Keshavsut)

0
'झंकारीत वीणा इथे प्रगटली ही शालिनी शारदा, नादाने भुलली इथेच रमली ही मानिनी संपदा' महाराष्ट्राचे काव्यतीर्थ - केशवसुत स्मारक नवीन पिढीच्या स्मृतीत, जुन्या पिढीतील कर्तृत्ववान लोकांच्या...

बहनो और भाइयो… (Ameen Sayani)

अमीन सायानी यांचे 21 फेब्रुवारी 2024 रोजी निधन झाले. पन्नास वर्षांहून अधिक काळ ज्या आवाजाची जादू या देशातल्याच नाही तर जगभरातल्या भारतीय चित्रपट संगीतप्रेमींच्या हृदयावर चालली ज्या आवाजाने चार पिढ्यांच्या कानांचीच नाही तर मनांचीही मशागत केली आहे. भारतीय चित्रपट संगीत हे मनामनांना जोडणारा अद्भुत धागा आहे.एक्याण्णव वर्षांचे समृद्ध आयुष्य जगून अमीन सायानी गेले. रफी-लता-किशोर या जादुई आवाजांइतकाच त्यांचा जादूई आवाज श्रोत्यांच्या कानात गुंजत राहील...
_fandi

फंदी, अनंत कवनाचा सागर! (Fandi, Sea of ​​Infinite Kavana)

अनंत फंदी हे संगमनेरचे. त्यांच्या पूर्वजांचा धंदा सराफीचा, गोंधळीपणाचा; भवानीबाबा नामक साधूने फंदीला धोंडा मारला, तेव्हापासून त्याला कवित्वस्फूर्ती झाली! शाहीर होनाजीने ‘फंदी, अनंत कवनाचा...

साहित्य सहवास व वसईतील सांस्कृतिक वातावरण

0
फादर दिब्रिटो हे त्र्याण्णव्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष हा मोठा मननीय योग आहे. त्यामुळे मराठी साहित्याच्या विशालतेची ग्वाही मिळते. फादर स्टीफन्स, ना.वा. टिळक, फादर...