अलिबाग माझे गाव
अलिबाग हे पुण्यामुंबईजवळचे समुद्र किनाऱ्यावरील गाव. अलीकडच्या काळात ‘टुरिस्ट प्लेस’ म्हणून गाजलेले. ते दोन दिवसांच्या ट्रिपसाठी उत्तम मानले जाते. मुंबईहून तेथे ‘रोरो बोट सर्व्हिस’ने जाता येत असल्याने अलिबागचे पर्यटन केंद्र म्हणून महत्त्व अधिकच वाढले आहे. पण अलिबागला मोठा इतिहास आहे. शिवाजीराजे व आंग्रे सरदार यांच्या कथाकहाण्या प्रसिद्ध आहेतच, पण ज्यू लोक दोन हजार वर्षांपूर्वीपासून येथे राहत आले आहेत. त्यांची जुनी घराणी आहेत आणि आता संबंध इस्त्रायलशी जोडलेले आहेत. बरेच लोक तिकडे स्थलांतरित झाले आहेत. अलिबागचा पांढरा कांदा हे तेथील वैशिष्ट्यपूर्ण पीक आहे. अलिबागला ब्रिटिशकाळात हवामान केंद्र होते. ते तत्कालीन कुलाबा (आता रायगड) जिल्ह्याचे मुख्य शहर होय. तेथून जिल्ह्याचे सर्व व्यवहार होतात...
कारिट – नरकासूराचे प्रतिक
कारिट हे भारतात सर्वत्र आढळणारे रानवेलीचे फळ आहे. या फळास कारिंटे, कार्टे, चिरट, चिरटे, कोर्टी, चिर्डी, चिड्डी अशी अनेक नावे आहेत. खेडेगावात या फळाला...
लक्ष लक्ष प्रकाशफुले!
लक्ष लक्ष काजवे... नभोमंडळातील तारकादळच जणू धरतीच्या भेटीला आले आहे! आपल्या चहुबाजूंला पसरलेल्या मिट्ट काळोखाच्या साम्राज्यात 'अग्निशिखा' हे विशेषण सार्थपणाने मिरवणार्या काजव्यांचा चमचमाट लयबद्ध...
कयाधू नदीकाठावर निसर्ग बहरला
हिंगोली जिल्ह्यातील कयाधू नदीच्या काठावरील तीनशेसतरा हेक्टर जमीन कुरणक्षेत्र म्हणून संरक्षित केली गेली आहे. ते जवळ जवळ बारा गावे व त्यांतील लोक यांच्या प्रयत्नातून...
हिवरे बाजार गावाचा कायापालट
पोपटरावांनी पाणलोट क्षेत्र विकासाच्या कामाला सुरुवात करण्यापूर्वी राज्य सरकारने आदर्श गाव योजना सुरु केली होती. त्यामुळे त्यांच्या नियोजित कामासाठी लागणारा निधी कोठून आणायचा, ती...
सांगलीचे सागरेश्वर अभयारण्य
सांगली जिल्ह्यात कराडपासून जवळ कृष्णा नदीच्या खो-यात असलेले सागरेश्वर हे निसर्गरम्य ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. भरपूर पडणारा पाऊस, धुकट वातावरण, वाहणारे गार वारे, हिरवागार...
मराठवाड्यातील पुरातन – श्री सिंदुरात्मक गणेश
सिंधुरासुराचे मंदिर शेंदुरवादा या गावी (तालुका गंगापूर, जिल्हा औरंगाबाद) आहे. सिंधुरासुराचा वध व गणेशाचे स्वतःचे वाहन मूषक/उंदीर यास दिलेली मुक्ती या दोन प्रमुख पौराणिक...
करवीरनगरीचा सूरज आणि युद्धकला
रस्त्यावर पंच्याऐंशी लिंबे रांगेत लावून ठेवलेली होती. उपस्थित प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. उत्सुकता होती. तेवढ्यात सूरजचे तेथे आगमन झाले. त्याने हातात दांडपट्टा घेऊन शरीराची...
शास्त्री हॉल नावाचे शंभर वर्षांचे कुटुंब
शास्त्री हॉल ही दक्षिण मुंबईतील मध्यमवर्गीर्यांची जुनी वसाहत आहे. जुन्या भाषेत चाळींची वाडीवस्ती. मुंबईत ग्रँट रोडला नाना चौकापासून शंभर पावलांवर ती वस्ती आहे. त्या...
गिरवीचा गोपालकृष्ण (Giravi’s Gopalkrishna Temple)
गिरवी येथे असलेल्या गोपालकृष्ण मंदिरातील कृष्णाची मूर्ती सुंदर तर आहेच; परंतु तिच्या पाठीमागे, म्हणजे ती मूर्ती तयार व स्थापन होण्यामागे एक कथा आहे, तीही रोचक आहे. मूर्ती धेनुसहित श्रीकृष्णाची आहे. मंदिराभोवती दगडी चुनेगच्ची तट आहे. त्या सभोवतालच्या ओवऱ्यांवर मात्र आदिलशाही वास्तुरचनेची छाप आहे. गिरवी हे गाव फलटणपासून दक्षिणेला बारा किलोमीटरवर आहे...