लाला लजपतराय, लेखक कसे होते? (Lala Lajpat Rai As Writer)
भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासातील लाल-बाल-पाल म्हणजे लाला लजपत राय, बाळ गंगाधर टिळक आणि बिपीनचंद्र पाल. सर्व भारत ह्या त्रिमूर्तीच्या रूपाने - पंजाब, महाराष्ट्र आणि बंगाल -
लक्ष्मीपूजन (Laxmipoojan)
केवळ पैसा म्हणजे लक्ष्मी नव्हे. सन्मार्गाने मिळवलेला आणि त्याच मार्गाने खर्च होणारा पैसा यालाच लक्ष्मी म्हणतात. स्वच्छता, सौंदर्य, रसिकता, उद्योगप्रियता, नैतिकता, प्रामाणिक श्रम असतील तिथे लक्ष्मी आकर्षित होते आणि वास्तव्य करू लागते. लक्ष्मी सर्व प्रकारचे ऐश्वर्य देणारी असून तिची आठ रूपे आहेत.
धर्मांतील एकता : काकाचीवाडी (All Religion Diwali in Kakachiwadi)
काकाचीवाडी हे एक छोटेसे गाव सांगली जिल्ह्याच्या वाळवा तालुक्यात आहे. गावामध्ये वेगवेगळ्या जाती-धर्माचे लोक राहतात. स्वतंत्र ग्रामपंचायत, अंगणवाडी ते चौथीपर्यंत शाळा, बिरोबा मंदिर-हनुमान मंदिर व त्याची यात्रा, मोहरम यांसारखे सण अशा वैशिष्ट्यांनी युक्त असे हे गाव आहे.
पोशाख मोडलो – वसईच्या स्त्रियांचे बंड! (Revolutionary Changes in Traditional Attire of Vasai Women)
सत्तरीच्या दशकात पेहरावात बदल करणे याला ‘पोशाख मोडणे’ असे म्हणत. तो काळ माझी आजी, आई, काकी, दादी, मावशी यांचा...
मागील पिढीवरील वाचन संस्कार (Reading – key to the personality development)
मराठी भाषाभ्यासासाठी वि.स. खांडेकर, आचार्य अत्रे वगैरे दिग्गजांनी संपादित केलेली पाठ्यपुस्तके जुन्या पिढीत होती; खेरीज पुरवणी वाचनासाठी नेमलेली अवांतर पुस्तके असत. त्यातील गद्य विभाग हे गद्य बिलकुल नव्हते, तर अतिशय रोचक आणि समृद्ध होते. त्यातील साहित्याची विविधता तेव्हा जाणवली नाही, पण आता ती आठवली, की स्तिमित व्हायला होते.
उत्तमराव शिंदे यांच्या उद्योगाचा स्वतंत्र बाणा (Uttamrao Shinde’s Unique F.R.P. Industry)
उत्तमराव खंडेराव शिंदे हे नाशिकच्या अंबड औद्योगिक वसाहतीमधील लघुउद्योजक. त्यांनी त्यांच्या उद्यमशील वृत्तीविषयी एक कथा सांगितली. एका बरणीत शंभर शिंपले असतात. त्यांपैकी एका शिंपल्यात मोती असतो.
ब्रिटिश छावण्यांतील वेश्यांची स्थिती (The Plight of Prostitutes in British Ruled Indian Camps)
मिशनरी म्हटले की बहुधा डोळ्यांसमोर येतात ते पांढरे पायघोळ झगे घातलेले आणि ख्रिस्ती धर्माच्या प्रसारासाठी काम करणारे स्त्री-पुरुष. महिला मिशनरी असा स्वतंत्र उल्लेख केला तर पहिले नाव आठवते ते मदर तेरेसा यांचे.
दीपावली – सण प्रकाशाचा! (Deepawali)
दीपावली हा भारतात सर्वत्र साजरा होणारा बहुधा एकमेव सण आहे. पावसाळा संपून नवी पिके हाती आल्यानंतर शरदऋतूच्या ऐन मध्यात, आश्विन व कार्तिक या महिन्यांच्या संधिकालात, तो येतो.
भीमसेन जोशी – बुलंद आवाजातील करुणासागर (Tribute to Bhimsen Joshi)
ग्वाल्हेर, आग्रा, जयपूर अशा घराण्यांतील किराणा घराण्याचे पांथस्थ म्हणजे भारतरत्न संगीताचार्य स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी हे होत. त्यांचा जन्म कर्नाटकातील धारवाड जिल्ह्यातील रोण या त्यांच्या मावशीच्या गावी 4 फेब्रुवारी 1922 रोजी झाला.
कर्जतच्या उल्हास नदीची निर्मलता! (Cleansing Ulhas River at Karjat)
व्यवसाय निवृत्ती घेतली आणि मन विदीर्ण झाले. सगळ्यांची जी अवस्था तशा परिस्थितीत होते तशीच ती मलाही वाटली. मन गुंतले पाहिजे - त्यासाठी काहीतरी असे काम करावे, की जे माझ्या जीवनाचे ध्येय असेल असेही वाटले.