मागील पिढीवरील वाचन संस्कार (Reading – key to the personality development)
मराठी भाषाभ्यासासाठी वि.स. खांडेकर, आचार्य अत्रे वगैरे दिग्गजांनी संपादित केलेली पाठ्यपुस्तके जुन्या पिढीत होती; खेरीज पुरवणी वाचनासाठी नेमलेली अवांतर पुस्तके असत. त्यातील गद्य विभाग हे गद्य बिलकुल नव्हते, तर अतिशय रोचक आणि समृद्ध होते. त्यातील साहित्याची विविधता तेव्हा जाणवली नाही, पण आता ती आठवली, की स्तिमित व्हायला होते.
नाशिकच्या रेडिओवर अमेरिकी शाळा (US Marathi Schools have programme on Nasik Vishwas radio)
मी लॉकडाऊनच्या काळात रेडिओ विश्वास वर 'समन्वयक' म्हणून काम करू लागले. रेडिओ विश्वास हा कम्युनिटी रेडिओ आहे. तो मोबाईल अॅपद्वारे जगभरात कोठेही ऐकता येतो. त्याचे मुख्य केंद्र नाशिक येथे आहे.
सांगलीचे सायकलिंग जगाशी जोडलेले! (Bicycle is trending in Sangali)
सायकल हा नवा ट्रेंड समाजामध्ये तंदुरुस्तीसाठी म्हणून रुजत, वाढत आहे. सायकलस्वारी (सायकलिंग) हा खेळ, छंद, हौस म्हणून सर्वत्र मोठ्या प्रमाणात विकसित होत आहे. सायकल हे वाहन अनेक वाहनांच्या गलबल्यात स्थानिक प्रवास, छोट्या जा-ये करण्यासाठीदेखील उपयुक्त ठरत असल्याची जाणीव पुन्हा जनमनावर ठसत आहे...
कोण होते सिंधू लोक! More about Indus civilization (Sindhu Sanskrutee)
ऋग्वेदाचा काळ ठरवण्याचा प्रयत्न अनेक विद्वानांनी केला. त्यांत प्रामुख्याने दोन गट पडतात. एका गटात युरोपीयन पंडित आहेत. ते मॅक्समुल्लरने दिलेला काळ (इसवी सनपूर्व 1200-1000) मान्य करतात. दुसऱ्या गटात प्रामुख्याने भारतीय विद्वान आहेत.
आर्केओगिरी : माझा पुरातत्त्वाचा शोध (Archaeogiri – My Passion)
‘आर्केओगिरी’ या संकल्पनेचे पहिले बीज माझ्या मनात नेस्पेरेन्नूब या, तीस शतकांपूर्वी मरण पावलेल्या इजिप्शियन धर्मगुरूने रोवले...
उत्तमराव शिंदे यांच्या उद्योगाचा स्वतंत्र बाणा (Uttamrao Shinde’s Unique F.R.P. Industry)
उत्तमराव खंडेराव शिंदे हे नाशिकच्या अंबड औद्योगिक वसाहतीमधील लघुउद्योजक. त्यांनी त्यांच्या उद्यमशील वृत्तीविषयी एक कथा सांगितली. एका बरणीत शंभर शिंपले असतात. त्यांपैकी एका शिंपल्यात मोती असतो.
पोशाख मोडलो – वसईच्या स्त्रियांचे बंड! (Revolutionary Changes in Traditional Attire of Vasai Women)
सत्तरीच्या दशकात पेहरावात बदल करणे याला ‘पोशाख मोडणे’ असे म्हणत. तो काळ माझी आजी, आई, काकी, दादी, मावशी यांचा...
वसईतील बावखलांचे निसर्गचक्र (Bavkhals In Vasai – Traditional Water Tank)
बावखल हा शब्द वसईच्या बोलीभाषेतील आहे. त्याचा अर्थ आहे - पाण्याने भरलेला, छोट्या तलावासारखा मोठा खड्डा होय (बाव म्हणजे विहीर आणि बावखल म्हणजे विहिरीजोगा मोठा खड्डा). तशी बावखले वसई परिसरात गावागावात असायची...
कान्होळा नदी : गावाचे वैभव हरपले! (Plight Of Kanhola River)
प्रत्येक व्यक्तीची तिच्या गावची नदी ही मोठी आठवण असते. भले ती नदी छोटी असो नाही तर मोठी, आटलेली असो अगर वाहणारी; नदी असणारी गावे किती सुंदर आणि किती भाग्यवान!
विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी शिक्षकांच्या शोधात! (Disle Sir’s Success and Appeal to Teachers)
रणजित डिसले यांनी क्यूआर कोडेड पुस्तकांच्या माध्यमातून शिक्षणक्षेत्रात क्रांती घडवली! त्यांचे नाव महाराष्ट्राच्या शिक्षणक्षेत्रात काही वर्षांपासून गाजत आहे. त्यांना युनेस्को आणि वार्की फाऊंडेशन यांच्यातर्फे जागतिक दर्ज्याचा सात कोटी रुपयांचा ग्लोबल पुरस्कार (2020) मिळाला.