काकतालीय न्याय
केवळ योगायोगाने म्हणजे यदृच्छेने एखादी गोष्ट घडते, तेव्हा कावळा बसायला आणि फांदी तुटायला एक गाठ पडली, असे म्हटले जाते. कावळ्याच्या भाराने फांदी तुटत नाही,...
हळदिवी (Haldivi)
हळदिवा किंवा हळदिवी याचा शब्दकोशातील अर्थ हळदीच्या रंगाचा, पिवळा असा आहे. शब्द आरती प्रभू यांच्या कवितांमध्ये अनेकदा दिसतो. प्रामुख्याने ‘जोगवा’ या काव्यसंग्रहातील कवितांमध्ये. हळदिवी हा शब्द किती वेगवेगळ्या संदर्भात आणि तरीही चपखलपणे त्या कवितांमध्ये आला आहे.
शेपटावर निभावलं
एखादी व्यक्ती जर आश्चर्यकारक रीत्या फार मोठ्या अपघातात किरकोळ दुखापत होऊन वाचली तर त्या वेळी ‘जिवावर बेतलं पण शेपटावर निभावलं’ असे म्हटले जाते. हा वाक्प्रचार शारीरिक संकटाच्या प्रसंगातच दर वेळी वापरला जातो असे नाही...
चपाती व पोळी (Chapati, Poli Marathi Versions of Loaf)
मराठी भाषेत ‘पोळी’ व ‘चपाती’ हे पर्यायशब्द म्हणून जवळजवळ वापरले जातात. उच्चभ्रू समाजात ‘पोळी’ व तदितर समाजात ‘चपाती’ हा शब्द वापरला जातो असे ढोबळपणे म्हणता येते.
अस्वल
अस्वलाला मराठीत भालू, रीस, नडघ, भल्ल, रिछ, तिसळ अशी नावे आहेत. संस्कृतमध्ये ऋक्ष म्हणजे अस्वल. त्याशिवाय अस्वल चालताना मागे वळून पाहते, म्हणून पृष्ठदृष्टिक; चिडले, की भयंकर ओरडते म्हणून दुर्घोष; तर त्याचे केस लांब व दाट असतात म्हणून दीर्घकेश अशीही नावे आहेत...
लवथवती
‘लवथवती’ हा शब्द ‘लवथवणे’ या क्रियापदापासून तयार झालेला आहे. काही काही शब्दांना त्यांची स्वतःची लय असते. सळसळ, झुळझुळ, थुईथुई असे शब्द नुसते वाचले गेले तरी ती लय जाणवते. ‘लवथवती’ हा शब्ददेखील तसाच. शंकराच्या आरतीत तो येतो. शंकराच्या आरतीची सुरुवातच मुळी ‘लवथवती’ने होते...
पळसाला पाने तीन
पळस हे रानातील झाड आहे; ते वसंत ऋतूच्या आगमन काळात नेत्रदीपक बनून जाते. इतर वेळी ते सर्वसामान्य झाड असते. वसंत ऋतू आला, की त्याची पाने गळून पडतात आणि संपूर्ण झाड लाल-शेंदरी रंगाच्या फुलांनी बहरून जाते...
हातखंडा
काम हमखास पार पाडण्याचे कौशल्य अंगी असणे म्हणजे हातखंडा. तर हातखंड म्हणजे मधून मधून सोडवणूक करणारा, मदतनीस (मूल, मित्र, शेजारी); तसेच अडल्यावेळी उपयोगी पडेल अशी व्यक्ती.
जिमखाना
‘जिमखाना’ हा मराठी रोजच्या वापरातील शब्द आहे. जिमखाना म्हणजे ‘व्यायामशाळा’ किंवा विविध खेळ जेथे खेळले जातात अशी जागा, असा अर्थ व्यवहारात घेतला जातो. जिमखाना...
भारूड
संतांनी सर्वसामान्य लोकांना अध्यात्माची शिकवण सोप्या भाषेत देण्यासाठी ओवी, अभंग, भारूड अशा वेगवेगळ्या काव्यरचना केल्या. त्यांतील रूपकात्मक आणि जनसमुदायासमोर नाट्यमय रीतीने सादर केली जाणारी रचना म्हणजे भारूड. एकनाथपूर्व काळात ज्ञानेश्वर आणि नामदेव यांनी तर एकनाथांच्या पश्चात तुकाराम आणि रामदास यांनीही भारूडे रचली. असे असले तरी एकनाथांची भारूडे सर्वांत लोकप्रिय झाली. त्यामुळेच ‘ओवी ज्ञानेशाची’, ‘अभंग तुकयाचा’ तसे ‘भारूड नाथांचं’ असे म्हटले जाते...