Home वैभव प्रथा-परंपरा

प्रथा-परंपरा

तरंग. यांना खांबकाट्या असेही म्हणतात

तरंग आणि बारापाचाची देवस्की

आचरा नदीने रत्नागिरी जिल्ह्याचे दोन भाग केले आहेत. पैकी दक्षिणेकडचा भाग म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा. ही संस्कृती गोव्याला जवळची, ती रत्नागिरी-रायगड जिल्ह्यांहून वेगळी आहे. त्या भागात एक...

कोळबांद्र्याच्या डिगेश्वराचा आनंदोत्सव !

1
भारताच्या सात लाख खेडेगावांमध्ये महादेवाचे मंदिर नाही असे गाव नसेल ! महादेवाच्या त्या मंदिरांतील भगवंताचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक गावातील महादेवाला वेगवेगळे नाव आहे. सद्रक्षणाय खलनिग्रहणाय असे महाराष्ट्राच्या पोलिस खात्याचे घोषवाक्य आहे. कोळबांद्रे गावातील डिगेश्वरही नेमके तेच काम करतो. गावात कोणी गरीब, आर्थिक दृष्ट्या दुर्बल माणसाला त्रास दिला तर ‘आता डिगेश्वराला नारळ देईन’ एवढे वाक्य जरी त्या गरीब माणसाने उच्चारले तरी तो दुष्ट घाबरून जातो...
carasole

आमची जात

1
‘मराठा समाज हा वंचित वगैरे असल्याने आणि सामाजिक उतरंडीत निम्न स्तरावर असल्याने त्यांना – म्हणजे मराठा म्हणवणाऱ्या लोकांना आरक्षणाचा लाभ द्यायला हवा’ अशी मागणी...
safalya

राजकारण आणि गुंडगिरी यांपासून दूर दूर… सोलापुरात काही घडले आहे!

राजकारण आणि गुंडगिरी यांपासून दूर, महाराष्ट्रात विधायक काही घडत आहे ही ‘थिंक महाराष्ट्र’ची उद्घोषणा... तिचा सुरेख प्रत्यय ‘सोलापूर जिल्हा संस्कृतिवेध’ मोहिमेच्या काळात आला. वेगवेगळ्या...
carasole

भैरव

भैरव हा शैव परिवारातील देव आहे. त्याला शिवाचे एक रूप मानतात. भैरव महाराष्ट्रात सामान्यत: ग्रामदेवता म्हणून पूजला जातो. त्याला भैरोबा किंवा बहिरोबा असेही म्हणतात. महाराष्ट्राच्या...
_Veergaoncha_Bohada_1.jpg

विरगावचा भोवाडा

1
आमच्या विरगावला भोवाड्याची परंपरा कायम आहे. दरवर्षी आखाजीच्या आसपास चैत्र-वैशाख महिन्यात भोवाडा व्हायचा. तरी दरवर्षीचे सातत्य पूर्वीसारखे आता उरलेले नाही. चैत्र-वैशाख म्हणजे उन्हाळा. शेतक-यांना...

श्री दत्त मंदिर: अचलपूरचा भुलभुलैया (Shri Datta Temple of Achalpur)

अचलपूर येथील दीडशे वर्षे जुने दत्त मंदिर हे भुलभुलैया मंदिर म्हणून ओळखले जाते. या मंदिराला धार्मिकतेबरोबर ऐतिहासिक व प्राचीन महत्त्व आहे. मंदिराचे बांधकाम शेसव्वाशे वर्षांपूर्वीचे असावे...
carasole

बाळ भैरवनाथाचा हवामानाचा अंदाज!

3
बाळ भैरवनाथांचे देवस्थान अहमदनगर जिल्ह्याच्या कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथे आहे. तो अष्ट भैरवनाथांपैकी एक. त्या ठिकाणी गुढीपाडव्यानंतर पंधरा दिवसांनी दोन दिवस यात्रा भरते. यात्रेत...
carasole

वाळवण संस्‍कृती

उन्हाळा हा ऋतू जरा त्रासदायक वाटला, तरी भारतीय खाद्यसंस्कृतीत त्याची मदत मोठी आहे. वाळवणाचे पदार्थ बनवून त्याची बेगमी करणाऱ्या ललनांची लगबग हे उन्हाळ्याचे वैशिष्ट्य. कुरकुरीत कुरडया, सांडगे, पापड-पापड्या, लज्जतदार मसाले, लोणची, मुरांबे हे सर्व पदार्थ त्या काळात डबाबंद वा बरणीबंद होत असतात. वाळवण संस्कृतीत वैविध्य आहे; प्रांताप्रांतानुसार ते पदार्थ बदलतात. पापडांचा उल्लेख थेट बौद्ध काळापासून आढळतो. सांडगे व पापडाची वर्णने तेराव्या शतकातील कानडी व मराठी साहित्यात ठायी ठायी आहेत...

नमन-खेळे : श्रद्धा व नाट्य यांचे मिश्रण (Naman-Khele – Folk art that combines Devotion...

0
नमन-खेळे हा कोकणातील एक लोकनाट्य प्रकार आहे. नमन-खेळे यातील नमन या शब्दाचा अर्थ देवाला नमस्कार करणे, देवापुढे नम्र होणे, देवापुढे वाकणे, लवणे हा आहे. खेळे म्हणजे आराध्य देवतांची भक्ती करताना शक्ती, नृत्यक्रीडा व नाट्य यांचा समन्वय साधून सादर केलेला लोकनाट्यप्रकार. नमन-खेळेच्या आरंभी बारा नमने असतात. देव-देवता, ग्रामदेवता, धरित्री माता, चंद्र-सूर्य, पाच पांडव, सप्तऋषी, सप्तसागर, गुरुस्वामी, दहाखंडकाशी रावण व प्रेक्षक यांना नमन केले जाते...