दशावतार : एक समृद्ध कलावारसा (Folk Theater of Konkan –Dashavtar)

महाराष्ट्रात लोकरंगभूमीचे विविध प्रकार अस्तित्वात आहेत. त्यातलाच एक प्रकार म्हणजे दशावतार. नागर रंगभूमीच्या आधीपासून दशावतारी नाटक अस्तित्वात होते असे मानले जाते आणि आजही ते जोमदार पद्धतीने सादर होत आहे. नव्या स्वरूपात ते व्यावसायिक रंगभूमीवरही कमालीचे यशस्वी झाले आहे. अत्यंत लवचिक असा हा नाट्यप्रकार कोठल्याही काळात लोकभावनेला नाट्यरूप देऊ शकतो...

अण्णासाहेब किर्लोस्कर आणि संगीत शाकुंतल (Annasaheb Kirloskar And Sangeet Shakuntal)

अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी मराठी संगीत नाटकाचे एक युग घडवले ! त्यांना नाटकांचा छंद जडला आणि त्यांचा विद्याभ्यास संपला. अण्णासाहेबांनी कालिदासांच्या संस्कृत शाकुंतल वरून मराठीत लिहिलेल्या ‘संगीत शाकुंतल’ने मराठी संगीत नाटकांची नांदी केली आणि इतिहास घडवला. त्यांनी आणि त्यांच्या किर्लोस्कर नाटक मंडळीने नाट्य व्यवसायाला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली…

भांगवाडी थिएटर (Bhangwadi Theater)

भांगवाडी ही मुंबईच्या काळबादेवी विभागातली एक वाडी. तेथे पूर्वी आसपास भांग विकणारी दुकाने होती म्हणून त्या भागाचे नाव भांगवाडी. अशा ठिकाणी गुजराती संगीत रंगभूमीची मुहूर्तमेढ 1874 मध्ये रोवली गेली. तेथे गुजराती नाटके 1968 पर्यंत होत होती. एका विशिष्ट पद्धतीची नाटके तेथे होत असत त्यामुळे त्या पद्धतीच्या नाटकांना भांगवाडी थिएटर म्हटले जाऊ लागले. अजूनही गुजराती नाटकांच्या सादरीकरणावर या पद्धतीचा काहीसा प्रभाव आहे. गुजराती रंगभूमीवरचे ज्येष्ठ दिग्दर्शक, नट आणि निर्माते मनोज शहा यांची भांगवाडी थिएटरविषयी एक विस्तृत मुलाखत तेजस्वी पाटील आणि तन्वी गुंडये यांनी घेतली आहे...

नटसम्राट – एक प्रतिक्रिया

0
- वि.वा.शिरवाडकर आणि त्यांनी लिहिलेले ‘नटसम्राट’ हे नाटक या दोहोंबद्दल अपार भक्तिभाव मराठी प्रेक्षकांच्या मनात दिसतो. पण बरेचदा नाटकाचीच मोजपट्टी लावून नटसम्राट चित्रपटाचे मूल्यमापन केले जाते आणि घोटाळा तेथेच होतो...

थिंक महाराष्ट्र च्या वर्धापन दिनी तीन पुस्तकांचे प्रकाशन

लेखनावर अथवा कलाविष्कारावर सद्यकाळात कोणतेही बंधन जाणवत नाही असा स्पष्ट निर्वाळा लेखक-अभिनेते अभिराम भडकमकर आणि नाट्यदिग्दर्शक कुमार सोहोनी यांनी व्यक्त केला. ते ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’च्या वर्धापनदिन कार्यक्रमातील परिसंवादात बोलत होते. ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’संचालित ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ या वेब पोर्टलचा चौदावा वर्धापनदिन अर्थात ‘सद्भावना दिवस 2024’, ठाण्यातील बाळासाहेब ठाकरे स्मारक सभागृहात झाला. महाराष्ट्रातील मराठी माणसाचा चांगुलपणा आणि त्याची प्रज्ञा-प्रतिभा ह्या ‘नेटवर्क’मध्ये नव्या-जुन्या पिढीतील सर्वांनी त्यांच्या लेखणीने, विचारांनी आणि प्रत्यक्ष कार्यक्रमांतूनही योगदान द्यावे असे आवाहन ह्या वेळी करण्यात आले...
_Actor_Vivek_1.jpg

अभिनेता विवेक अर्थात गणेश भास्कर अभ्यंकर

मराठी चित्रपटसृष्टीतील गाजलेले नट विवेक यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने ‘अभिनेता विवेक’ या नावाचे एक पुस्तक भारती मोरे यांनी पुढाकार घेऊन संकलित केले आहे. त्या कामी त्यांना...
carasole

राजकुमार तांगडे – पारंपरिक संकेतांपलिकडचा शिवाजी राजा मांडणारा नाटककार

महाराजांची गडतोरणे आणि धोरणे! राजकुमार तांगडे याने मांडले वास्तव! नाटक शिवाजी राजांवर पण त्यात भरजरी पोशाख नाहीत. कृत्रिम दरबारी पल्लेदार भाषेचा फुलोरा नाही, तलवारबाजीचा खणखणाट नाही...

रुपवेध – जाणिवेतून नेणिवेपर्यंतचं नाट्य

डॉक्‍टर श्रीराम लागू यांनी रंगभूमीवर साकारलेल्‍या भूमिका - त्‍या रंगवताना त्‍या भूमिकांमागचा त्‍यांचा सर्वांगीण विचार, त्‍यांचं ‘नाटक’ या माध्‍यमाबद्दलचं व अभिनयाबद्दलचं चिंतन आणि त्‍यांनी...

शकुंतला परांजपे यांची चढाओढ (Shakuntala Paranjape)

श्रीमती शकुंतला परांजपे या सई परांजपे यांच्या आई आणि रँग्लर र.पु. परांजपे यांची कन्या. शकुंतलाबाई स्वत: चतुरस्त्र व्यक्तिमत्त्वाच्या व कर्तबगार व्यक्ती होत्या. त्या गणितातील ट्रायपॉस ही परीक्षा 1929 साली उत्तीर्ण झाल्या होत्या. त्या लंडन येथूनच डिप्लोमा इन एजुकेशन ही परीक्षादेखील पास झाल्या आणि त्या त्यांच्या वयाच्या चोविसाव्या वर्षी आंतरराष्ट्रीय मजूर परिषदेत काम करू लागल्या. त्यांनी कुटुंब नियोजनाच्या कामाला 1938 सालापासून वाहून घेतले...
carasole1

डॉक्‍टर राजेंद्र चव्‍हाण

एका आनंदधर्मींची आनंदवाट ‘तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार’ शिरगावच्या डॉक्टर राजेंद्र चव्हाण यांना मिळाला आणि मन अभिमानाने भरून आले. राजेंद्र चव्हाण हा रंगवर्ती गेली दोन दशके देवगड...