Home Authors Posts by शंकर बोऱ्हाडे

शंकर बोऱ्हाडे

22 POSTS 0 COMMENTS
शंकर बो-हाडे हे पिंपळगाव, नाशिक येथील 'कर्मवीर काकासाहेब वाघ महाविद्यालया'त मराठीचे प्राध्यापक आहेत. ते सिन्नर गावात 'साहित्य रसास्वाद' हे वाङ्मय मंडळ चालवतात. बो-हाडे हे 'राष्ट्र सेवा दला'चे सैनिक. बो-हाडे नामांतर चळवळीत सत्याग्रह करून शिक्षणावर तुळशीपत्र ठेवून जेलमध्ये गेले. ते परिवर्तनवादी, दलित चळवळ व साहित्य याचे अभ्यासक आहेत. त्यांनी पत्रकार 'जागृति'कार पाळेकर यांच्या साहित्याच्या संशोधनानिमित्ताने मराठी पत्रकारितेच्या इतिहासाचा अभ्यास केला. ते गेली तीन दशके नाशिकच्या वृत्तपत्रातून लेखन करतात. त्यांनी लिहिलेला, 'ठाणे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना'चे अध्यक्ष उत्तम कांबळे यांच्या अध्यक्षीय भाषणाची चिकित्सा करणारा लेख विशेष गाजला होता. त्यांची चार स्वतंत्र व दोन संपादित पुस्तके प्रसिध्द आहेत. त्यांची कार्यकर्ता लेखक अशी ओळख आहे. लेखकाचा दूरध्वनी 9226573791

संघर्षवाटा – आंबेडकरी राजकारणाचे ताणेबाणे (Dalit politics analyzed in the book)

डॉ. संजय दामू जाधव यांचा एका दशकाचा विविधांगी अनुभव ‘संघर्ष वाटा’ या पुस्तकात शब्दबद्ध झाला आहे. जाधव यांनी अस्थिरोग तज्ज्ञ म्हणून जे यश संपादन केले आणि त्यासाठी जो संघर्ष केला त्याचे चित्रण पुस्तकात वाचण्यास मिळते.

उत्तमराव शिंदे यांच्या उद्योगाचा स्वतंत्र बाणा (Uttamrao Shinde’s Unique F.R.P. Industry)

उत्तमराव खंडेराव शिंदे हे नाशिकच्या अंबड औद्योगिक वसाहतीमधील लघुउद्योजक. त्यांनी त्यांच्या उद्यमशील वृत्तीविषयी एक कथा सांगितली. एका बरणीत शंभर शिंपले असतात. त्यांपैकी एका शिंपल्यात मोती असतो.

शेषराव घाटगे – पत्रे, देशभक्ताची व प्रेमवीराची (Patriot Sheshrao Ghatage)

शेषराव घाटगे यांच्या आयुष्याची चित्तरकथा मोठी रोमांचकारक आहे. त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात हौतात्म्य पत्करूनही त्यांच्या वाट्याला उपेक्षा आली. त्यांच्या चरित्रसाधनांवर 2011 ते 2012 या शताब्दी वर्षात प्रकाश पडला! त्यांचा चरित्रग्रंथ एकशेदोन वर्षांनी (मरणोत्तर एकोणसत्तर वर्षांनी) प्रसिद्ध झाला...

लिंगभावाची समानता आणि संवेदनशीलता (Gender Equality and Sensitivity)

मुल जन्माला आले, की त्याची ओळख स्त्री, पुरूष अशी होत असते. मात्र मानवी सजीवाला त्याची/तिची लिंग ओळख अकरा ते चौदा या वयात होते. त्यांच्यात त्या वयात शारीरिक आणि मानसिक बदल होत जातात. त्याच वेळी एकाद्या मुलग्याला त्यांच्यात ‘तो’ नाही याची जाणीव होते.
_hotel_curry

हॉटेल ‘करी लिव्हज’ची गोष्ट ( Story of Hotel Curry Lives)

‘अंडा रोल’, ‘चिकन रोल’ यांच्या हातगाड्या नासिक शहरात ठिकठिकाणी उभ्या असतात. तशी पहिली गाडी सोळा वर्षांपूर्वी कॉलेज रोडला सुरू झाली. हातगाडीवर ‘अंडा रोल’ विकण्यास...

मिस्टर बिडी – किसनलाल सारडा

‘मिस्टर बिडी’ हे किसनलाल सारडा यांचे आत्मकथन भारती संजय प्रधान यांनी प्रथम इंग्रजी भाषेत लिहिले. त्याचा मराठी अनुवाद उषा तांबे यांनी केला आहे....
_Aruna_Dhere_4.jpg

साहित्य संमेलनाध्यक्ष नवी निवडपद्धत : सफल – संपूर्ण?

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांची निवडणूक ही छटाकभर मतदारांची लोकशाही प्रक्रिया होऊन गेली आहे. ती मुठभरांची लोकशाही 2017 सालापर्यंत होती- म्हणजे वेगवेगळ्या प्रादेशिक साहित्यसंस्थांनी निवडलेल्या सुमारे...

वैराग्यवारी – परतवारी

पंढरपूरकडे जाणारी वारी ही ऐश्वर्यवारी असते. वारकऱ्यांची सोय गावोगावचे लोक, स्वयंसेवी संस्था, मंडळे करत असतात. दान देण्याची प्रवृत्ती त्या काळात दिसून येते. चहा, अल्पोपहार, फळफळावळे, उपवासाचे पदार्थ, पाणी यांचे वाटप सतत चालत असते. त्यामुळे वारीत श्रद्धाळू असतात तसे पोटार्थीही दिसून येतात. त्या दिंड्या परत कधी फिरतात? त्यांची व्यवस्था काय असते? परतीचा प्रवास किती दिवसांत होतो? किती लोक पालखीबरोबर असतात? या प्रश्नांची उत्तरे देणारे एक पुस्तक सुधीर महाबळ यांनी लिहिले असून ते पुण्याच्या ‘मनोविकास प्रकाशना’ने प्रसिद्ध केले आहे. पुस्तकाचे नावच ‘परतवारी’ असे आहे...
_Jagrutikar_BhagvantPalekar_1.jpg

जागृतिकार भगवंतराव पाळेकर यांच्या मागावर!

माणसाचे आयुष्य अनिश्चिततेने भरलेले असते. मी संशोधनाच्या क्षेत्रात काही करू शकेन असे माझ्या दोन-तीन कुंडल्या बनवणाऱ्यांनाही सांगता आले नसते. मी शिपाई म्हणून ‘साने गुरुजी...
_VibhandikYnachi_MagilPidhichiKavita_2.jpg

विभांडिक यांची मागील पिढीची कविता

‘ह्या एका दुअेसाठी’: दु:ख-दैन्य-दास्य यांचे संचित!’ मनोहर विभांडिक यांची कविता सर्व पुर्वसूरींना दूर सारून अभिव्यक्त झाली आहे हे त्यांचे यश. ते गेली चार दशके कविता...