Home Search
हळद - search results
If you're not happy with the results, please do another search
हळदिवी (Haldivi)
हळदिवा किंवा हळदिवी याचा शब्दकोशातील अर्थ हळदीच्या रंगाचा, पिवळा असा आहे. शब्द आरती प्रभू यांच्या कवितांमध्ये अनेकदा दिसतो. प्रामुख्याने ‘जोगवा’ या काव्यसंग्रहातील कवितांमध्ये. हळदिवी हा शब्द किती वेगवेगळ्या संदर्भात आणि तरीही चपखलपणे त्या कवितांमध्ये आला आहे.
हळदुगे येथील फुलपाखरांची शाळा
मुले ही फुलपाखरे, निरनिराळ्या विषयांचे वर्ग म्हणजे ही फुले, त्या वर्गात उपस्थित असणारे शिक्षक हे ज्ञानरूपी मकरंदाचे साठे आणि त्यांच्याकडील मकरंद म्हणजे ज्ञानरस. तो...
हळदीचा सांस्कृतिक आणि औषधी प्रवास
हळदीची आणि भारतीय लोकांची ओळख आर्युवेदाच्या माध्यमातून पाच हजार वर्षांपूर्वीं झाली असली तरी तिचा स्वयंपाकघरातील वापर मात्र अडीच हजार वर्षांनंतर झाला. आता तर या...
माझा हळद कोपरा
मी लग्न होऊन, कासेगाव या घाटावरच्या गावातून कोकणात कणकवलीला आले. चार गुंठे जमिनीतील घर आणि बाजूची मोकळी जागा. सासुबाई (शकुंतला घाणेकर) त्यांच्या माहेरच्या (पाभरे,...
सांगलीची हळद बाजारपेठ
सांगली ही देशातीलच नव्हे तर जगातील हळदीची प्रमुख बाजारपेठ आहे. त्या परिसरात पिकली जाणारी दर्जेदार राजापुरी हळद, हळदीचा दर्जा वर्षानुवर्षे टिकवून ठेवणारी जमिनीखालची पेवांची...
हळदीचे पेव – जमिनीखालचे कोठार!
हळद ही कीडनाशक म्हणून ओळखली जाते, परंतु खुद्द हळदीचे पीक अत्यंत नाजूक आहे. हळकुंड उघड्यावर ठेवल्यास त्यास किडीची लागण पहिला पाऊस पडताच होण्याची शक्यता बरीच...
हळदीचा रंग…..
हळदीचा रंग.....
नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर या मराठवाड्यातल्या जिल्ह्यांमध्ये हळदीचे उत्पादन घेणा-या शेतक-यांना यंदा हळदीने चांगलेच रंगवले आहे ! कधी काळी एक हजार रुपये क्विंटल...
माझे अलिबाग
एखाद्या गावाचे वर्णन करताना टुमदार शब्द वापरला जातो. तेव्हाच्या अलिबागला हा चपखल बसणारा शब्द. सुबक, टुमदार, सुरेख असे अलिबाग. नारळ पोफळीच्या वाड्यांनी गच्च भरलेले गाव. एस टी ने गावात प्रवेश करतानाच मन प्रसन्न होते. वैशंपायनांची वाडी, ठोसरांची वाडी, कामतांची वाडी अशा अनेक बागा, त्यात कौलारू सुबक घरे. काही दुपाखी, काही चौपाखी, काही माडीची... म्हणजे एक मजला वर असलेली. ब्राह्मण आळी, कामत आळी, मिरची गल्ली, बाजारपेठ, ठिकुरली नाका, कोळी वाडा, लिमये वाडी... असे बरेच विभाग आणि थोडेफार वास्तुशास्त्रात बदल असलेली घरे. जीना, पडवीची चौकट, खिडक्या, दारे सगळे उत्तम लाकडी बांधकाम. घरांमध्येही कणखर लाकडी आधाराचे मेरू खांब. ओटी, पडवी त्यानंतर बैठकीची खोली, माजघर, देवघर, स्वयंपाकघर, दोहो बाजूला वावरायच्या खोल्या. त्यावेळी स्वतंत्र बेडरूम अस्तित्वातच नव्हती...
मोरपंखी आठवणी आखाजीच्या (अक्षय तृतीया)
अक्षय तृतीया म्हणजेच आखाजी हा सण वैशाख शुद्ध तृतीयेस साजरा केला जातो. त्या दिवशी कृतयुगाचा आरंभ होतो असे म्हणतात. तो पवित्र दिन म्हणून विविध धर्मकृत्ये, पुण्य, दानधर्म, हवन, सत्कर्म करून पुण्यसंचय केला जातो. परशुराम जयंती त्याच दिवशी असते. चैत्रात बसवलेल्या गौराईचे विसर्जनही त्या दिवशी होते. खानदेशातील अक्षय तृतीया (आखाजी) म्हणजे सासुरवाशिणीला मुक्तिदिनच असतो. लग्न होऊन सासरी गेलेल्या विवाहितेला माहेरी येऊन सासरचा थकवा, सल, बोच, कढ व्यक्त करण्याचे मोकळेपण तेव्हाच लाभते. चैत्र-वैशाखाच्या उन्हासोबत तिची माहेरची हुरहूर, ओढ वाढावी अन् माहेरच्या वाटेकडे डोळे लागावे अशी भावावस्था आपोआप आखातीच्या मुहूर्ताला जमा होते. त्यामुळे मुलीमहिलांचा आनंदोत्सवच तो...
गरूडपाड्याची गावकी (Garudpada model of village based civil society)
मी गावकी हा शब्दच मूळात ऐकला तो 2014 साली. आम्ही रोहा रोडवरील गरूडपाडा गावात डिसेंबर 2014 ला राहण्यास आलो. पंचावन्न-साठ घरांचे चिमुकले गाव. तोपर्यंतचे सगळे आयुष्य शहरात गेले आणि त्यातील अर्ध्याहून अधिक महानगरात घालवले, त्यामुळे ‘खेड्यातील घरा’चे स्वप्न अनुभवणे बाकी होते. गावाचे गरूडपाडा हे नाव कसे पडले, कधीपासून गाव वसले असे प्रश्न मनात आले. खरे तर, शासन दरबारी गरूडपाडा गाव अस्तित्वात नाही. समोर काविर नावाचे गाव आहे त्याचाच उल्लेख सापडतो. काविरच्या रहिवाशांची शेते या गावात होती. ते त्यासाठी येथे येत आणि ‘पाड्यावर जातो’ असा उल्लेख करत...