Home Search
लिपी - search results
If you're not happy with the results, please do another search
इमोजी : चित्रलिपीच्या दिशेने आरंभ (Emojis Indicate the Direction of New Visual Language)
काही चित्रे लिप्यांमध्ये संगणकीय प्रगतीमुळे आणि विविध गरजांमुळे शिरली आहेत. त्यांना इमोजी म्हणजेच भावचिन्हे म्हटले जाते. ती भावचिन्हे कमीत कमी जागा व्यापून अधिकाधिक अर्थ व्यक्त करणारी असतात. त्यांच्या आधारे आधुनिक संदेशन मोठ्या प्रमाणावर होऊ लागले आहे, म्हणजेच अनेक चित्रे लिपीत शिरू लागली आहेत आणि त्यांच्या परिणामकारकतेमुळे त्यांचा वापरही वाढू लागला आहे...
मोडी लिपी – मराठीचा शॉर्टहँड (Modi – Historical Script of Marathi Language)
मोडी ही लिपी तेराव्या शतकापासून विसाव्या शतकापर्यंत मराठी भाषेच्या लेखनाची प्रमुख लिपी होती. त्या आधीची दोनशे वर्षे ती महाराष्ट्रात असल्याच्या खुणा मिळतात. मोडीमधील सर्वात जुना उपलब्ध लेख सन 1189 सालचा आहे.
मोडी लिपी – अथ: पासून इति पर्यंत
मोडी लिपी म्हणजे देवनागरीची जलद लिपी! ती नावाप्रमाणे नागमोडी वळणाची, ब-यापैकी अखंड लिपी आहे. त्या लिपीचा उगम कसा झाला ते अज्ञात आहे. मोडी लिपीचे...
मराठी लिपीत सुधारणा : अक्षर आणि ध्वनी
मराठी लिपीत सुधारणा : अक्षर आणि ध्वनी – प्रा. प्रकाश ज. गुप्ते.
इतर भाषकांना जर मराठी भाषा शिकायची किंवा मराठी वाङ् मय वाचनाची इच्छा असेल...
भाषा, लिपी आणि वास्तवाची जाणीव
मी ‘हे युनिकोड’ हे शब्द ‘विंडोज वर्ड’मधल्या देवनागरीत इन्स्क्रिप्टच्या कळपाटावर (किबोर्ड) लिहायला सुरुवात केली. मी लिहिण्याच्या ओघात, अभावितपणे संगणकावर देवनागरी उमटवायच्या वेगळ्या, इंग्रजी मुळाक्षरांवर...
माझी पुंजी : मला भेटलेली माणसे !
पद्मिनी दिवेकर शिकागोच्या नेपरव्हिल नावाच्या उपनगरात गेली सत्तावीस वर्षे राहत आहे. त्या नवरा सतीश आणि मुलगी गार्गी भारतातून अमेरिकेला गेले. त्या भारतात ‘कोशीश स्कूल फॉर द डेफ’ ह्या मालाड येथील बहिऱ्या मुलांच्या शाळेत शिक्षिका 1987 ते 1993 पर्यंत होत्या. त्या अमेरिकेत गेल्यानंतर तेथील प्रिस्कूलमध्ये आणि नंतर हायस्कूलमध्ये टीचिंग असिस्टंट म्हणून नोकरी काही वर्षे करू लागल्या. त्यांना पुन्हा स्पेशल एज्युकेशन शिक्षिका व्हावेसे वाटत होते. त्यांनी अमेरिकेत स्पीच अँड लँग्वेज पॅथॉलॉजीचा अभ्यासक्रम पूर्ण केला व त्या विषयातील असिस्टंट म्हणून इलिनॉईस राज्याच्या अर्ली इंटरव्हेन्शन अंतर्गत काम करतात. त्यांच्या घरापासून पंचवीस मैलांच्या परिघात शून्य ते तीन वर्षे वयापर्यंतच्या मुलांना घरी जाऊन स्पीच थेरपी देतात. त्या हे काम पंधरासोळा वर्षे करत आहे...
सातवाहन – महाराष्ट्रातील पहिले राजघराणे
सातवाहन हे महाराष्ट्रावर राज्य करणारे पहिले राजघराणे. त्यांचा कार्यकाळ इसवी सनपूर्व 235 ते इसवी सन 225 पर्यंतचा आहे. साधारणतः साडेचारशे वर्षे. सिमुक या सातवाहन राजाने त्या राज्याची मुहूर्तमेढ रोवली तर त्याचा पुत्र सिरी सातकर्णी या कर्तृत्ववान राजपुरुषाने घराण्याला सम्राटपद मिळवून दिले. सातवाहन घराण्याच्या सिमुक सातवाहनानंतर राजगादीवर आलेला हा दुसराच राजा होता. असे असताना त्याने त्याच्या कर्तृत्वाने घराण्याला सम्राटपद मिळवून दिले. राजाचे कर्तृत्व नागनिका राणीने कोरवून घेतलेल्या नाणेघाट लेण्यातून कळते. सातकर्णी राजाची राणी ‘नागनिका’ ही त्या काळातील पहिली कर्तबगार ज्ञात स्त्री...
मराठी – अभिजात भाषा !
भाषेला अभिजात दर्जा केंद्र सरकारकडून प्राप्त झाल्यावर तिचा विकास-संवर्धन-अभिवृद्धी यासाठी राज्य सरकारला दरवर्षी तीनशे ते पाचशे कोटी रुपयांचे अनुदान मिळते. महाराष्ट्र सरकारने मराठीसाठी अभिजाततेचा दावा केंद्र सरकारकडे (2012-2013) करून, अटी सिद्ध करण्याचे काम केले. ते काम साहित्यिक-संशोधकांच्या एका अभ्यास समितीने पूर्ण केले. मराठी भाषेने 2013 साली केंद्र शासनाकडे प्रस्ताव सादर केल्यानंतर अकरा वर्षांनी मराठीला तो दर्जा प्राप्त झाला आहे. मराठीसोबत अजून चार भाषांना तो दर्जा त्याच दिवशी मिळाला. मग मराठी ही देशातील सातवी अभिजात भाषा की अकरावी? भारताच्या राज्यघटनेने मान्यता दिलेल्या बावीस भाषांपैकी अकरा म्हणजे अर्ध्या भाषा आता अभिजात ठरल्या आहेत...
लेणी कोंडाण्याची (Cave Sculpture of Kondana)
कोंडाणे लेणी रायगड जिल्ह्यात कर्जत तालुक्यात त्याच नावाच्या गावात आहेत. बोरघाटातील राजमाची किल्ल्याच्या पायथ्याशी घनदाट अरण्य आहे. मोठे वृक्ष, महाकाय वेली आणि जंगली श्वापदे यांचा वावर तेथे असतो. त्यात वृक्षवेलींच्या-झाडझाडोऱ्यांच्या गुंत्यात लपल्या होत्या कोंडाणे लेण्यांच्या अप्रतिम शिल्पकृती. लेणी इसवी सनापूर्वी पहिल्या-दुसऱ्या शतकांत साकारण्यात आली. परंतु ती लेणी किर्र रान, मुसळधार पाऊस आणि भूकंप यांनी झालेली पडझड यांमुळे ओसाड होऊन गेली आणि विस्मृतीच्या पडद्याआड सारली गेली...
भगवानलाल इंद्रजी (Bhagwanlal Indraji)
पंडित भगवानलाल इंद्रजी (1839 - 1888) हे नाव सर्वसामान्य वाचकांना माहीत नसते. तसे ते माहीत असण्याचे कारणही नाही. भगवानलाल इंद्रजी हे मुळचे जुनागढचे. ते पुरातत्त्वशास्त्रज्ञ, शिलालेखांचे संशोधक आणि पुराणवस्तूंचे संग्राहक होते. ते मुळचे गुजरातचे असले तरी त्यांनी बरेचसे काम डॉ. भाऊ दाजी लाड यांच्याबरोबर केले. त्यांनी भारतभरच्या ब्राह्मी लिपीतल्या इतर असंख्य शिलालेखांचे वाचन केले आहे. पण त्यांचे नाव कायमचे जोडले गेले आहे ते रुद्रदमनच्या गिरनार येथील अडीच हजार वर्षांपूर्वीच्या शिलालेखाशी ! भगवानलाल इंद्रजींनी डॉ. भाऊ दाजी लाड यांचे साहायक म्हणून अनेक वर्षे काम केले. भाऊ दाजी यांनी त्यांच्या संशोधनासाठी, प्रवासासाठी, उत्खननासाठी निधी उपलब्ध करून दिला...