Home Search

भटकंती - search results

If you're not happy with the results, please do another search
carasole

नारायण गोविंद चापेकर यांची ‘हिमालया’त भटकंती

0
‘हिमालयात’ हा ‘बदलापूर’कर्ते ना.गो. चापेकर यांनी हिमालयात केलेल्या प्रवासाचा वृतांत. ते त्यांच्या लेखनकार्यातील अखेरचे असे आणि एकूण अकरावे पुस्तक. चापेकर ही माहिती प्रस्तावनेच्या सुरुवातीसच...

खंडाळा घाटातील आडवाटा, गडकिल्ले

मुंबई-पुणे प्रवास करत असताना खंडाळा घाटातील सौंदर्य कोठल्याही ऋतूत नेहमीच भुरळ घालते. विशेष करून रेल्वेने प्रवास करत असताना घाटात सामोऱ्या येणाऱ्या सह्याद्रीच्या भव्यतेच्या जाणिवेने मन हरखून जाते. मी हा प्रवास खूपदा केला आहे. त्या प्रवासात ठाकूरवाडी, मंकी हिल, नागनाथ, जामरुंग अशी रेल्वेची लहानशी उपस्थानके किंवा तांत्रिक थांबे आहेत. दुर्गम घाटात, जंगलात त्या स्थानकांचे प्रयोजन काय हा प्रश्न पडत असे. घाटात बोगद्याच्या डोंगरावर एक गुहा आहे. त्या गुहेत नागनाथाचे छोटेसे देऊळ आहे. घाट परिसरातील दुर्गवैभव म्हणता येईल अशा राजमाची किल्ला, ढाक किल्ला, नागफणी डोंगर या सर्वश्रुत ठिकाणी तर गेलो; तसेच, त्या परिसरातील आडवाटा जिज्ञासेपोटी पालथ्या घातल्या...

आनंदप्रवासी रवींद्र पिंगे

3
रवींद्र पिंगे हे मराठीतील नेटाने, सातत्याने, उमाळ्याने लेखन करणारे साहित्यिक होत. त्यांनी मुख्यतः ललित लेखन केले. त्यांनी कथा-कादंबरी हे वाङ्मयप्रकारही हाताळले आहेत; पण ते वाचकप्रिय ठरले ते त्यांच्या छोटेखानी, प्रसन्न, उत्कट ललित लेखनामुळे. पिंगे यांनी पन्नासहून अधिक वर्षे, कोऱ्या कागदाच्या हाका ऐकत लेखणीचे वल्हे डौलाने वल्हवले. ‘दिसामाजी काहीतरी लिहावे’ हे समर्थ रामदासांचे सांगणे पिंगे यांच्याइतके कोणी मनावर घेतले नसेल. ते ‘लिहा, सतत लिहीत राहा’ असे ‘पेर्ते व्हा’च्या चालीवर सांगत असत आणि त्यांनी स्वतःही लिहिण्याचा तो वसा जपला...

पाऊस पहावा‌ (Enjoying Rains)

पावसाळा हा सृजनाचा, आनंदाचा ऋतू. प्रत्येक माणसाच्या मनात पावसाच्या काही खास आठवणी असतात. मित्रमैत्रिणींबरोबर केलेल्या पावसाळ्यातल्या भटकंतीच्या, धबधब्यांच्या, सह्याद्रीतील दऱ्याखोऱ्यांच्या, हिरवाईच्या आणि क्वचित निसर्गाच्या कोपाला एकत्र येऊन तोंड देण्याच्याही. जसजसा काळ जातो तसतशा या आठवणी अधिक गहिऱ्या होत जातात. भारतासारख्या कृषीप्रधान देशात ग्रामीण भागात पावसाची अशी एक खास परिभाषा, पावसाविषयी ठोकताळे आहेत. ते जाणून घेण्यात मजा आहे. सध्या पावसाने संततधार धरली आहे. अशा या बाहेरच्या पावसाविषयीचा डॉ. मंजूषा देशपांडे यांचा ललित लेख ज्याच्यात्याच्या मनातल्या पावसाच्या आठवणी हमखास जाग्या करेल...

साल्हेर आणि मुल्हेर किल्ले (Salher and Mulher Forts)

1
नाशिक जिल्ह्यातल्या सटाणा तालुक्यातले साल्हेर आणि मुल्हेर हे दोन आवळे जावळे किल्ले, महाराष्ट्र आनि गुजरातच्या सीमेवर वसलेले आहेत. पैकी साल्हेर हा महाराष्ट्रातला सगळ्यात जास्त...

कुमार शिराळकर – महाराष्ट्राचे चे गव्हेरा

कुमार शिराळकर या डाव्या विचारांच्या तरुण तडफदार कार्यकर्त्याबाबत दोन लेख आहेत. पहिला शहादा – धुळे येथील श्रीनिवास नांदेडकर व वसंतराव पाटील या कार्यकर्त्याचा व दुसरा मुंबईतील विदुषी छाया दातार यांचा. कॉम्रेड कुमार शिराळकर हे सांगली जिल्ह्यातील मिरजेचे. त्यांचा जन्म 10 जानेवारी 1942 रोजी मिरज येथे झाला...

कोल्हापूर-गगनबावड्याचे मोरजाई पठार !

मोरजाई परिसरातील भटकंती म्हणजे महाराष्ट्राच्या मातीचा, पर्वतांचा, संस्कृतीचा, पाण्याचा, अरण्यांचा, स्थापत्यांचा अस्सल अनुभव ! तो अनुभव इतिहासातही जिवंत असण्याचा भाव निर्माण करू शकतो. कोल्हापूर-गगनबावडा रस्त्यावर आसळज गावापासून तीन-चार किलोमीटर डावीकडील बाजूस सह्याद्रीच्या कुशीत लपलेला एक ओढा आहे. मुख्य रस्ता सोडून थोडे आत... गर्द वनराई, निवळशंख पाणी आणि त्यासोबत काही हिनयान पंथीय छोटी, पण टुमदार लेणी असे ते विलक्षण नैसर्गिक पण माणसाचा यथायोग्य हस्तक्षेप झालेले ठिकाण आहे...

बुद्धीसवे भावना ! (Emotional quotient is necessary part of logical thinking)

0
सद्भाव मनात असणे ही सहज प्रक्रिया आहे. तो शोधण्यासाठी काहीतरी अद्वितीय करण्याची किंवा त्याचा पाठलाग करण्याची आवश्यकता मुळीच नसते. अवतीभवती घडणाऱ्या छोट्या छोट्या प्रसंगांतूनदेखील व्यक्तीवर सद्भावनेचा सखोल परिणाम होत असतो. प्रवासात भेटणारी माणसे, प्राणी-पक्षी-वनस्पती यांना समजून घेण्यासाठी किंवा प्रसंग सहृदयतेने टिपण्यासाठी हवे संवेदनशील मन. त्या मनाला समानानुभूतीने विचार करण्याची क्षमता हवी, जागरूकता हवी आणि समजून घेण्याची कुवतही हवी. तसे संवेदनक्षम मन आणि घटना व व्यवहार यांच्याकडे बघण्याची सजगता असेल, तर कितीतरी गोष्टी शिकवल्या जातात असे सांगणारा स्वप्रचीतीने प्रकट झालेला नीलिमा खरे यांचा हा लेख...

वैभवशाली वसई आणि घाटी लोकसंस्कृती (How Western Maharashtra’s ‘ghati’ people influenced Vasai’s mainly Christian...

वसईच्या एकूण लोकसमुदायामध्ये घाटी म्हणजे देशावरील माणसे बहुत आहेत. तशी पंचवीस हजारांपेक्षा जास्त कुटुंबे त्या भागात असावीत असा अंदाज आहे. ते लोक मुख्यत: सातारा जिल्ह्याच्या माणदेशातील आहेत. ते गेल्या दोन-तीन शतकांपासून तेथे वास्तव्यास येत गेलेले आहेत. ते लोक मेंढपाळ म्हणून भटकंती करत ठाणे जिल्ह्यामध्ये प्रथम आले व पुढे येऊन वसईत स्थिरावले. वसई ही त्यांच्या पारंपरिक लोकगीतांमध्ये वत्सापूर, बांदुपुरा, बहादुरपुरा, गुलछनाबाद आणि बाजीपूर अशा नावांनी आलेली दिसते...

धनगरी लोककलांच्या संवर्धनाचा अनोखा अविष्कार

धनगरी लोककला संवर्धनासाठी एक दिवसाचे शिबिर कोल्हापूरजवळ कसबा बावडा येथे झाले. धनगरी लोककलांमधील पंचवीसाहून अधिक प्रकार सुमारे अडीचशे कलाकारांनी सादर केले. तो अनोखा व अफाट आविष्कार ठरला. तीन संस्थांनी एकत्र येऊन एवढा मोठा घाट घातला होता. हालमत सांप्रदाय मंडळ (कुपवाड), शिवाजी विद्यापीठाचे राजर्षी शाहू लोक संस्कृती केंद्र आणि कसबा बावडा येथील बिरदेव धनगर समाज मंडळ या त्या तीन संस्था...