Home Search
पत्रकार - search results
If you're not happy with the results, please do another search
बाळशास्त्री जांभेकर यांची पत्रकारिता व विविध कामगिरी
जांभेकर हे पश्चिम भारतातील प्रबोधनाचा पाया घालणारे आद्य विचारवंतही मानले जातात. प्रबोधनाचे ते त्यांचे कार्य थोर आहे. बाळशास्त्री जांभेकर यांनी अवघ्या चौतीस वर्षांच्या आयुष्यात पत्रकारिता, शिक्षण, इतिहास, पुरातत्त्व संशोधन, पाश्चिमात्य ज्ञान विज्ञान, सामाजिक व धार्मिक जागृती व सुधारणा, शालेय पाठ्यपुस्तके, गद्य-पद्य इत्यादी क्षेत्रांत महत्तम कार्य केले आहे...
देवर्षी नारद : आद्य पत्रकार
देवर्षी नारद यांना आद्य पत्रकार म्हणतात, कारण त्यांचा संचार त्रिभुवनात असे आणि त्यांचे लक्ष तिन्ही लोकांमध्ये कोठे काय घडत आहे यावर बारकाईने असे. जे...
निखिल वागळेची सच्ची पत्रकारिता
पत्रकारामध्ये जर सामाजिक भान प्रखर असणारा निर्भीड कार्यकर्ता दडलेला असेल तर ती पत्रकारिता अधिक परिणामकारक होते. निखिल वागळे हे त्या विधानाचे मूर्तिमंत रूप! ते...
सेवालय, पत्रकार आणि प्रजासत्ताक…
लातूरपासून काही किलोमीटर अंतरावरील हसेगाव या गावाच्या शिवारात रवी बापटले या तरुणाने एच.आय.व्ही.ग्रस्त मुलांसाठी ‘सेवालय’ हा आश्रम सुरू केला. त्या मुले-मुली मिळून...
‘थिंक महाराष्ट्र’: भविष्यकाळातल्या पत्रकारितेची ‘नवी तुतारी’!
वृत्तपत्रामधल्या बातम्या हा संगणक विज्ञानाच्या भाषेमध्ये ‘रॉ डेटा’ असतो. त्याच्यावरून नुसती नजर फिरवली तरी पुरते. त्याचे स्पीड रिडिंग होऊ शकते. स्पीड रिडिंगमध्ये वाचताना...
हरवलेले सांस्कृतिक जग पुन्हा आणता येईल ! – परिचर्चा
जग अनिश्चिततेच्या भोवऱ्यात सापडले आहे. उजवी आणि डावी अशा दोन्ही विचारसरणी कालबाह्य ठरत आहेत. अशा वेळी नव्या सिद्धांताची/इझमची गरज तीव्रतेने जाणवते असे प्रतिपादन लेखक-कवयत्री नीरजा यांनी ‘हरवलेले सांस्कृतिक जग पुन्हा आणता येईल !’ या परिचर्चेत बोलताना केले. नाटककार सतीश आळेकर यांनी नव्या उमेदीच्या, दिशादर्शक काही चांगल्या कलाकृती घडताना दिसतात असे सोदाहरण सांगितले. ते म्हणाले, की नव्या जगाच्या खुणा अशा नाटकांत व नव्या कवितांत सापडू शकतील. ते दोघे ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’च्या वार्षिक दिनी योजलेल्या परिचर्चेत बोलत होते. त्यांच्या खेरीज ‘अंतर्नाद’चे (डिजिटल) संपादक अनिल जोशी आणि तरुण कवी आदित्य दवणे यांचा चर्चेत सहभाग होता...
सांस्कृतिक जग कोठे हरवले?
महाराष्ट्राचे संस्थाजीवन औपचारिक झाले आहे का? जुन्या संस्थांचे नित्याचे कार्यक्रम नियमित होत असतात. प्रकाशन समारंभांसारखे प्रासंगिक कार्यक्रम मोजक्याच श्रोत्यांच्या उपस्थितीत कौटुंबिक हौस-मौज वाटावी अशा तऱ्हेने घडून जातात. कौतुकाच्या समारंभांत उपचार अधिक असतो आणि वाद-टीका, उलटसुलट वार-प्रतिवार असे काहीच सार्वजनिक जीवनात घडताना दिसत नाही. माणसा माणसांतील स्नेह, जिव्हाळा ओलाव्याने व्यक्त होतानाही जाणवत नाही. ज्या बातम्या समोर येतात त्या अत्याचारादी विकृतीच्या आणि राजकारणातील गुन्हेगारीच्या. त्यांतील कट-कारस्थाने पाहिली की दीपक करंजीकरांच्या कादंबऱ्यांची आठवण येते. समाजातील चैतन्य हरपले कोठे आहे?
लिबरल आर्ट्सचा अभ्यास – नवे आव्हान
लिबरल आर्ट्स ही शाखा महाविद्यालयीन अभ्यासक्रमात नव्याने उदयास आली आहे आणि फोफावत आहे. प्रतिष्ठाप्राप्त महाविद्यालये, विद्यापीठे आणि नव्याने उदयास आलेली खाजगी विद्यापीठे यांनी लिबरल आर्ट्स हा मुक्त अभ्यासक्रम दशकभरापूर्वी सुरू केला. ज्ञानशाखांची नावे काळाप्रमाणे बदलत राहतात. पूर्वी या शाखेस ढोबळपणाने कला (आर्ट्स) किंवा काही ठिकाणी मानव्यविद्या शाखा असे म्हटले जाई. त्यात फरक होता - त्या शिक्षणक्रमास मर्यादा होती. पण आता, त्यांच्याऐवजी बारावी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर लिबरल आर्ट्स शाखेमध्ये प्रवेश घेण्याचा विद्यार्थ्यांचा ओढा दिसू लागला आहे. गेल्या दशकभरात प्रथम वर्ष पदवीला नव्वद टक्के गुणांना प्रवेश बंद होत आहेत. बदलत्या काळात ज्ञानशाखांच्या कक्षा रुंदावल्या. पालकांच्या व मुलांच्या दृष्टिकोनात बदल झाला...
मतदान केले; लोकांचे काम संपले ! (Right to Recall is a must in Democracy)
भारत हे सर्वांत मोठे लोकशाही राष्ट्र आहे असे सर्वलोक अभिमानाने बोलतात. ‘लोकशाहीचा उत्सव’ हा शब्दप्रयोग 2019 च्या निवडणुकीपासून प्रचारात आला. त्यामुळे एक घोटाळा झाला, की निवडणुका या दिवाळी/होळीसारख्या साजऱ्या होऊ लागल्या. गेली पाऊणशे वर्षे हे चालू आहे. तरीही देशातील जनतेच्या साध्या साध्या समस्या सुटलेल्या नाहीत. ‘आम्ही तुम्हाला कशाला निवडून दिले? पुरे झाली तुमची आमदारकी/ खासदारकी! आता घरी बसा!’ असे शब्द जरी कोणाच्या ओठांवर आले तरी ते उच्चारले जाऊ शकत नाहीत, उच्चारले तरी त्यांचा काही उपयोग होत नाही. कारण एकदा निवडून दिलेल्या उमेदवारांचे प्रतिनिधित्व कोणत्याही कारणाने रद्द करण्याचे अधिकार निवडून देणाऱ्या नागरिकांच्या हातात नाहीत ...
पहिली सिग्नल शाळा ठाण्यात ! (Innovative Signal School in Thane)
ठाणे शहरातील तीन हात नाक्यासह विविध सिग्नलवर भटक्या-विमुक्त जमातींतील शंभराहून अधिक मुले पुलाखाली आश्रय घेऊन राहत होती. पैकी तीन हात नाक्यावरील मुलांचे तेथील वास्तव्य संपुष्टात आले. मुलांचे वडील तेथेच वाढले. मुलांचे जन्म आणि बालपण पुलाखालीच गेले. खरे तर, असे दृश्य एकट्या ठाणे शहरात नसून अशी शेकडो मुले भारतातील प्रत्येक महानगरामध्ये जगत असतात. सरकार शिक्षणप्रसारासाठी अनेक मोहिमा करत असते. तथापी शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक व आर्थिक दृष्ट्या मागास राहिलेली ही मुले मुख्य धारेच्या शाळांमध्ये प्रवेश घेण्यास अपात्र ठरतात. अशा वेळी, ठाण्याच्या काही कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांतून ‘समर्थ भारत व्यासपीठ’ या सामाजिक संस्थेची ‘सिग्नल शाळा’ सुरू झाली...