Home Search
नेहरू - search results
If you're not happy with the results, please do another search
जवाहरलाल नेहरू आणि सोलापूरचा मि. वेडी
जवाहरलाल नेहरू यांनी ‘भारताला संपूर्ण स्वातंत्र्य हवे’ अशी मागणी करणारा ठराव मांडला, तो लाहोर काँग्रेसमध्ये एकमताने मंजूर झाला. तेव्हा एकीकडे सविनय कायदेभंगाच्या चळवळीने उग्ररूप धारण केले, तर दुसरीकडे जवाहरलाल यांना अटक झाली. जवाहरलाल कैदेत सापडल्याने देशभरातील तरुण वर्ग प्रक्षुब्ध झाला. त्यातूनच सोलापूरच्या हाजूभाई चौकात कलेक्टरला खुनाची धमकी देणारे पत्र चिकटवलेले सापडले. त्या पत्राखाली पत्रलेखक म्हणून ‘मि. वेडी’ अशी सही होती…
गाडगेबाबांची मंतरलेली पत्रे – सार्वजनिक त्यागाची गीता (Gadgebaba’s letters are treasure of India’s value...
1926 ते 1956 असा साधारणपणे तीस वर्षांचा पत्रप्रपंच, म्हणजे ‘सार्वजनिक त्यागाची गीता’ आहे असेच म्हणावे लागेल. बाबांच्या पत्रांतून त्यांच्या कार्याबरोबर व्यक्तिमत्त्वाचे दर्शन होते. त्यांच्या पत्रसंग्रहात त्यांचा संपूर्ण आयुष्यक्रम गोवलेला आहे. ते जितके त्यागी-तितकेच संसारी, जितके ममताळू- तितकेच कठोर, जितके विरक्त-तितकेच संग्राहक, व्यावहारिक व प्रापंचिक वृत्तीने जितके सरळ- तितकेच कोणाबरोबर कोठे नि काय नि किती बोलावे याचे तारतम्य त्यांच्याजवळ होते. त्यांच्या पत्रांतून वाचकासमोर स्वच्छता, व्यवहारकुशलता, गुणग्राहकता, धार्मिक वृत्ती, कृतज्ञता, निराग्रही स्वभाव, तळमळ असा विविधांगी ‘इंद्रधनू’ उभा होतो...
छेदी जगन – आधुनिक गायानाचे शिल्पकार (Chhedi Jagan – Architect of Modern Guyana)
वेस्ट इंडिजमधील गायाना, त्रिनिदाद हे देश भारतीय लोकांना क्रिकेटमुळे परिचित आहेत. व्ही. एस. (विद्याधर सुरजप्रसाद) नायपॉल हे मूळ भारतीय होते. ते त्रिनिदादचे नोबेल विजेते लेखक होते. त्यांची पुस्तके भारतात विशेष लोकप्रिय झाली होती. मागील पिढीतील क्रिकेटचे फिरकी गोलंदाज सुभाष गुप्ते हेदेखील त्रिनिदादमध्ये स्थायिक झाले होते. छेदी जगन हे गायानाचे पहिले पंतप्रधान मूळ भारतीय वंशाचे होते...
अचलपूरचे एकशेतीस वर्षांचे वाचनालय (One hundred and thirty year old library of Achalpur)
बाबासाहेब देशमुख यांनी अचलपूर शहरात गेल्या शतकारंभी अनेक संस्था स्थापन केल्या, त्यांतील पहिली ‘सार्वजनिक वाचनालय’ ही होय. त्या संस्थेचा स्थापना दिनांक उपलब्ध नाही. मात्र वाचनालयाच्या सध्याच्या इमारतीची जागा स्थानिक नगरपालिकेने 1893 साली वाचनालयास दिल्याचा उल्लेख आहे. वाचनालयास शहराच्या मध्यभागात प्रशस्त जागा मिळाली, परंतु साजेशी इमारत नव्हती. त्याकरता बाबासाहेब देशमुख यांनी पुढाकार घेतला. त्यांनी स्वतः बरीच वर्षे वाचनालयाचे काम पाहिले...
फलटणचे मालोजीराजे : रयतेचा राजा (Malojiraje of Phaltan : King of the Farmers)
फलटण हे पुण्याजवळचे संस्थानी छोटे गाव, पण ते सांस्कृतिक दृष्टया पुण्यासारख्या शहरापासून फार वेगळे वाटत नाही. त्याचे श्रेय मालोजीराजे नाईक निंबाळकर या द्रष्ट्या समाजाभिमुख संस्थानिकाकडे जाते. त्यांचा राज्याभिषेक 15 ऑक्टोबर 1917 रोजी झाला. त्यांनी त्यांच्या हाती राज्य कारभार घेताच, तीन घोषणा दरबारात केल्या- स्त्रियांचे समान हक्क, हरिजनांना दरबारात प्रवेश आणि कुलाचार म्हणून देवीला मांस व मद्य यांच्या नैवेद्याला बंदी. तिन्ही घोषणा केवढ्या पुरोगामी व प्रगल्भ ! त्यावेळी त्यांचे वय होते अवघे एकवीस वर्षे...
ना.ग. गोरे – राजकारणी व साहित्यप्रेमी
समाजवादी नेते नानासाहेब गोरे यांच्या जीवनात कर्मयोग, बुद्धिप्रामाण्यवाद आणि कलात्मकता यांचा विलोभनीय संगम दिसतो. त्यांनी तो संगम सार्वजनिक जीवनात वावरताना साधला होता. त्यांच्या भाषणात, लेखनात, संवादात विचारांचे धागे बांधेसूदपणे अन् कलात्मकतेने विणलेले आढळतात. त्यात बुद्धिप्रामाण्य, तर्कशुद्धता आणि विवेकाचे भान यांचा अनुभव येतो...
आचार्य प्रल्हाद केशव अत्रे
मराठी संस्कृतीचा झळाळता प्रासाद राजकारण, समाजकारण, नाटक, वक्तृत्व आणि पत्रकारिता या पाच प्रमुख स्तंभांवर तोललेला आहे. महाराष्ट्रात कर्तृत्वसंपन्न व्यक्ती त्या एकेका क्षेत्रात होऊन गेलेल्या आहेत. पण एकाच व्यक्तीच्या अंगी हे सारे पैलू असलेली प्रतिभावान व्यक्ती म्हणजे प्रल्हाद केशव अत्रे ...
‘नाटो’ बरखास्त करणे हाच उपाय
नाटो म्हणजे ‘नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन’ या संघटनेची स्थापना 1949 साली झाली. दुसऱ्या महायुद्धानंतर स्थापन झालेल्या या संघटनेचा मुख्य उद्देश हा सोव्हिएत युनियनच्या वाढत्या व्याप्तीला मर्यादा घालणे हा होता. सोव्हिएत युनियनच्या विघटनानंतर शीतयुद्धाचा शेवट झाल्यामुळे ‘वॉर्सा पॅक्ट’ नष्ट झाला. तर मग आता ‘नाटो’ ची गरज काय?...
प्रभाकर कंदिलवाले – ओगले
विजेची निर्मिती महाराष्ट्रात बाल्यावस्थेत होती तेव्हा एक मोठा आधार होता तो म्हणजे कंदिलाचा. त्याचा प्रभाकर ब्रँड ही जणू महाराष्ट्रीयत्वाची निशाणी ठरली ! अनेक जणांच्या परीक्षा त्या कंदिलांनी यशस्वीपणे पार पाडल्या. छोट्या छोट्या गल्ल्यांमध्ये, वाड्यांमध्ये पेटलेल्या कंदिलानी घरांतील, दुकानांतील व्यवहार उजळून काढले. त्या प्रभाकर कंदिलाचे निर्माते होते गुरुनाथ प्रभाकर ओगले...
राष्ट्रपतीपदाचे कलंदर उमेदवार कर्तारसिंग
काही वर्षांपूर्वी राष्ट्रपतीपदाची निवडणूक जाहीर झाली, की वर्तमानपत्रांत कर्तारसिंग यांचे नाव गाजत असे. कारण राष्ट्रपतीपदाच्या पहिल्या निवडणुकीपासून पुढील अनेक निवडणुकांपर्यंत इच्छुक उमेदवारांत कर्तारसिंग थत्ते आघाडीवर असत. त्यांचे नाव कर्तारसिंग असे असले तरी ते होते महाराष्ट्रीयन... मराठी व्यक्ती... लक्ष्मण गणेश थत्ते !