-
प्रत्येक मराठी माणसाने त्याच्या/तिच्या परिसराची सत्य माहिती द्यावी –
- कर्तबगार व्यक्ती - उपक्रमशील संस्था
- संस्कृतीचे वैभव – यात्रा, जत्रा, बाजार, किल्ले, लेणी... अगदी स्थानिक खाद्यपदार्थसुद्धा.
हे लिहून द्यावे, टिपावे, फोटोग्राफ, व्हिडिओत बद्ध करावे, ऑडिओ आधारे श्रवणपरंपरा जपावी... क्राऊड सोअर्सिंग हा लोकशाही यशाचा मंत्र आहे. (लिहिण्याकरता – लिंक) प्रत्येक जाणत्या, समंजस, संवेदनशील, विचारी माणसाने त्यचा भवताल याप्रमाणे टिपला तर महाराष्ट्राच्या संस्कृतीचा केवढा तपशीलवार व सूक्ष्म ‘डेटा’ संग्रहित होईल ! त्याची संगती शोधणे, अर्थ लावणे हे विद्वानांना मोठे काम होईल !
प्रत्येक मराठी माणसाने त्याचे किमान फक्त एक हजार रुपये या प्रकल्पास सहाय्य करावे. तर प्रकल्प पाच वर्षांत साकार होईल आणि तेव्हा संगणकाच्या/मोबाईलच्या पडद्यावर जणू महाराष्ट्राचे म्युझियम साकारलेले असेल. एका क्लिकवर महाराष्ट्राबाबत हवी ती माहिती उपलब्ध होईल. पक्षीय राजकारण व गुंडगिरी वगळून. तुमच्या सहकार्याविना ते स्वप्न अधुरे राहील.
कृती - ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’वर दोन नवीन माहितीपर लेख रोज प्रसिद्ध करावे अशी मनीषा आहे. ते मुख्यत: व्यक्ती - संस्था - संस्कृतिवैभव या तीन प्रकारांत व तालुका हे माहितीसंकलन केंद्र समजून संकलित केलेले असतील. -
मराठी संस्कृती आणि विद्यमान मराठी कर्तबगारी यांची माहिती तालुक्या तालुक्यांतून संग्रहित करून अवघ्या महाराष्ट्राचे समग्र चित्र साकार करू पाहणारा ध्येयनिष्ठ प्रकल्प.
सांस्कृतिक जग कोठे हरवले?
महाराष्ट्राचे संस्थाजीवन औपचारिक झाले आहे का? जुन्या संस्थांचे नित्याचे कार्यक्रम नियमित होत असतात. प्रकाशन समारंभांसारखे प्रासंगिक कार्यक्रम मोजक्याच श्रोत्यांच्या उपस्थितीत कौटुंबिक हौस-मौज वाटावी अशा तऱ्हेने घडून जातात. कौतुकाच्या समारंभांत उपचार अधिक असतो आणि वाद-टीका, उलटसुलट वार-प्रतिवार असे काहीच सार्वजनिक जीवनात घडताना दिसत नाही. माणसा माणसांतील स्नेह, जिव्हाळा ओलाव्याने व्यक्त होतानाही जाणवत नाही. ज्या बातम्या समोर येतात त्या अत्याचारादी विकृतीच्या आणि राजकारणातील गुन्हेगारीच्या. त्यांतील कट-कारस्थाने पाहिली की दीपक करंजीकरांच्या कादंबऱ्यांची आठवण येते. समाजातील चैतन्य हरपले कोठे आहे?
व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन चा सद्भावना दिवस
‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’तर्फे सद्भावना दिवस दरवर्षी मार्च महिन्याच्या अखेरीस साजरा केला जातो. यावर्षी देखील फाउंडेशनच्या संस्कृतिकारणाच्या उद्देशाला धरून परिसंवाद-मुलाखती असे कार्यक्रम शनिवार, 22 मार्च 2025 ला योजले आहेत. त्यात सतीश आळेकर, नीरजा, ‘अंतर्नाद’चे संपादक अनिल जोशी, मिलिंद बल्लाळ, कवी आदित्य दवणे अशा मान्यवरांचा समावेश आहे. तेवढ्याच महत्त्वाची आणखीही एक गोष्ट त्या मुहूर्तावर साधत आहोत. ती म्हणजे गिरीश घाटे रचित व्ही. शांताराम यांच्यावरील संकेतस्थळाचे उद्घाटन. ते नाट्य व चित्रपट अभिनेत्री सुहास जोशी यांच्या हस्ते होणार आहे. किरण शांताराम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत...
शाळाबाह्य मुलांची उमेद वाढवणारा संकल्प !
आई-वडिलांची बळजबरी आणि भीती यापोटी सिग्नल, रेल्वे स्थानक, मॉल अशा ठिकाणी आणि अगदी रस्त्यावरदेखील कित्येक लहान मुले फुगे, गजरे, खेळणी विकताना; तसेच, भीक मागताना दिसतात. मंगेशी मून या महिला कार्यकर्तीने तशा मुलांसाठी मुंबईतून ‘उमेद संकल्प’ संस्थेअंतर्गत कामाला सुरुवात 2015 साली केली. त्यानंतर अवघ्या दहा वर्षांत, त्यांनी त्यांच्या वडिलांच्या विदर्भातील वर्ध्यात ‘रोठा’ या गावी अकरा एकरांमध्ये वसतिगृह बांधले. तेथे राहून निराधार सत्तर मुले पहिली ते बारावीपर्यंतचे शिक्षण घेत आहेत. त्याखेरीज पुण्याच्या कोथरूड भागात भाड्याच्या इमारतीत तसेच वसतिगृह आहे. तेथे मुलेमुली राहतात...
नवे लेख
आवाहन
लोकप्रिय लेख
पर्वतातील गाव – वसईचे गिरीज !
गिरीज हे पालघर जिल्ह्याच्या वसई तालुक्यातील नयनरम्य ठिकाण. तेथे बऱ्याच टेकड्या पोर्तुगीजपूर्व काळात होत्या. काही उंच, काही ठेंगण्या. त्या सर्व लहानमोठ्या टेकड्यांमध्ये वसलेले गाव म्हणून त्याचे नाव गिरीज. ‘गिरी’ म्हणजे पर्वत आणि ‘ज’ म्हणजे जन्मलेले. पर्वतातील गाव गिरीज ! पोर्तुगीज वसाहतवादी वसईत सुमारे साडेपाचशे वर्षांपूर्वी आले. त्यांनी शेषवंशी क्षत्रिय भंडारी भोंगाळे राज्याची वसई खाडीवरील गढी जिंकली. पोर्तुगीज सोजिरांची नजर आजुबाजूच्या गावांवरही गेली. त्यांतील एक गाव गिरीज...

सद्भावनेचे व्यासपीठ
व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशनचे प्रकल्प