जेजुरीला जाऊन आलो. मनात राहिली ती फक्त हळद आणि भव्य दगडी दीपमाळा! त्याचबरोबर वाटेवर बसलेले लोक आणि डोंगरावरून दिसणारा परिसर याही गोष्टी लक्षात राहतात. खंडोबा मात्र आठवत नाही. याचं कारण त्याच्या दर्शनासाठी लावलेली लांबलचक रांग! आणि त्यानंतर झालेलं देवाचं ओझरतं दर्शन. ते झालं की जो तो पायर्या उतरून आपल्या मार्गी लागतो.
– प्रकाश पेठे
जेजुरीला जाऊन आलो. मनात राहिली ती फक्त हळद आणि भव्य दगडी दीपमाळा! त्याचबरोबर वाटेवर बसलेले लोक आणि डोंगरावरून दिसणारा परिसर याही गोष्टी लक्षात राहतात. खंडोबा मात्र आठवत नाही. याचं कारण त्याच्या दर्शनासाठी लावलेली लांबलचक रांग! आणि त्यानंतर झालेलं देवाचं ओझरतं दर्शन. ते झालं की जो तो पायर्या उतरून आपल्या मार्गी लागतो.
देवाचं असंच असतं. देव गर्दीत नसतो. तुम्ही तिरुपतीला जा, नाहीतर पंढरपूरला जा.
‘सुंदर ते ध्यान उभे विटेवरी’ आपल्यासाठी नसतं. ते सुंदर ध्यान पाहायला सवड मिळत नाही. तरीसुध्दा हजारो, लाखो लोक ऑफिसांतून सुट्ट्या काढून, घरसंसार दूर ठेवून ओढीने देवदर्शनाला जात असतात.
त्यामुळे वाटते की देव म्हणजे गौडबंगाल आहे
देव आहे हे सांगणारे त्याला दाखवू शकत नाहीत.
तो आहे असं मानणारे त्याला अशा स्वरूपात उभा करतात की वाटतं कल्पनांमधे का होईना देव आहे. तो रम्य आविष्कारात इथेतिथे भेटतो. मग तो खंडोबा असो की वेरूळचा कैलास.
देव नाही हे म्हणणारे तसे पटवून देऊ शकत नाहीत.
त्यामुळे तुम्ही-आम्ही देव आहे की नाही या फंदात न पडलेले बरे.
मग आपल्या हाती काय उरते?
महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबासंबंधीच्या संकेतस्थळास भेट देण्यासाठी येथे क्लिक करा
प्रकाश पेठे–भ्रमणध्वनी: 094377 86823, इमेल – pprakashpethe@gmail.com
दिनकर गांगल हे ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ या वेबपोर्टलचे मुख्य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्यांनी पुण्यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्यांनी आकारलेली ‘म.टा.’ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्यांना ‘फीचर रायटिंग’ या संबंधात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय (थॉम्सन फाउंडेशन) पाठ्यवृत्ती मिळाली आहे. त्याआधारे त्यांनी देश विदेशात प्रवास केला.
गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्यासारख्या व्यक्तींच्या साथीने ‘ग्रंथाली’ची स्थापना केली. ती पुढे महाराष्ट्रातील वाचक चळवळ म्हणून फोफावली. त्यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी ‘ग्रंथाली’च्या ‘रुची’ मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत ‘ग्रंथाली’ची चारशे पुस्तके त्यांनी संपादित केली. त्यांनी संपादित केलेल्या मासिके-साप्ताहिके यांमध्ये ‘एस.टी. समाचार’चा आवर्जून उल्लेख करावा लागेल. गांगल ‘ग्रंथाली’प्रमाणे ‘प्रभात चित्र मंडळा’चे संस्थापक सदस्य आहेत.
साहित्य, संस्कृती, समाज आणि माध्यमे हे त्यांचे आवडीचे विषय आहेत. त्यांनी त्यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि ‘स्क्रीन इज द वर्ल्ड’ अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्यांना महाराष्ट्र सरकारचा ‘सर्वोत्कृष्ट वाङ्मयनिर्मिती’चा पुरस्कार, ‘मुंबई मराठी साहित्य संघ’ व ‘मराठा साहित्य परिषद’ यांचे संपादनाचे पुरस्कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल ‘यशवंतराव चव्हाण’ पुरस्कार लाभले आहेत.