एकोणिसावे शतक संपत आले होते. हैदराबाद राज्यातील हिंदू जनतेचे आत्मतेज जागृत करून विविध क्षेत्रात त्यांना कार्य प्रवृत्त करण्याचे महत्त्वाचे काम करणाऱ्या पहिल्या फळीतील एक नेते होते न्यायमूर्ती केशवराव कोरटकर. त्यांच्या सहकार्याने येथे मराठी शाळा सुरू झाली. 'निजाम विजय'सारखे वर्तमानपत्र निघाले. मराठी ग्रंथ संग्रहालयाची स्थापना झाली. त्यांनी विधवा पद्धतीला विरोध करत स्त्री शिक्षणाचा आग्रह धरला. हिंदू समाजाला स्वातंत्र्याचे स्वतःचे भान देणाऱ्या केशवराव कोरटकर यांचा परिचय मात्र हैदराबादमधील मराठी लोकांनाही नाही आणि महाराष्ट्रासाठी तर त्यांचे कार्य अपरिचितच आहे...