सचिनने गैर काय केले?

0
11

आशुतोष गोडबोले

      बाळासाहेब ठाकरे यांनी सचिन तेंडुलकरच्या दातृत्वाबाबत केलेली टिप्पणी अनुचित वाटली. सचिनची कमाई अफाट आहे हे कबूल, परंतु तो त्याच्या कर्तृत्वाचा भाग आहे. त्यामधून जो पैसा उभा राहतो, त्यातील काही वाटा …


आशुतोष गोडबोले

     बाळासाहेब ठाकरे यांनी सचिन तेंडुलकरच्या दातृत्वाबाबत केलेली टिप्पणी अनुचित वाटली. सचिनची कमाई अफाट आहे हे कबूल, परंतु तो त्याच्या कर्तृत्वाचा भाग आहे. त्यामधून जो पैसा उभा राहतो, त्यातील काही वाटा समाजाप्रती देण्याची त्याची भावना मोठीच होय! तो शंभर मुलांच्या शिक्षणाचा पूर्ण खर्च उचलतो ही गोष्ट तर मला खूपच महत्त्वाची वाटते. त्याने ती मुले दत्तक घेतल्यासारखीच आहेत.

     त्याला भेट मिळणार्‍या वस्तूंच्या लिलावामधून ही रक्कम उभी राहिली याला बाळासाहेबांचा आक्षेप आहे, तो तर अनाठायी आहे. आजच्या मार्केटच्या जमान्यात प्रत्येक गोष्टीचे मोल पैशांत केले जाते, तसे भावनेचेही आहे. भावना व्यक्त्त करण्याचा मार्ग भेटवस्तू देणे हा समाजमान्य आहे. भेटवस्तू पैशांनीच मिळते. ती भेटवस्तू ज्याला मिळाली त्याच्या प्रतीच्या भावना पुन्हा पैशांतच व्यक्त्त झाल्या, म्हणजे धनवानांनी लिलावात मोठी रक्कम देऊन सचिनच्या वस्तू विकत घेतल्या तर गैर ते काय?

     उलट, माझ्या मनी प्रश्न येतो, की बाळासाहेबांनी त्यांच्या विषयीचा अशा प्रकारचा सद्भाव मोठा निधी उभा करून समाजकार्यासाठी का वापरला नाही? त्या निधीचा त्यांच्या भूमिकेप्रमाणे सदुपयोग करता आला असता. डॉ.नीतू मांडके यांचे हॉस्पिटलचे स्वप्न निधीअभावी अडकले, आणि अखेरीस ते कोकिलाबेन अंबानी यांच्या नावावर करावे लागले, असे तरी घडले नसते. बाळासाहेब यांनी मांडके यांना पैसे उपलब्ध करून न दिल्याने त्यांचे प्रेमाचे शब्द कोरडेच राहिले!

     बाळासाहेब ठाकरे यांच्यासारख्या मान्यवर व्यक्त्ती महाराष्ट्रात वेगवेगळ्या क्षेत्रांत आहेत. त्यांच्याबद्दल समाजात आपुलकी, आत्मीयता आहे. त्या आता मावळतीच्या दिशेला आहेत. त्यांनी त्यांच्या काळात समाजात चांगले काम केले, पण कालौघात, आता त्या संदर्भहीन झाल्या आहेत. त्यांनी त्यांच्याबद्दलचा समाजातील सद्भाव कालानुरूप रोखीत रूपांतर करावा आणि तो निधी, काही भरीव योजना नीटपणे आखून समाजासाठी वापरावा. अशा निधी संकलन मोहिमेत सचिन तेंडुलकर वगैरे तारांकितांनीदेखील सामील व्हावे यासाठी आवाहन असावे.

     मात्र अशी मोहीम शिवसेना वगैरेसारख्या पक्षीय पातळीवर असू नये.

आशुतोष गोडबोले

दिनांक – 02.06.2011

{jcomments on}

About Post Author

Previous articleअनाथांचा नाथ
Next articleसाठाव्या वर्षी पुन्हा कॉलेजमध्ये!
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.