संमेलन अध्यक्ष वेगळ्या नजरेतून 

0
27
_father_dibrito

सुरेश लोटलीकर यांनी रेखाटलेली व्यंगचित्रे वर्तमानपत्रांतून व मासिकांतून गेली पंचवीस-तीस वर्षे प्रसिद्ध होत आहेत. त्यांच्या व्यंगचित्रांतील राजकीय व सामाजिक भाष्य मार्मिक असते. लोटलीकर हे उत्तम ‘कॅरिकेचरिस्ट’ ही आहेत. त्यांनी पुल व गांधी यांची रेखाटलेली कॅरिकेचर्स खूप प्रसिद्धी पावली. त्यांना पुस्तकातही स्थान मिळाले.

लोटलीकर यांची साहित्य संमेलनांच्या अध्यक्षांची कॅरिकेचर्स यापूर्वी संमेलनाच्या प्रदर्शन मंडपात आणि अन्य ठिकाणच्या कलादालनांत मांडली गेली होती. ‘थिंक महाराष्ट्र’ने ती सारी चित्रे एकत्रितपणे वाचक – प्रेक्षकांसमोर आणण्ण्याचे आखले आहेत. उस्मानाबाद साहित्य संमेलनाच्या निमित्ताने रोज एका अध्यक्षाचे चित्र व त्यासोबत अध्यक्षाचा अल्पपरिचय असे साहित्य देण्याचा बेत आहे. त्या मालिकेचा आरंभ उस्मानाबाद संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या चित्रापासून 7 जानेवारी या तारखेला होत आहे. दिब्रिटो यांचे वर्तमानातील स्थान पाहून त्यांच्याबाबत ‘कृतिशील समाजचिंतक फादर फ्रान्सिस दिब्रिटो’ – आणि ‘फ्रान्सि सदिब्रिटो यांचा सृजनाचा मळा’ – हे दोन लेख प्रसिद्ध करत आहोत. वाचकांनी मालिकेमधील चित्रांतील मर्म जाणावे आणि अध्यक्षांच्या अल्पपरिचयातील उणेअधिक कळवावे. संमेलनाध्यक्षांवरील लेख छोटे असतील.

– संपादक
थिंक महाराष्ट्र 

About Post Author