शिरूर-हवेली परिसर स्मृतिवनांनी हिरवागार! (Tree Plantation Spreads in Shirur Industrial Belt)

0
31

 

पुण्याच्या शिरूर हवेली या तालुक्यांतील काही मंडळींनी देशी पद्धतीची झाडे लावण्याचा आणि ती कोणत्याही परिस्थितीत जगवण्याचा प्रयत्न गेली पाच वर्षे चालवला आहे. त्यामधून पर्यावरणप्रेमींना मार्गदर्शक ठरेल असेच काम उभे राहिले आहे. देशी झाडे ऑक्सिजन लंग्ज’ म्हणून तेथे ओळखली जातात. इतकी जाणीवसमृद्धी तेथे आली आहे. त्या टापूत पंचवीस-तीस हजारांची वृक्षराजी नि्माण झाली आहे. त्यासाठी शिरूर तालुक्यात अर्जुन सैद, सागर दरेकर, प्रल्हाद दरेकर आणि परिसरातील इतर तरूणांनी पुढाकार घेतला तर विठ्ठल वळसे पाटील यांनी प्रोत्साहन दिले. विठ्ठलराव पोलिस पाटील पत्रकार आहेत. चंद्रकांत वारघडे या सामाजिक कार्यकर्त्याचा हवेली तालुक्यातील मोहिमेमध्ये मोठा सहभाग आहे. कामाची सुरुवात हवेली तालुक्यातील बकोरी आणि शिरूर तालुक्यातील णसवाडी या डोंगरांपासून उन्हाळ्यात 2015 ला झाली. सहभागी क्षेत्रात आरंभीच तीन हजार वृक्षलागवड करण्यात आलीमुख्य म्हणजे ती तितक्या कसोशीने जगवली गेली. त्यामुळे त्याबाबत लोकांचे औत्सुक्य वाढत गेले.

सणसवाडी (शिरूर तालुका) येथील नरेश्वर मंदिर परिसरात वृक्ष कमी होते. त्या भागात खडकाळ टेकडी आणि डोंगराळ भाग आहे. तेथे मोजकीच झाडे होती. सणसवाडी भागातीतोच बोडका डोंगर वृक्षलागवडीसाठी प्रथम योजला. ती मोहीम सुरू होण्याचे निमित्त ठरली जॉन डियर कंपनी. ती ट्रॅक्टर निर्मितीची बहुराष्ट्रीय कंपनी आहे. ती कंपनी त्या भागात आहे. कंपनीने त्यांच्या संकेतांप्रमाणे तेथील स्थानिक जनतेत शेती, पाणीपुरवठा, पर्यावरण, महिला व बालविकास अशी कल्याणकारी कामे सुरू केली. त्यांतील पर्यावरणविषयक बाब म्हणून कंपनीने वृक्षलागवड दहा वर्षांपूर्वी हाती घेतलीहोती. त्यांचे अनुकरण स्थानिक कंपन्या व व्यवसाय करू लागले. कंपन्यांचे संस्थापना दिन, कामगार संघटना दिन अशा निमित्ताने कामगार मंडळी पुढाकार घेऊन झाडे लावू लागली. मात्र ते काम निमित्ता निमित्ताने होई व तेवढ्यापुरतेच राही. ती झाडे जगवायची कशी असा मुद्दा आला, तेव्हा स्थानिक तरुणांनी पुढाकार घेतला आणि वृक्षलागवड व संगोपन या मुद्याभोवती जनजागृती सुरू झाली. बघता बघता, काही शाळा-संस्था त्या मोहिमेत सहभागी झाल्या. शिरूर तालुक्यातील सणसवाडी ग्रामपंचायत, युवकवर्ग, डॉक्टर्सपत्रकार मंडळी आदींचा त्यात समावेश होता. तेथे पुढाकार घेतलेल्या गावकऱ्यांमध्ये अर्जुन सैदपोपट ढेरंगेअनिल दरेकरमच्छिंद्र हरगुडेसागर दरेकर, गोरखनाना भुजबळ, गोरखनाना दरेकर, राजेश भुजबळ, विकास हरगुडे, सरपंच रमेश सातपुते, सागर हरगुडे, नामदेव हरगुडे, विष्णू हरगुडे,भानुदास हरगुडेसंजोग तांबे ही मंडळी आहेत. ते नित्य नियमाने वृक्षराजीचे काम पाहतात.

        

हवेली तालुक्यात ती जबाबदारी दादा बाबाजी वारघडे प्रतिष्ठानने उचलली आहे. प्रतिष्ठानचे चंद्रकांत वारघडे तर त्या कामात पूर्ण बुडून गेले आहेत. त्यांनी वाहतुकीस अडथळा ठरणारी झाडेसुद्धा पुनर्रोपण केली आहेत. त्यांनी बकोरी गावात जवळजवळ एकवीस हजारांहून अधिक झाडे लावली आणि जगवली आहेत. चंद्रकांत वारघडे शिकू फारसे शकले नाहीत, पण ते उद्योगी आहेत. त्यांचे बांधकाम साहित्याचे – सिमेंट वगैरे दुकान आहे, शिवाय त्यांच्या घरात एलआयसीची एजन्सी आहे आणि त्यांची स्वत:ची सार्वजनिक कामे तर असंख्य. त्यासाठी त्यांची एक माहिती सेवा समिती आहे. शेतकऱ्यांना विविध अडचणींत मार्गदर्शन व शक्य ते सहाय्य करणे हे समितीचे प्रमुख काम आहे. त्याखेरीज, चंद्रकांतजी सरकारच्या विविध योजना शेतकरी व ग्रामस्थ यांच्यापर्यंत पोचवत असतात. त्यांना झाडे लावण्याचे खूळ तीन वर्षांपूर्वी लागले. मग त्यांचा सकाळचा बहुतेक वेळ त्याच उद्योगात जाऊ लागला. ते म्हणाले, की पाऊस 2017 साली पडला तेव्हा झाडे लावली. पाऊस 2018 साली इकडे फिरकलाच नाही, मग ती टँकरचे पाणी मिळवून जगवली. त्या भानगडीत चार-पाच लाख रुपये खर्च झाला. म्हणून लोक मला  खुळा म्हणत, परंतु तेच लोक आता पंचवीस हजार झाडे जगलेली पाहून खूष होतात. काही लोक मदतही करू लागले आहेत. आता चंद्रकांतजी यांचे एकच लक्ष्य आहे ते पाच लक्ष झाडे लावण्याचे!

देशी वृक्ष लागवडत्यांचे पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्व अशा गोष्टी शिरूर आणि हवेली या तालुक्यांच्या पट्ट्यातील केसनंद, बकोरी, सणसवाडी, वाघोली, कोरेगाव, लोणिकंदवडगावशेरी या परिसरात विविध उपक्रमांतून आणि विविध माध्यमांतून लोकांपर्यंत पोचवल्या जात आहेत. त्यांचा भर बहूपयोगी वड, पिंपळ, चिंच, फणस, आवळा, आंबा, बेल, कडुनिंब, मोह, कदंब, पळस, लाख, सालकवठ, करंज अशी भारतीय देशी झाडे लावण्यावर आहे. शासनाचा संकल्प तेरा कोटी वृक्ष लागवड 1 जुलै 2017 ते 31 जुलै 2018 या कालावधीत करण्याचा होता. वनमंत्र्यांनी राज्यात तीन वर्षांत पन्नास कोटी वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट जाहीर केले होते. लोकसहभाग हा त्यातील आत्मा. विठ्ठल वळसेपाटील म्हणाले, की आम्ही तेच सूत्र पकडून काम सुरू केले आणि शासन दरबारी दरवर्षीच्या संकल्पापेक्षा जास्त वृक्ष लागवड करून दाखवली आहे!

पर्यावरणप्रेमीमंडळ एकत्र आली आणि त्यांनी स्मृतिवन’ नावाचा वेगळाच उपक्रम हाती घेतला आहे. त्या उपक्रमाद्वारे लोकांच्या भावनेला हात घालण्यात आला. म्हणजे एकतरझाडे का वाढवायची यासाठी लोकांचे प्रबोधन आणि दुसऱ्या बाजूस त्यांच्या प्रियजनांची आठवण. उपक्रमात समाविष्ट झालेल्या प्रत्येकाने त्याच्या/तिच्या प्रियजनांच्या स्मृतिप्रीत्यर्थतसेचआनंदसमयीदेखील वृक्ष लागवड व जतन करण्याचा विडा उचलला. स्मृतिवनांकडे अशा तऱ्हेने वाटचाल सुरू झालीतीही अविरतपणे चालवण्याची शपथ घेत. पक्षी त्या ठिकाणी स्थिरावतील यासाठी पाण्याची सोय करणारी भांडी ठेवली. त्याच प्रमाणे दोन छोटे तलाव बनवले आहेत. त्यातील एका तलावात उन्हाळ्यात पक्षांसाठी पाणी सोडण्याची व्यवस्था केली आहे. अशा तऱ्हेने उपक्रमामागे व्यापक पर्यावरणीय विचार जपला जात आहे. लोकांचा सहभाग दिवसेंदिवस वाढत चालला आहे.

उपक्रमात अनेक संस्थांनी साथ दिली व सहभाग घेतला. काही नावे –  अखिल भारतीय माहिती सेवा समिती’, शिरूर हवेली वॉकिंग ग्रूपदादा बाबाजी वारघडे प्रतिष्ठानवाय टी एस सोसायटीपत्रकार मित्र परिवारअखिल भारतीय ग्राहक पंचायतक्रांतिवीर प्रतिष्ठान या संस्थांच्या सहभागी मंडळींनी त्यांच्या प्रियजनांचे वाढदिवस व त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ 2017 पासून बकोरीच्या डोंगरावर(हवेली तालुक्यात) वृक्षारोपण सुरू केले. त्याच प्रमाणेसणसवाडीच्या (शिरूर तालुका) डोंगरावरही वृक्षारोपण करण्यात आलेत्यासाठी आधी श्रमदान करून त्यांच्या त्यांच्या भागात चर घेतले. चर घेण्यासाठी सुट्टीचा दिवस निवडला. शासकीय नोकरांसाठी रविवारतर कामगारांसाठी गुरुवार. काही तरुणांनी दररोज सकाळी पहाटेची वेळ ठरवून घेतली व पाहता पाहता प्रत्येक भागात हजार खड्डे तयार झाले. केवळ मुरमाड भाग लागल्यास त्यात मातीही टाकण्यात आली. पाण्याच्या सोयीनुसार चर घेण्याची दिशा ठरली गेली. पाणी वाया जाणार नाही याची विशेष दक्षता घेण्यात आली. सुरुवातीला दोनशे झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर रोजच त्या ठिकाणी वृक्षारोपण सुरू झाले.

बकोरी टेकडीवर (हवेली तालुका) छोटासा मातीचा बंधारा बांधण्यात आला आहे. झाडे जगवण्यासाठी रोज त्या ठिकाणी झाडांना पाणी घालून ती जोपासण्याचे काम केले जात आहे. सणसवाडी (शिरूर तालुका) उद्योग नगरीतील कामगार वर्ग व कंपनी यांच्या माध्यमातून विविध सेवा प्राप्त झाल्या आहेत. सणसवाडी ग्रामपंचायतीने पाणी, मोटर आणि पाईप साहित्य दिले. तसेच नाव न सांगण्याच्या अटीवर दोन उद्योजकांनी एक कामगार कायमस्वरूपी कामासाठी उपलब्ध करून दिला आहे. तर एक तरुण उद्योजक दरवर्षी ठरावीक रक्कम मदत म्हणून देणगी देत आहे. इतर गावांतील स्थानिक लोकसहभागही वाढला आहे. त्या ठिकाणी कुटुंबे सकाळी व्यायाम म्हणून झाडांना पाणीदेत आहेत. अनाठायी खर्च टाळून झाडे भेट देण्याचे काम केले जात आहे. चंद्रकांत वारघडे म्हणाले, की मी बकोरी डोंगरावर झाडे लावण्याचा ठराव ग्रामसभेत मंजूर करून घेतला. बैलगाडा शर्यतीच्या घाटाच्या आणि मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा वड आणि गुलमोहर यांची झाडे लावून ती मोठी केली आहे. दरवर्षी ग्रामपंचायत सामाजिक वनीकरणमार्फत दोनशेनव्वद ते तीनशे झाडे उपलब्ध करून देत आहे. त्याचप्रमाणे ग्रामपंचायत आणि लोकसहभाग यांतून शिरूर तालुक्याच्या सणसवाडी भागातील नरेश्वर मंदिराचार्णोद्धार आणि मंदिर परिसरात विकासकामे चालू आहे. त्यामध्ये परिसर सुशोभित करणे, दर्शनबारी तयार करणे, बैठक व्यवस्था करणे, जुन्या खोल्या दुरुस्त करणे, स्वच्छतागृह तयार करणे, फुलांच्या कॅरी करणे, पाण्याची सोय करणे, गार्डन तयार करणे, वीज सुशोभिकरही कामे प्राधान्याने घेतली आहेत. त्यासाठी ग्रामपंचायत सदस्य आणि आजीमाजी पदाधिकारी यांचे सहकार्य उपलब्ध झाले आहे. अर्जुन सैद सणसवाडीत काम करतात. त्यांचा इंजिनीयरिंग जॉब वर्क करून देण्याचा व्यवसाय आहे. ते तेथील ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष आहेत. सणसवाडीची लोकवस्ती पंचवीस हजारांची आहे. ते म्हणाले, की मी स्वत: आणि आठ-दहा शाळांतील मुले असे मुख्यत: वृक्षलागवडीचे काम करत असतो. त्यांनी डोंगरावरील महादेव मंदिराजवळ वनविभागाची जमीन आहे तेथे आणि आजुबाजूच्या जमिनीवर तीन हजार झाडे लावली व जगवली आहेत. ते भविष्यात खाजगी सीएसआर निधी, वनविभाग आणि सणसवाडीची ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने जंगलाचा विस्तार करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. वृक्ष चळवळीमुळे झाडे जगवण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनाही जाग आली व त्या भागातील जवळजवळ सर्व ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदवणे सुरू केले आहे. अर्जुन सैद पुढे म्हणाले, की वृक्षराजीचा तो परिसर पंधरा एकरांचा आहे. आमच्या भागात पक्षी, पाणकोंबडे, ससे, लांडगे, खारुताई, कोकिळा, साळुंखी, टिटवी, सरडे, विशेषत: मोर भरपूर आहेत; परंतु ते सारे खासगी क्षेत्रात असतात. निसर्ग फुलवण्याचे चांगले काम लोकांनी हाती घेतल्याने आदर्श वने निर्माण होतील व विस्थापित झालेले पक्षी पुन्हा झाडांवर दिसतील अशी आशा आहे. 

अर्जुन सैद – 7385249999 arjunsaid@gmail.com
अनिल दरेकर  
– 9860195959
सागर दरेकर  
– 9552075454
चंद्रकांत वारघडे
 – 9960925252 chandrakantwarghade72@gmail.com
विठ्ठल वळसेपाटील
 8484066042 vithalvalse@gmail.com
– प्रतिनिधी

————————————————————————————————————————

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here