Home शब्दशोध

शब्दशोध

भाषेतील भर आणि प्रदूषण

भाषा ही नदीसारखी असते. नदी उगमापासून तुटत नसते. पण तिला ओढे, छोट्या नद्या येऊन मिळत राहतात आणि ती पुढे वाहत राहते. पण नदी प्रदूषित होऊ नये म्हणून जागरूक राहणेही आवश्यक असते. नाहीतर काय होते, ते नुकसान आधुनिक मराठी भाषा अनुभवत आहे. भाषा ही प्रदूषित होऊ नये म्हणून जागरूक असले पाहिजे...

चपाती व पोळी (Chapati, Poli Marathi Versions of Loaf)

1
मराठी भाषेत ‘पोळी’ व ‘चपाती’ हे पर्यायशब्द म्हणून जवळजवळ वापरले जातात. उच्चभ्रू समाजात ‘पोळी’ व तदितर समाजात ‘चपाती’ हा शब्द वापरला जातो असे ढोबळपणे म्हणता येते.

घरासाठी पागडी आली कोठून? (The Origin of Pagadi for Residence in Mumbai)

'पागडी' हा मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचा शब्द. तो पुनर्विकास आणि त्यातून मिळणारी ओनरशिप घरे या काळात विस्मृतीत गेला आहे. एकेकाळी मुंबईत घर पागडीनेच मिळायचे. 'पागडी'ची घरे म्हणजे भाड्याने घेतलेली घरे. घरमालक किंवा चाळमालक त्याच्या मालकीच्या जागेवरील किंवा चाळीतील घरे गरजूंना भाड्याने देई.

दिवटा

आदिमानवाने अग्नी निर्माण केला तेव्हा तो इतर प्राण्यांपासून वेगळा आणि श्रेष्ठ ठरला. त्याच वेळी,अग्नीमुळे मानव निसर्गापासून दूरही झाला. त्याने हळुहळू निसर्गव्यवहारात हस्तक्षेप सुरू केला. मानवाने प्रगती शिकार केलेले मांस अग्नीवर भाजण्यापासून ते अग्नीचा प्रकाशासाठी उपयोग करण्यापर्यंत साधली.

हातखंडा

काम हमखास पार पाडण्याचे कौशल्य अंगी असणे म्हणजे हातखंडा. तर हातखंड म्हणजे मधून मधून सोडवणूक करणारा, मदतनीस (मूल, मित्र, शेजारी); तसेच अडल्यावेळी उपयोगी पडेल अशी व्यक्ती.

हळदिवी (Haldivi)

हळदिवा किंवा हळदिवी याचा शब्दकोशातील अर्थ हळदीच्या रंगाचा, पिवळा असा आहे. शब्द आरती प्रभू यांच्या कवितांमध्ये अनेकदा दिसतो. प्रामुख्याने ‘जोगवा’ या काव्यसंग्रहातील कवितांमध्ये. हळदिवी हा शब्द किती वेगवेगळ्या संदर्भात आणि तरीही चपखलपणे त्या कवितांमध्ये आला आहे.

ख (Kha)

‘ख’ हे वर्णमालेतील एक अक्षर असले तरी ‘ख’ हा एकाक्षरी शब्दही आहे. ख म्हणजे आकाश. त्यावरून आकाशातील ग्रहांना खगोल आणि त्यांच्या अभ्यासाला खगोलशास्त्र असे म्हटले जाते. ‘ख’ म्हणजे आकाशात, ‘ग’म्हणजे गमन करणारा असा तो खग (पक्षी).
_Ghatvaf_carasole

घातवाफ

‘घातवाफ’ हा आशयगर्भ शब्द संत वाङ्मयात आढळतो. ‘घातवाफ’ हा घात आणि वाफ या दोन शब्दांपासून बनला आहे. अर्थात त्यातील घात हा शब्द आघात, हत्या, वध या अर्थाने आलेला नाही. तसेच, घात म्हणजे गुणाकार असाही...
_kadambmukul_carasole

कदंबमुकुल न्याय

आपल्या अस्सल देशी वृक्षांपैकी अत्यंत देखणा वृक्ष कोणता असेल, तर तो ‘कदंब’. तो सहजासहजी आढळत नाही- मात्र देशी वृक्षांचे जतन आणि संवर्धन यांचे महत्त्व गेल्या काही वर्षांत लक्षात आल्यामुळे कदंबाची लागवड जाणीवपूर्वक केली जात...
_Makta_Ghene_carasole

मक्ता घेणे

'मी घरातील सगळी कामे एकटीनेच करण्याचा मक्ता नाही घेतला.' किंवा 'दरवेळी आभार प्रदर्शन मीच का करायचे? मी काय त्याचा मक्ता घेतलाय?' गृहसंस्था आणि सार्वजनिक संस्था अशा दोन्ही ठिकाणी वेळोवेळी कानी पडणारी ही वाक्ये. दोन्ही वाक्यांत...