‘लोकराज्य’चा ताजा अंक पाहिला. या वाचन विशेषांकात विलासराव देशमुख, भालचंद्र नेमाडे, पृथ्वीराज चव्हाण वगैरे मंडळींचे लेख या अंकात समाविष्ट करण्यात आलेले आहेत. हा संपूर्ण अंक आर्ट पेपरने तयार केलेला असून त्याची 154 पानं रंगीत आहेत. मात्र याची किंमत अगदीच वाजवी म्हणजे केवळ 10 रूपये एवढी कमी ठेवली आहे. या सगळ्याला चमत्काराशिवाय दुसरे विशेषण मला सुचत नाही. हे सगळे जमवून आणणारे प्रल्हाद जाधव यांच्या धडपडीची नोंद घेणे मला अत्यावश्यक वाटते.
संजय भास्कर जोशी हे संजय भास्कर जोशी हे मराठीतले आघाडीचे कादंबरीकार आणि समीक्षक आहेत. जोशी हे मूळचे एक उच्चपदस्थ कॉर्पोरेट अधिकारी. त्यांनी अनेक वर्षे मोठ्या पदावर कामे केली. ते आयडिया कंपनीत असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट असताना वयाच्या 43 व्या वर्षी त्यांनी पूर्णवेळ वाचन आणि लेखन करण्याकरता नोकरी सोडली. जोशी यांची ‘नचिकेताचे उपाख्यान’, ‘रेणुका मृणालची उपाख्याने’,’ श्रावणसोहळा’ या कादंबर्या, ‘स्वप्नस्थ’ आणि ‘काळजातीला खोल घाव’ हे कथासंग्रह, तसेच, ‘आहे कॉर्पोरेट तरी’ हे आत्मचरित्रपर पुस्तक अशी साहित्यसंपदा आहे. त्यांच्या लेखनाला दोन वेळा राज्य सरकारचा पुरस्कार प्राप्तझाला आहे. त्यांनी जे.डी सॅलिंजर यांच्या ‘कॅचर इन द राय’ या कादंबरीचा अनुवाद केला असून अंतर्नाद, अनुभव, ललित, म टा , लोकसत्ता वगैरे नियतकालिकात विपुल समीक्षा लेखन केले आहे. वाचन आणि वाचनसंस्कृती यांच्या वृद्धीसाठी ते अनेक प्रकल्प चालवत असतात. साधना साप्ताहिकात त्यांची ‘संजय उवाच’ व ‘पडद्यावरचे विश्वभान’ ही सदरे लोकप्रिय झाली.
लेखकाचा दूरध्वनी
9822003411