भांगी भरती

0
30
_Bhagi_Bharati_carasole

मुंबई शहर सखल भागात नैसर्गिक भौगोलिक रचनेमुळे असल्याने काही भागात अतिवृष्टीमुळे पाणी तुंबते. मुंबईत पाणी तुंबण्यामागील ‘भांगी भरती’ या नव्या कारणाची भर पडली आहे. समुद्रात भरती आणि ओहोटीमध्ये लाटांची उंची दोन मीटरपेक्षा कमी असते तेव्हा ‘भांगी’ भरतीची स्थिती निर्माण होते. ‘भांगी भरती’ हा शब्द पारंपरिक आहे. महिन्यातून एकदा तशी भरती येते. भांग खाल्ल्यानंतर ज्याप्रमाणे झिंग येते, तशी झिंग भरतीच्या पाण्याला येते. मोठ्या भरतीच्या वेळेस लाटा जलदगतीने फुटतात तशा ‘भांगी भरती’त फुटत नाहीत. लाटा खूप वेळ तरंगत राहतात. ती भरती कितीही वेळ राहते. त्यामुळे बाहेरून आलेले पाणी समुद्र आत घेत नाही. अशा वेळी मुसळधार पाऊस पडला तर जिकडे तिकडे पाणी तुंबणे अपरिहार्य आहे. हा शब्द कोळी समाजात प्रचलित आहे.

– सुभाष कुळकर्णी, 9820570294

(साहित्य मंदिर – ऑगस्ट 2018 संपादकीयामधून)

About Post Author

Previous articleपांढरा हत्ती पोसणे
Next articleलोकशाही निवडणुका आणि विश्वासार्हता
सुभाष सीताराम कुळकर्णी यांनी मुंबई विद्यापीठामधून बी एससी पदवी संपादन केली. त्यांनी अठराव्या वर्षीच दादर येथे गणेश पेठ रहिवासी सेवा मंडळाची स्थापना करून वाचनालय सुरू केले. ते वाशीला राहण्यास 1977 साली आले. तेथे त्यांनी ‘मराठी साहित्य संस्कृती व कला मंडळा’ची स्थापना केली. ते मंडळाचे आणि वाचनालयाचे 2010 पासून अध्यक्ष; तसेच, मंडळाचे मुखपत्र ‘साहित्य मंदिर’ मासिकाचे संपादक आहेत. त्यांच्या संपादकीय लेखांचे ‘समाज भान’ नावाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे. ते ई-कचरा आणि प्लास्टिक कचरा जमवून बिसलेरी कंपनीच्या बॉटल फॉर चेंज प्रकल्पाकडे पाठवतात. ते पर्यावरणप्रेमी असून पंचवीस वर्षांपासून घरच्या ओल्या कचऱ्यापासून खत तयार करतात.