निबंधमालेतील भविष्यवेध !

विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी ‘निबंधमाला’ सुरू केली ती बहुश्रुतता व योग्य पुस्तकांची लोकांना माहिती देऊन मराठी भाषा समृद्ध करण्याच्या उद्देशाने. त्यांनी ‘निबंधमाले’तून सकस, वैचारिक आणि दर्जेदार लेखांचे सलग आठ वर्षे लेखन करून 1881 पर्यंत विविध छापखान्यांतून चौऱ्याऐंशी अंक छापून प्रसिद्ध केले. विष्णुशास्त्री यांनी ‘निबंधमाले’तून मनोरंजन न करता लोकजागृती, विचारक्रांती आणि मराठी भाषेची अभिव्यक्ती याची कास धरली…

विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी निबंधमाला सुरू केली ती बहुश्रुतता व योग्य पुस्तकांची लोकांना माहिती देऊन मराठी भाषा समृद्ध करण्याच्या उद्देशाने. त्यांनी निबंधमाला लेखनास 25 जानेवारी 1874 रोजी मराठी भाषेची सांप्रतची स्थिती’ या लेखापासून सुरुवात केली. त्यांनी निबंधमालेतून सकसवैचारिक आणि दर्जेदार लेखांचे सलग आठ वर्षे लेखन करून 1881 सालापर्यंत विविध छापखान्यांतून चौऱ्याऐंशी अंक छापून प्रसिद्ध केले. त्यांनी निबंध’ या साहित्यप्रकाराचा समर्थ आविष्कार केला. त्यांनी त्यांची लेखणी स्वदेशस्वभाषास्वसंस्कृती आणि स्वइतिहास प्रचारासाठी वापरली. विष्णुशास्त्री यांनी निबंधमालेतून मनोरंजन न करता लोकजागृतीविचारक्रांती आणि मराठी भाषेची अभिव्यक्ती याची कास धरली. ज्याप्रमाणे व्हॉल्टेअरच्या लेखणीने देशी भाषेच्या द्वारे लोकांची मने क्षुब्ध करून सोडली. त्याचे फळ म्हणजे फ्रान्समध्ये झालेली राज्यक्रांती होय. पीटर द ग्रेटने लेखणीच्या बळावर रशियाचा चेहरामोहरा बदलून टाकला होता. त्यांच्याप्रमाणे विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्या लेखणीने महाराष्ट्रात राष्ट्रवाद जागृत झाला. म्हणून विष्णुशास्त्री चिपळूणकर यांना भारतातील व्हॉल्टेअर’ अशी उपमा दिली जाते. विष्णुशास्त्री यांनी कोणत्याही विषयाला सचोटीने वर्तमान परिस्थितीशी जोडण्याचे कौशल्य वापरून तत्कालीन परिस्थितीत असणाऱ्या अनेक गंभीर विषयांना निबंधमालेतून जिवंतपणा आणला. त्यांनी म्हणून देशाच्या सध्याच्या स्थितीत देशस्थिती सुधारण्याचा राजमान्य मार्ग म्हणजे लोकांना ज्ञानसंपन्न करणे हा होय असे ठणठणीतपणे मांडले.

श्री.ना. बनहट्टी म्हणतातविष्णुशास्त्रींचे व्यक्तिमत्त्व वादळी होतेत्यांचे सिद्धांत वादग्रस्त होतेत्यांचे लेखन प्रतिक्रियेच्या स्वरूपाचे व मूलभूत आहे. ते दैववादी नव्हते, तर जबरदस्त प्रयत्नवादी होते.

सरोजिनी शेंडे यांनी म्हटले आहेकी विष्णुशास्त्री यांनी सतत प्रयत्नशील राहून त्यांच्या देशबांधवांचा न्यूनगंड दूर सारण्याचा प्रयत्न केलाअस्मिता जागृत केलीइतिहासातील उज्वल काळाचे स्मरण करून पूर्व दिव्य ज्यांचे त्यांना रम्य भावी काल असे आशावादी विचार मांडले. त्यांच्या भाषेत अर्थवाहकताभारदस्तपणा व शब्दांचा मार्मिक उपयोग आढळतो.

अ.ना. देशपांडे म्हणतात, “आधुनिक मराठीतील चरित्रकार निबंधमालेतून स्फूर्ती घेतात. त्यामुळे महाराष्ट्रात ध्येयवादी वाङ्मयीन कार्यकर्त्याची थोर उज्ज्वल परंपरा निर्माण झाली.

महाराष्ट्रातील जहाल मतवादी नेते लोकमान्य टिळक, समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकरकाळ’ वर्तमानपत्राचे लेखक शिवराम महादेव परांजपेइतिहासकार वि.का. राजवाडेस्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकरप्राचीन मराठी वाङ्मयाचे लेखक ल.रा. पांगारकरन.चिं. ‌केळकरश्रीपाद कृष्ण कोल्हटकरमराठी कथालेखक हरिभाऊ आपटेतसेच, विजापूरकर यांच्यावर विष्णुशास्त्री यांचा वैचारिक आणि वाङ्मयीन अशा दोन्ही प्रकारचा प्रभाव असलेला दिसून येतो.

राजा दीक्षित यांनी म्हटले आहे, इंग्रजी भाषेला वाघिणीचे दूध संबोधणारेमी मराठी भाषेचा शिवाजी आहे कीज्याच्यासारखा झाला नाही आणि ज्याच्यासारखा होणार नाही अशी प्रौढी इंग्रजीतून मिरवणारे आणि लोकभ्रमसारखे लेख निबंधमालेत लिहून सामाजिक आंधळेपणावर टीकास्त्र सोडणारे विष्णुशास्त्री मुळात सनातनी मानले जात असले तरी ते खऱ्या अर्थाने समाज सुधारक होते.” विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी निबंधमालेमध्ये विविध प्रकारच्या विषयांची हाताळणी केलेली आहे. त्यांनी लोकभ्रममोरोपंतांच्या कविताधर्मचिंतन, आचारधर्मभाषाभूषण, लेखनशुद्धी, भाषापद्धतभाषासंशोधनवक्तृत्ववाचनशकुन-अपशकुनडॉ.सॅम्युअल जॉन्सनचे चरित्रलोकहितवाणी आणि भाषांतर अशा विविध विषयांवर सातत्याने लिखाण केले. विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी आधुनिक काळामध्ये भेडसावणाऱ्या ज्वलंत समस्यांना एकोणिसाव्या शतकामध्ये मूर्त रूप दिलेले दिसून येते.

निबंधमालेमधील विद्वत्ता आणि कवित्व’ या तिसऱ्या आणि चौथ्या अंकांमधील विषयांमध्ये विष्णुशास्त्री यांनी कविमनातील प्रश्नांची उकल केलेली दिसून येते. त्यांनी कविता म्हणजे वाचल्याने किंवा ऐकल्याने मनाच्या वृत्ती प्रसन्न होऊन तो रस अंत:करणामध्ये सहज बिंबून जातोत्यास काव्य म्हणावे’ अशी काव्याची समर्पक व्याख्या केली आहे. त्यांनी ज्या कवितेत छंदयमकश्लेष असे अलंकार नाहीत ती कविताच नव्हे असे ठामपणे सांगितले आहे. त्यांनी निबंधमालेतील सहाव्या ते आठव्या अंकांमध्ये इतिहासाविषयी प्रखरपणे लेखन केलेले आहे. पाश्चिमात्य इतिहासकारांना भारताविषयी ज्ञान कोणत्याही प्रकारचे नसल्यामुळे आणि त्यांच्या पूर्वग्रहदूषितपणामुळे त्यांनी भारत देशाचा इतिहास चुकीचा लिहिलेला आहे यावर तिखटपणे भाष्य केले. त्यांनी लिहिलेल्या इतिहासविषयक लेखांनी इंग्रजी साम्राज्यामध्ये खळबळ उडवून दिली होती. इंग्रजी राज्यकर्त्यांच्या जिवाला लागेल अशी जहरी टीका त्यामध्ये केलेली होती. आसेतुहिमालयापर्यंत पसरलेल्या इंग्रजी सत्तेला आव्हान देणारे तशा प्रकारचे लिखाण भारतात कोणत्याही भाषेमध्ये किंवा प्रांतामध्ये झालेले नव्हते. इंग्रजी लोकांना नैसर्गिक अनास्था भारतीय इतिहासाविषयी असल्याकारणाने आणि ते राज्यकर्ते भारताबाहेरील असल्यामुळे मिल्कमेकॉले मॉरीस आणि डॉ. हॉल यांच्याकडून विपर्यस्त व चुकीचाअवाजवी इतिहास लिहिला गेलेला आहे. परंतु भारतीय लोकांनी इतिहासाची साधने जमा करावी आणि नवा इतिहास लिहून स्वत:च्या पूर्वजांची स्मृतीकीर्ती जतन करावीत्याशिवाय खरा इतिहास भारतीयांना समजणार नाही असे मत त्यांनी मांडले आहे.

त्यांनी नवव्या अंकातील लेखांमध्ये मराठी भाषेची दुरवस्था होण्याच्या कारणांवर प्रकाश टाकलेला आहे. मराठी भाषेची दुरवस्था झालीत्याचे कारण परभाषेचा संसर्ग हे तर आहेचपरंतु मराठी लोकांची अभिमानहीनताही त्यास कारणीभूत आहे. मराठी भाषेत ग्रंथसंग्रह नाही हा भाषेचा दोष नसून तो मराठी माणसाचा दोष आहे. निबंधमालेतील अठरा ते एकवीस या अंकांतील लेख शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असणाऱ्या वक्तृत्व’ या विषयावर आधारित आहेत. त्यांनी म्हटले आहेकी वक्तृत्व म्हणजे नुसते बोलणे नव्हेतर उंच व मनोवेधक स्वरअंगविक्षेपांचा रोखझोकचेहऱ्यावर निरनिराळ्या मनोवृत्तींचा आविर्भाव व आणखीही कित्येक बारीकसारीक गोष्टी या सर्वांचे संमेलन म्हणजे वक्तृत्व होय.” वक्तृत्वाचा व्यक्तींवर किती मोठा प्रभाव पडतो. त्यासाठी वक्तृत्व खूप उच्च दर्जाचे असावे हे सांगताना विष्णुशास्त्री यांनी तुकाराम आणि रामदास यांनी कथा-कीर्तन-प्रवचन या वक्तृत्वाच्या प्रकारांद्वारे साधलेल्या कार्याची आठवण करून दिलेली आहे. तुकारामांनी संसाराच्या मिथ्याविषयी छत्रपती शिवाजी महाराजांना केलेला उपदेश शिवाजीमहाराजांच्या मनावर इतका झालाकी ते मनाने विरक्त होऊन गेले. तेव्हा राजमाता जिजाबाई यांनी तुकाराम यांच्याकडे जाऊन विनवणी केली. तुकारामांनी पुन्हा त्यांच्या अमोघ वाणीने शिवाजी महाराज यांना क्षत्रियांच्या धर्मावर व्याख्यान दिले व त्यांना पुन्हा ताळ्यावर आणले. शिवाजी महाराज त्यांच्या वक्तृत्वाच्या जिवावर त्यांच्या सरदारांमध्ये सामर्थ्य निर्माण करत. त्यांच्या जोडीला लढणारे मावळे शेतीमजुरी करणारे भोळेभाबडेभित्रे आणि परराज्यातील जुलूम सोसणारे होते. शिवाजी महाराजांनी त्यांच्यामध्ये लढण्याचे सामर्थ्य आणले ते केवळ वक्तृत्वाच्या जोरावर. म्हणून विद्यार्थी मित्रांनोत्यांच्याकडे अशा वक्तृत्व कौशल्याचा विकास होण्यासाठी सराव आणि प्रयत्न करावेत. असे विष्णुशास्त्री बजावतात.

विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी सामाजिक परिवर्तन घडवणारी परखड आणि रोखठोक विचारसरणी निबंधमालेतील विविध लेखांतून मांडलेली आहे. त्यांनी जातिभेदाविषयी परखड मते मांडलेली आहेत. जातिभेदाने राष्ट्राची फूट अतिशयच पडलेली आहे. अठरापगड जातींला अठरा टोपकर यांनी गुंडाळून टाकले आणि साऱ्यांच्या हाती सारखीच करवंटी दिली. पण लोक अजून जागे होत नाहीत. त्यांचे डोळे उघडत नाहीत. जातिभेदाचा भेद त्यांच्या वेडगळपणाचा पीळ क्रमश: कमी कमी होत जाऊन साऱ्या जाती देशबंधुत्वाच्या थोरल्या नात्यात अंतर्भूत होऊन निर्मितीत साऱ्यांचेच भले आहे.” असे प्रतिपादन राष्ट्रवादाच्या या आद्य प्रवर्तकाने एकोणिसाव्या शतकामध्ये केलेले होते !

विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी लिहिलेल्या ‘निबंधमाले’चे बंगालीसारख्या अभिजात भाषेमध्ये ‘देशेरथकथा’ या नावाने भाषांतर झालेले होते. योगी अरविंद घोष त्यामुळे भारावून गेले होते. ‘या पुस्तकाच्या तोडीचे बंगाली भाषेत दुसरे पुस्तक नाही’ असे त्यांनी म्हटले आहे. ‘निबंधमाले’चे मराठी साहित्य व संस्कृतीमध्ये; तसेच, भारताच्या इतिहासामध्ये महत्त्वपूर्ण योगदान आहे. ‘निबंधमाला’ एकविसाव्या शतकातील महाराष्ट्राच्या सामाजिकराजकीय विचारांच्या क्षेत्रात खूप महत्त्वाची आहे. ‘निबंधमाले’ने महाराष्ट्राला नवी वळणे दिलेली आहेत. विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचे लिखाण ज्ञानप्रसार, समाज सुधारणा, वैज्ञानिक दृष्टिकोन, जातिभेद निर्मूलन अशा विविध कार्यांसाठी उपयुक्त आहे, ‘भूक लागली म्हणजे व्याकरण खाता येत नाही आणि तहान लागली म्हणजे काव्यरस पिता येत नाही.’ ‘मेलेल्या माणसांना जिवंत करण्याची कला म्हणजे रसिक कला होय.’ ‘पुढील येणाऱ्या प्रसंगाच्या सावल्या अगोदर पडतात.’ – अशी विचारप्रवर्तक आणि व्यापक विचारसरणी समाजमनावर रुजवणारी वाक्ये त्यांच्या लेखनात येतात ! त्यांना अल्पशा आजाराने वयाच्या बत्तिसाव्या वर्षी  म्हणजे 17 मार्च 1882 रोजी मृत्यू आला. त्यांच्या निधनाविषयी शोक व्यक्त करताना महादेव गोविंद रानडे यांनी त्यांची भावना ‘He had no businesses to die so soon’ या शब्दांत व्यक्त केली. कथालेखक हरी नारायण आपटे यांनी विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्या निधनानंतर  पुढील शब्दांत भावना व्यक्त केली आहे.

                             ‘झाला झाला अहह….. जनहो घात झाला महान

                             नेला नेला हरूनि विधीने सर्व देशाभिमान

– महादेव दिनकर इरकर

7387194364 mahadeoirkar@gmail.com

—————————————————————————————————————————

About Post Author

1 COMMENT

  1. विष्णुशास्त्री यांच्या लिखाणाची थोडक्यात चांगल्या पध्द्तीने ओळख करून दिली आहे लेख छान आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here