गांगल यांच्या विधानाचा गंभीरपणे विचार करणे गरजेचे

0
12

कोकण मराठी साहित्‍य परिषदेच्‍या साहित्‍य संमेलनाचे अध्‍यक्ष प्रसिद्ध विचारवंत पत्रकार दिनकर गांगल यांच्‍या अध्‍यक्षीय भाषणाचा गोषवारा दिनांक 15 एप्रिल 2011 च्‍या लोकसत्‍तेत देण्‍यात आला आहे. आपल्‍या भाषणात दिनकर गांगल असे म्‍हणतात, की ‘‘ग्रंथ माध्‍यमाची गाडी केव्‍हाच सुटली आहे’’ ग्रंथालीसारख्‍या चळवळीची उभारणी करण्‍यासाठी अनेक वर्ष झटलेल्‍या गांगलांकडून जेव्‍हा या प्रकारचे वक्‍तव्‍य करण्‍यात येते, तेव्‍हा त्‍यावर गंभीरपणे विचार करणे गरजेचे आहे, असे वाटते.

अशोक जैन
पत्रकार लेखक

About Post Author