अकोल्याच्या आसदगडाचा बनला पार्क !

0
125

अकोला जिल्ह्याचा ऐतिहासिक कालखंड औरंगजेब बादशहाच्या कारकिर्दीपासून सुरू झाला. औरंगजेबाने दिल्लीचे तख्त 1658 मध्ये काबीज केले. त्याने त्याच्या हाती हिंदुस्थानची सत्तासूत्रे आल्यानंतरत्याच्या मर्जीतील आसदखान नावाच्या सरदाराला अकोला प्रांताची जहागिरी दिली. त्याने बाळापूर किल्ल्याची सुरक्षा मजबूत राहवीशत्रूची चढाई आग्नेय दिशेने थोपवता यावी याकरता अकोल्याला आसदगडाची निर्मिती केली. तो गड इतिहासक्रमात शहराचा भाग होऊन गेला आहे.

अकोल्याच्या जुन्या शहरात मोर्णा नदीचा प्रवाह अंडाकृती झालेला आहेकारण मोर्णा नदीलगत एक भलीमोठी पसरट टेकडी आहे. अकोल्यातील आराध्य राजराजेश्वर मंदिरासंदर्भात आख्यायिका प्रचलित आहे. असे म्हटले जातेकी आख्यायिकेनंतरच्या काळामध्ये परिसरातील गावांमध्ये राजराजेश्वराच्या दुभंगलेल्या पिंडीविषयी ख्याती पसरली होती. ती पिंड स्वयंभू मानली जात होती. त्यामुळे त्या टेकडीवर भाविकांची वर्दळ वाढू लागली. कालांतरानेटेकडीवर मनुष्यवस्तीही स्थिरावली. आसपासच्या परिसरात शेती करणारे लोक टेकडीच्या आसऱ्याने राहू लागले. त्याच वस्तीने पुढे गावाचे स्वरूप धारण केले; तेच अकोला !

वाढलेली वर्दळ आणि अकोला गावाचा विस्तार यामुळे पंधराव्या शतकापासून त्याची वेगळी ओळख निर्माण झाली. गावकऱ्यांनी मोर्णा नदीच्या अंडाकृती प्रवाहामुळे टेकडीवर कच्च्या बुरुजाची निर्मिती केली होती. बाळापूर किल्ल्याचे आणि अकोल्याच्या आकोट तालुक्यातील नरनाळा किल्ल्याचे महत्त्व राष्ट्रीय पातळीवर वाढले होते. त्या दोन्ही किल्ल्यांच्या देखरेखीसाठी आणि समन्वयासाठी अकोला हे उपयुक्त ठिकाण असल्याचे मोगल सरदारांच्या लक्षात आले होते. पुढेआसदखानाने शहराभोवती परकोट बांधला. तो किल्ला ख्वाजा अब्दुल लतीफ याने आसदखानाच्या देखरेखीखाली बांधून 1698 मध्ये पूर्ण केला.

अकोला गावामध्ये तीन वेशी होत्या- पहिली दहिहंडा वेसदुसरी आगर वेस आणि तिसरी गंजी वेस. दहीहंडा वेस ही सध्याच्या गणेश घाटासमोर अस्तित्वात आहे. आगर वेस गुलजार पुऱ्यालगत आहे. तिसरी गंजी वेस ही शिवाजीनगरमध्ये होती. ती कालांतराने पाडून टाकण्यात आल्यामुळे तिचे अस्तित्व नाही. अकोला गावातील दळणवळणाकरता त्या तिन्ही वेशींमधून जाणाऱ्या मुख्य रस्त्यांचा उपयोग केला जात होता. त्या तीन मुख्य रस्त्यांच्या गावातील प्रवेशद्वाराजवळ बांधकामामुळे तीन बुरुज तयार झाले. तिन्ही बुरुजांवर बुलंद आणि मजबूत दरवाजे निर्माण केले गेले. आसदखानाने त्या तिन्ही वेशींना आसद बुरूज, फतेह किंवा पंच बुरूज आणि आगर वेस बुरूज असे संबोधले होते. तेथे मोगल सैनिक तैनात असत. ते तिन्ही बुरुज आणि हवा महल यांचा मिळून आसदगड तयार झाला. आसद बुरूजालाच आता आसदगड म्हणून ओळखले जाते. आसद बुरूजावर हवा महल म्हणून एक अर्धवट पडकी इमारत अस्तित्वात आहे. त्यात आसदखान राहत होता. हवा महल तीन-चार मजली होता असे स्थानिक लोक सांगतात. पूर्वी आसदगडावर आखाडा चालवला जात होता. आखाड्यामधील मल्लांचा पुढे स्वातंत्र्यसमरामध्ये समावेश होता.

संबंधित लेख – मोर्णाकाठची अकोलानगरी

आगर वेसची डागडुजी गोविंद आप्पाजी यांनी 1843 साली केली होती. गोविंद आप्पाजी पेशव्यांचे प्रतिनिधी म्हणून विदर्भात आले होते. त्या गडावर काही शिलालेख आहेत. दहीहंडा वेशीवरील एक शिलालेख त्याच्या बांधकामाची ओळख [तारीख 1114 AH (1697 CE)देतोसम्राट औरंगजेबाच्या कारकिर्दीत जेव्हा नवाब आसदखान मंत्री होते.’ मराठीत एक शिलालेख आहे, की 1843 मध्ये गोविंद आप्पाजींनी किल्ला बांधला. नंतरचे विधान इतर सर्व शिलालेखाच्या विरुद्ध आहे. फतेह बुरुजावरील दुसऱ्या शिलालेखाची अचूक तारीख नाही. त्यातही एकाच मंत्र्याचा पण वेगळ्या सम्राटाचा (शाह आलम) उल्लेख आहे. ईदगाहवरील एकामध्ये मजकूर आणि विधान आहेकी इमारत ख्वाजा अब्दुल लतीफ यांनी 1116 एएच (1698 सीई) मध्ये पूर्ण केली होती. आर्थर वेलस्लीने 1803 मध्ये, दुसऱ्या अँग्लो-मराठा युद्धात अडगावची लढाई जिंकण्यापूर्वी तेथे तळ ठोकला. ब्रिटिश राजवटीने किल्ला 1870 मध्ये उद्ध्वस्त केला होता. किल्ल्याचा मध्यवर्ती भाग हवाखाना म्हणून वापरला जात असल्याची नोंद 1910 मध्ये जिल्हा गॅझेटियरमध्ये आहे.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरकिल्ला भारतीय पुरातत्त्व विभागाच्या देखरेखीखाली आला. आसदगड किल्ला 1955 अखेर मोडकळीस आला होता. तेथील वातावरण भयाण झाले होतेसंध्याकाळी त्या ठिकाणी जाण्याची भीती वाटत असे. अशा ओबडधोबड व कोणत्याही प्रकारची देखरेख नसलेल्या बागेचा प्रारंभिक विकास अकोल्यातील नेहरू पार्कप्रमाणे भारत सेवक समाजाच्या स्थानिक शाखेच्या संयोजक वीणा गोयंका (वीणा अग्रवाल) यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या कार्यकर्त्यांनी केला (1956-57). त्यात स्त्री कार्यकर्त्यांचा वाटा मोठा होता. नंतर नगरपालिकेने ती मोहीम हाती घेतली. किल्ल्याचा बहुतेक भाग नव्याने बांधण्यात आला आहे. सर्व बाजूंनी उंच असा पक्का कठडा बांधलेला आहे. किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार रांची येथील प्रसिद्ध ऐतिहासिक व कलात्मक शिल्पाप्रमाणे बांधले आहे. पायऱ्या आणि अन्य बांधकाम आकर्षक पद्धतीने करण्यात आले आहे.

नगरपालिकेने विशेष आर्थिक तरतूद करून आसदगडाची डागडुजी आणि गडावर उद्यान निर्मिती केली. त्याकरता स्थानिक लोकांची एक समिती नेमली होती. बागेमध्ये स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण करणाऱ्या हुतात्म्यांचे स्मारक म्हणून अकोला नगरपालिकेने एक स्तंभ बांधला आहे. ते स्थान राष्ट्रीय भावनात्मक ऐक्याचे द्योतक म्हणून विकसित केले गेले होते. बागेच्या पुनर्रचनेत विनयकुमार पाराशर यांचा मोठा वाटा आहे. प्रत्यक्ष काम शिल्पकार चिरंजीलाल शर्मा व त्यांच्या कामगारांनी केले. कामासाठी एकूण खर्च एक लाख अकरा हजार रुपये झाला. पार्कचे उद्घाटन भारत सरकारचे सांस्कृतिक खात्याचे माजी मंत्री हुमायुन कबीर यांच्या हस्ते 12 एप्रिल 1959 रोजी झाले होते.

– निलेश श्रीकृष्ण कवडे 9822367706 nilesh.k8485@gmail.com

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here