लेखक व्हा!

लेखक व्हा!


'थिंक महाराष्‍ट्र'ने महाराष्‍ट्राचे सामाजिक-सांस्‍कृतिक डॉक्‍युमेन्‍टेशन करण्‍याचे व्रत हाती घेतले आहे. ते तुमच्‍या मदतीशिवाय पूर्ण होणे नाही!

गावोगावच्‍या शोधक बुद्धीच्‍या व्‍यक्‍ती त्‍यांच्‍या त्‍यांच्‍या परिसराची माहिती संकलित करत असतात, विविध माध्‍यमांमधून लिहित असतात. त्‍या वैशिष्‍ट्यपूर्ण गोष्‍टी 'थिंक महाराष्‍ट्र'पर्यंत पोचवल्‍या गेल्‍या तर या वेबपोर्टलच्‍या सहाय्याने त्‍या अधिकाधिक लोकांपर्यंत पोचतीलच, सोबत त्‍यांचे कायमस्‍वरुपी जतनही करून ठेवता येईल. जर खेड्यापाड्यातून अशी लहानमोठी मोठी माहिती आपण या पोर्टलवर मांडू शकलो तर लोकसहभागातून आपण सारे महाराष्‍ट्राचे समग्र, विधायक, सकारात्‍मक चित्र उभे करू शकू.

तुमच्‍या परिसरातील व्‍यक्‍ती, संस्‍था आणि स्‍थानिक वैशिष्‍ट्ये, उदाहरणार्थ यात्रा-जत्रा, गडकिल्‍ले, लेणी, ग्रामदेवता, प्रथा, परंपरा, बाजार, खाद्यपदार्थ, वेशभूषा, वन्‍य आणि पशू वैविध्‍य, स्‍थानिक इतिहास आणि इतर वैशिष्‍ट्यपूर्ण गोष्‍टी यांबद्दलची माहिती आम्‍हाला लिहून-फोटो काढून-व्हिडिओ चित्रित करून पाठवली तर ती योग्‍य संस्‍करणासह ऑनलाइन आणण्‍याची जबाबदारी आमची! किमानपक्षी तुम्‍ही ती माहिती 'थिंक महाराष्‍ट्र'च्‍या कार्यालयात फोन-इमेलद्वारे कळवू शकता. आम्‍ही तिचा पाठपुरावा करू. तुमच्‍या सहकार्यामुळे फक्‍त शहरे किंवा तालुके नव्‍हेत तर अगदी खेड्यापाड्यांमधील माहिती जगासमोर आणता येईल. तो पुढील पिढ्यांसाठी अनमोल ठेवा असेल! 'माहिती संकलना'च्‍या या अभूतपूर्व मोहिमेमध्‍ये सहभागी व्‍हा! तुमच्‍याकडील माहिती आम्‍हाला पाठवा.

रजिस्टर व्हा!