हिनाकौसर खान-पिंजार


संपर्क : greenheena@gmail.com98503 08200

हिनाकौसर खान-पिंजार या पुण्‍याच्‍या पत्रकार. त्‍यांनी दैनिक 'लोकमत'मध्‍ये सहा वर्षे पत्रकारीता केली. त्‍या सध्‍या 'युनिक फिचर्स'च्‍या 'अनुभव' मासिकासाठी उपसंपादक पदावर काम करत आहेत. त्‍या वार्तांकन करताना रिपोर्ताज शैलीचा चांगला वापर करतात. कथालेखन हा हिना यांच्‍या व्‍यक्‍तीमत्त्वाचा महत्‍त्‍वाचा घटक आहे. त्‍या प्रामुख्‍याने स्‍त्रीकेंद्री कथांचे लेखन करतात. हिना 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम'च्‍या 'नाशिक जिल्‍हा संस्‍कृतिवेध' 2016 मध्‍ये सहभागी होत्या.


मनमोकळी ‘निळ्या डोळ्यांची’ लेखिका शिल्पा कांबळे

(5 प्रतिक्रीया) ‘निळ्या डोळ्यांची मुलगी’ या कादंबरीची लेखिका शिल्पा कांबळे हिचा खरेपणा प्रथमदर्शनीच जाणवतो. ती वागण्यात नम्र पण विचारांनी बेधडक असल्याचेही स्पष्ट जाणवते. तिने ‘मराठी युवा साहित्य संमेलना’च्या व्यासपीठावरून जाहीर कबूल केले, की ‘ती मराठीतून लिहिते खरी, पण तिच्या बोलण्यात कॉस्मोपॉलिटन संस्कृतीचा प्रचंड पगडा आहे.’ ती बोलताना सहज इंग्रजीत शिरते आणि इंग्रजी शब्दांचा खूप वापर करते, पण ‘तिला लिहिताना मराठीच जवळची वाटते!’ हेही तिने सांगितले.

चिमुटभर रूढीबाज आभाळ

(1 प्रतिक्रीया) राजन खान यांची ‘चिमुटभर रूढीबाज आभाळ’ ही कादंबरी अस्वस्थता निर्माण करते. मानवी जगण्याची एकूण व्याप्ती पाहता रूढी-परंपरांचा जीव फारतर चिमुटभर असायला हवा; किंबहुना तो तेवढाच असतो, पण मानवी मन रूढी-परंपरांना कुरवाळत राहते आणि ते मनच माणसाचे जगणे आभाळाएवढे मुश्किल करून टाकते. मानवी जगण्याचे हे सार म्हणजे ही कादंबरी.

बाळासाहेब मराळे - शेवग्याचे संशोधक शेतकरी

(5 प्रतिक्रीया) सिन्नर तालुक्यातील शहा नावाचे गाव. तेथे राहणाऱ्या बाळासाहेब मराळे या शेतकऱ्याने शेवग्याची शेती करून रोहित-१ नावाचे वाण शोधून काढले आहे. शिक्षित तरूण बेरोजगार ते संशोधक शेतकरी असा त्यांचा प्रवास आहे. शहा सिन्नर तालुक्यापासून पंचवीस-तीस किलोमीटरवर आहे. शहा रस्ता बराच कच्चा होता. राज्य शासनाने ज्या शेतकरी संशोधकाला कृषी पुरस्कार देऊन सन्मानित केले. त्या शेतकऱ्याच्या गावाला नेणारा साधा रस्ताही बऱ्या अवस्थेत नव्हता. यथावकाश व यथाकष्ट आम्ही गावात शिरलो. गावातून पाच मिनिटांच्या अंतरावर आम्हाला ‘बाळासाहेब मराळे यांच्या शेवगा नर्सरी फार्मकडे’ असा फलक दिसला. पुढेही पुन्हा तसाच दिशादर्शक फलक होता.

अक्षरमित्र - विवेकी विचारांची पेरणी

(3 प्रतिक्रीया) ‘अक्षरमित्र’ ही अहमदनगरमध्ये सुरू झालेली आगळीवेगळी वाचन चळवळ आहे. वाचनाच्या माध्यमातून शिक्षण, मुल्ये आणि विवेकी विचार यांचा प्रसार करणे हे त्या चळवळीचे मुख्य सूत्र! लोकांना वाचनाची आवड असते, पण त्यांना नेमके काय वाचायचे ते ठाऊक नसते. काय वाचायचे ते ठाऊक असले तरी तो वाचनाचा जामानिमा कोठून मिळवायचा ते ठाऊक नसते. म्हणूनच ‘अक्षरमित्र’ ही चळवळ वाचक आणि पुस्तके यांच्यामधील दूवा होण्याचे काम करत आहे.

शिवाजी माने - विज्ञानखेळण्यांच्या सान्निध्यात गवसली आयुष्याची दिशा

(5 प्रतिक्रीया) न्‍यूटनला ज्‍या सफरचंदाच्‍या झाडाखाली गुरूत्‍वाकर्षणाच्‍या नियमाचे ज्ञान झाले त्‍या सफरचंदाच्‍या झाडाचे एक बिज आयुकात लावण्‍यात आले आहे. याच आयुकाच्‍या सान्निध्‍यात आल्‍यावर विज्ञानापासून अनभिज्ञ असलेल्‍या शिवाजीला ते ज्ञान प्राप्‍त झाले आणि त्‍याच्‍या आयुष्‍याची निश्चित दिशा ठरून गेली. केवळ सातवी शिकलेल्‍या या तरूणाने विज्ञानखेळण्‍यांचे कसब आत्‍मसात केले आणि आज महाराष्‍ट्रातील विविध शाळा त्‍याला आनंदाने स्‍वतःहून बोलावत आहेत.

लढणा-या ‘सजग नागरिक मंचा’ची कहाणी

(1 प्रतिक्रीया)    ‘सजग नागरिक मंच’. पुण्यातील विवेक वेलणकर आणि जुगल राठी या दोन गृहस्थांच्या पुढाकारानं आकारलं गेलेलं एक व्यासपीठ. विविध प्रश्नांमध्ये हिरीने भाग घेणारं आणि सक्रिय काम करणारं. ‘सजग...’ ही एक चळवळ आहे. लोकांनी उठावं...नुसतंच नव्हे तर पेटून उठावं. प्रश्न मांडावे...प्रसंगी त्यासाठी भांडावं आणि होणा-या अन्यायाला वेळीच रोखावं यासाठीची चळवळ-व्यासपीठ.

काळी-गोरी, सुंदर-कुरूप...

- हिनाकौसर खान   सभोवताली आढळणा-या तथाकथीत पुरूषी संस्‍कृतीत बाईचे ‘बाईपण’ पुसले जात नाही. ‘स्‍त्री – पुरूष’ समानता वगैरे शब्दिक वल्‍गना अनेकांकडून केल्‍या जातात. मात्र समाजाच्‍या मानसिकतेत फरक पडत नाही. अनेक मुली, महिला कॉन्‍स्‍टेबल किंवा तत्‍सम जबाबदार पदांवर कार्यरत असतात. मात्र त्‍या सार्वजनिक ठिकाणी आल्‍या की लोकांच्‍या नजरांना त्‍यातली ‘बाईच’ दिसते. ही मानसिकताच स्‍त्रीसाठी सार्वजनिक जीवनात असुरक्षीतता वाढवण्‍यास कारणीभूत असते. काळी-गोरी, सुंदर-कुरूप... कशीही असली तरी ती बाई आहे एवढं पुरुषांना पुरेसं असतं. ही भावना जितकी घाणेरडी असते तितकीच मनस्ताप देणारीही असते.