रोहिणी क्षीरसागर


संपर्क : rohinikshirsagar01@gmail.com8097422078

रोहिणी क्षीरसागर या मूळच्‍या सोलापूर जिल्‍ह्यातील अकलूज गावच्‍या. त्‍या 'व्हिजन महाराष्‍ट्र फाऊंडेशन'मध्‍ये कार्यालयीन व्‍यवस्‍थापक म्‍हणून कार्यरत आहेत.


बहुढंगी मुंबई

(2 प्रतिक्रीया) मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी. ब्रिटिशांनी सात बेटे परस्परांना अठराव्या शतकाच्या मध्यकाळात जोडली आणि मुंबई हे शहर तयार झाले. शहराची आर्थिक व शैक्षणिक प्रगती एकोणिसाव्या शतकात झाली. मुंबई शहर महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावर वसले आहे. शहराच्या पश्चिम, दक्षिण, पूर्व भागांकडे अरबी समुद्राचा किनारा आहे तर उत्तरेस मुंबईची उपनगरे येतात. मुंबई शहरात पश्चिमेकडे मलबार हिल, खंबाला हिल, वरळीच्या‍ टेकड्या, पूर्वेकडे भंडार वाडा टेकडी, गोलनजी हिल, अँटॉप हिल आहेत.

मोहोळचे भैरवनाथ मंदिर

सोलापूर जिल्ह्याच्या मोहोळ तालुक्यातील अंकोली गावामध्ये सातशे वर्षापूर्वीचे भैरवनाथांचे मंदिर आहे. मोहोळ-मंगळवेढा मार्गावर अंकोली स्टॉप आहे. अंकोली पंढरपूर-सोलापूर (ति-हेमार्गे) पंढरपूरपासून एकोणिसाव्या मैलावर आहे. रस्ता डांबरी व नित्य रहदारीचा आहे. कोणत्याही मार्गाने अंकोली गावी येताच समोर मंदिराचा भव्य तट नजरेत भरतो. देवालयाचे उंचच उंच डेरेदार शिखर पाहून मन प्रफुल्लित होते.

घडशी

(3 प्रतिक्रीया) घडशी ही एक जात आहे. त्‍या जातीचे लोक महाराष्ट्रात सर्वत्र आढळतात. वाजंत्री वाजवणे हा त्यांचा मुख्य व्यवसाय आहे. ते त्‍यांच्‍या उत्पत्तीची कथा सांगतात, ती अशी - राम व सीता यांच्या विवाहाच्या प्रसंगी वाजंत्री मिळाले नाहीत. तेव्हा रामाने चंदनाचे तीन पुतळे तयार करून त्यांच्यात प्राण फुंकला. त्‍यापैकी एकाला संबळ, दुस-याला सूर व तिस-याला सनई दिली. ते तिघे घडशांचे मूळ पुरूष होते. काही ठिकाणी घडशी जात ही मांग जातीतील पोटजात मानतात. या जातीचे लोक कर्नाटक राज्‍यातही आढळतात. समाजात बारा बलुत्‍यांच्‍या रचना अस्तित्‍वात होती, त्‍या काळी अलुतेदारांच्‍या यादीत घडशी जातीचा उल्‍लेख्‍ा आढळतो. पूर्वीच्‍या काळी अलुतेदार ठराविक हंगामात एका गावातून दुस-या गावी येत-जात असत. त्‍यांमध्‍ये गोंधळी, घिसाडी आणि घडशी जातीचे लोक प्रामुख्‍याने असत, असा उल्‍लेख मराठी विश्‍वकोषात आढळतो. घडशी जातीत दोन पोटभेद आहेत. त्यांच्यात आते-मामे बहिणीशी लग्ने होतात.

होय, मी जगणार आहे!

 एका अपघातात तिचे दोन्ही हात व पाय तुटले. अपंग होऊनही तिने आपलं डॉक्टर होण्याचं स्वप्न भंग होऊ दिलं नाही. तिने जगण्याचा पर्याय स्वीकारला आणि एक आदर्श निर्माण केला त्या डॅनिएला गार्सियाची ही सत्यघटना...

सच्च्या सुरांची मैफल

 सूर तिला लहानपणीच गवसले, गाण्याचे अन्‌ जगण्याचेही. आजी आणि वडिलांच्या मार्गदर्शनाखाली तिचा गाण्याचा प्रवास सुरू झाला... भारतीय शास्त्रीय गायनात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या सावनी शेंडे-साठ्ये यांच्या यशाची कथा...

स्त्री समर्थ :..आणि विहीर खुली झाली

 अठराविश्वे दारिद्रय़ अनुभवत असताना काशीबाई जवादे समाजासाठी काम करतात. आजच्या काळातही अस्पृश्यता मानणाऱ्या समाजाला रोखठोक बोल सुनावून गावची विहीर सर्वासाठी खुली करणाऱ्या आणि समाजासाठी आयुष्य वाहून घेतलेल्या या समर्थ स्त्रीविषयी. ..

झणझणीत खांडोळी

 ‘तुझी खांडोळी करीन’ या वाक्प्रचाराला जन्माला घालणारी झणझणीत खांडोळी हा विदर्भातला एक चविष्ट पदार्थ. खांडोळी अत्यंत वेळखाऊ आणि खर्चिक असली तरी पुन्हा पुन्हा करायला प्रवृत्त करणारी...

(अंध) नेत्रज्योतींचा लखलखता प्रकाश

अंधत्व स्वीकारून सक्षमतेने आयुष्याला दिशा देणाऱ्या, आपल्याबरोबर इतरांनाही प्रकाश देणाऱ्या तीन ज्योतींची ही कहाणी..