भाऊसाहेब चासकर


संपर्क : bhauchaskar@gmail.com9422855151

भाऊ चासकर यांचा जन्‍म अकोले (अहमदनगर) तालुक्यातील बहिरवाडी या लहानशा खेड्यात शेतकरी कुटुंबात झाला. त्‍यांनी नोकरी करण्‍यास सुरूवात केल्‍यानंतर मराठी विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्‍यांना वाचन आणि लेखनाची आवड आहे. त्या ओढीनेच त्‍यांनी मास कम्युनिकेशन आणि जर्नालिझमची पदवी संपादन केली. चासकर यांनी ललित, वैचारिक स्वरूपाचे लेखन केले. त्‍यांचे शिक्षण, पर्यावरण हे विशेष आवडीचे, जिव्हाळ्याचे आणि अभ्यासाचे विषय आहेत. त्‍यांचे त्या विषयांत लिखाण सुरु असते. चासकर यांना लहानपणापासूनच निसर्गात भटकंतीची आवड आहे. त्यातून त्यांना छायाचित्रणाचा छंद जडला. भाऊ चासकर हे अकोला तालुक्‍यात बहिरवाडी या आदिवासी पाड्यावरील जिल्‍हा परिषदेच्‍या शाळेत शिक्षक म्‍हणून कार्यरत असून त्‍यांनी तेथे शिक्षणाविषयी अनेक प्रयोग राबवले आहेत.


ताम्हण - महाराष्ट्राचे राज्यपुष्प

(9 प्रतिक्रीया) ताम्हण हे महाराष्ट्राचे राज्यपुष्प! ते जारूळ किंवा बोंडारा या नावांनीदेखील ओळखले जाते. त्याचे शास्त्रीय नाव लॅजिस्ट्रोमिया (Lagerstroemia) असे आहे. लिथ्रेसी किंवा मेंदी कूळातील हा सपुष्प वृक्ष. त्याला तामण, बोंडारा, बोंद्रा, बुंद्रा अशी इतर नावेही आहेत. मला जंगलातून हिंडताना ताम्हणाचे फूल अनेकदा दिसे. मात्र त्या फुलाला ताम्हण म्हणतात, याबाबत माहिती नव्हती. एकदा आम्ही उन्हातान्हात जंगल तुडवड चाललो होतो. गर्द सावली असलेल्या एका झाडाखाली आम्ही विश्रांती घ्यायला थांबलो. सहज वर लक्ष गेले. पाहतो तर अख्खे झाड फुलांनी नटलेले!

आदिवासी पाड्यावरची ‘डिजिटल’ शाळा!

(6 प्रतिक्रीया)                                            शिक्षक म्हणून शिक्षणाच्या वाटेवरून प्रवास करताना एक ‘समज’ हळुहळू आतल्या आत विकसित होत गेली. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातल्या चांगल्या शाळांतही शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल पाहून किंवा गणिती क्रिया आणि भाषिक कौशल्ये व तत्सम गोष्टी किती आत्मसात केल्या यावरून ‘गुणवत्ता’ मोजली जात होती! साक्षरता म्हणजे गुणवत्ता असा अर्थ घेतला जात होता! सरकारचा लेखन-वाचन हमी कार्यक्रमदेखील तसाच आग्रह धरत होता.

महाराष्ट्राचे मानचिन्ह - शेकरू

(2 प्रतिक्रीया) संडेच्या सुटीचा मूड. मस्त ताणून दिलेली. मोबाईलची ट्रिंग ट्रिंग वाजल्याने साखरझोप डिस्टर्ब झाली. मित्र बोलू लागला. ''फार बोअर झालोय यार. कुठेतरी जंगलात जाऊ भटकायला... येतोस का?'' जंगल हा माझा एकदम विकपॉईंट! झोपेतच मित्राला ग्रीन सिग्नल दिला. उठलो. फटाफट उरकले. गरजेचं सामान घेतले. बाईकला किक मारली. निघालो... कुठे जायचे, ते काही ठरवले नव्हते. ''तू शेकरू पाहिलंस का रे?'' मी मित्राला विचारले. ''नाही यार दोन-तीनदा जाऊनही काही उपयोग झाला नाही. त्याबाबतीत मी फार अनलकी आहे.'' मोर्चा तोलारखिंडीच्या दिशेने वळवला. अकोलेहून दीड तासात तोलारखिंड गाठली. सकाळची वेळ. कोवळे उन पडलेले. निसर्ग मस्त खुललेला. ताजा टवटवीत अनुभव. कोथळे नामक आदिवासी खेड्यात बाईक उभी केली. वाट तुडवायला सुरुवात केली. एव्हाना जंगल जागे झालेले. पाखरांची किलबिल कानाला-मनाला आनंद देते होती. दूरच्या निर्झारांचे गाणे ऐकू येत होते.

भटक्यांची पंढरी हरिश्चंद्रगड

(4 प्रतिक्रीया) सह्याद्रीच्या कुशीत अनेक ट्रेकिंग पॉईण्टस आहेत. त्यातील हरिश्चंद्रगड म्हणजे हौशी ट्रेकर्सचा, दुर्गवेड्यांचा ‘विक पॉईण्ट’. ‘भटक्यांची पंढरी’ म्हणून ओळख असलेल्या त्या गडाच्या परिसरातील वैशिष्ट्यपूर्ण भूरूपे, कातळ शिल्पे, खोल दऱ्या, उरात धडकी भरवणारे उभे कडे, समृद्ध वनसंपदा, प्राचीन वास्तू कलेचे दर्शन घडवणारी देखणी मंदिरे, लेणी समूह... सह्याद्रीत अनेक कोकणकडे आहेत, परंतु हरिश्चंद्र गडाचा हा थोरला कडा म्हणजे सृष्टीला पडलेले सुंदर स्वप्नच जणू! देशभरात अत्यंत दुर्मिळ दिसणाऱ्या वर्तुळाकार इंद्रधनुष्याचा (इंद्रवज्र) अद्भुतरम्य देखावा काही दुर्गवेड्यांनी तेथे पाहिला आहे. म्हणूनच तो गड हा एक अनमोल ठेवा आहे.

इंद्रवज्र

(4 प्रतिक्रीया) इंद्रवज्र म्‍हणजे वर्तुळाकार इंद्रधनू. ते दिसणे ही अत्‍यंत दुर्मीळ गोष्‍ट. निसर्गाच्‍या या वैशिष्‍ट्याबद्दल सांगत आहेत भाऊसाहेब चासकर!

मुलांच्या भाषेचा आदर करुया!

  मूल जगण्याची गरज म्हणून भाषा शिकते. मुलाची भाषाक्षमता भोवतालच्या भाषेमुळे कार्यान्वित होत असते. मूल ज्या सहजतेने कुटुंबात भाषा शिकते, ती वापरते, त्यात व्यवहार करते; तितक्या नैसर्गिक पद्धतीने, सहजतेने मूल शाळेमध्येही भाषा शिकले पाहिजे. मुले वर्गांतून इतक्या सहज पद्धतीने भाषा शिकतात का? याचे उत्तर नाही असे येते. ते का? त्याचे उत्तर ‘प्रमाणभाषेत शिकण्याचा आणि शिकवण्याचा अतिरेकी आग्रह!’ होय!

सरकारी शाळा, इंग्रजी शाळा आणि आपण ...

(2 प्रतिक्रीया) - भाऊसाहेब चासकर    नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले, की शाळाप्रवेशाची लगबग सुरू होते. अनेक पालक आपल्या पोराला नेमके कोणत्या शाळेत घालावे या संभ्रमात दिसतात. गावाकडेदेखील इंग्लिश मिडियमच्या शाळांची 'क्रेझ' निर्माण झाल्यामुळे गावातील मराठी माध्यमाच्या, खासकरून जिल्हा परिषद शाळांत प्रवेश घेणा-यांची संख्या ब-यापैकी रोडावली आहे. जिथे गतवर्षी चौथ्या वर्गातून पन्नास मुले बाहेर गेली, तिथे अवघी १५,२०,२२...अशी मुले दाखल झाली आहेत! माझ्या मनात धोक्याची घंटा आधीपासून वाजत होतीच. आता तिचा आवाज खणखण असा ऐकू येत आहे, इतकेच.

भंडारद-याचा काजवा महोत्सव

भंडारदरा-घाटघर परिसरात दरवर्षी मे महिन्याचा शेवटचा पंधरवडा आणि जून महिन्याचा पहिला पंधरवडा या दरम्यान वृक्षराजीवर काजव्यांची मायावी दुनिया अवतरते. चहुबाजूंना असलेल्‍या मिट्ट काळोखात काजव्‍यांचा लयबद्ध चमचमाट सुरू असतो. काजव्‍यांच्‍या प्रकाशाची तीव्रता कमी असल्‍याकारणाने त्‍यांचा फोटो टिपणे हे कठीण काम असते. भंडारधरा परिसरात सध्‍या सुरू असलेल्‍या या काजवा महोत्‍सवाचा लेख उपलब्‍ध्‍ करून देतानाच या अद्भुत घटनेचे फोटो मिळवण्‍याचेही प्रयत्‍न सुरू होते आणि असाच एक दुर्मिळ आणि अद्भुत फोटो ‘थिंक महाराष्‍ट्र’च्‍या हाती लागला. हा फोटो वाचकांसाठी उपलब्‍ध करून देत आहोत.

लक्ष लक्ष प्रकाशफुले!

लक्ष लक्ष काजवे... नभोमंडळातील तारकादळच जणू धरतीच्या भेटीला आले आहे! आपल्या चहुबाजूंला पसरलेल्या मिट्ट काळोखाच्या साम्राज्यात 'अग्निशिखा' हे विशेषण सार्थपणाने मिरवणार्‍या काजव्यांचा  चमचमाट लयबद्ध सुरू आहे... आपण नि:शब्द! दरवर्षी मे महिन्याचा शेवटचा पंधरवडा आणि जून महिन्याचा पहिला पंधरवडा या दरम्यानच्या काळात भंडारदरा-घाटघर परिसरातील वृक्षराजीवर काजव्यांची मायावी दुनिया अवतरते.