प्रमोद शेंडे


संपर्क : pramodshripadshende@gmail.com9920202889 (022) 26832164

प्रमोद शेंडे हे विज्ञान विषयातील पदवीधर. त्‍यांनी गणिताच्‍या आवडीने राष्‍ट्रीयकृत बँकेत नोकरी पत्‍करली. ते बँकेतून वरिष्‍ठ अधिकारी म्‍हणून सेवानिवृत्‍त झाले. त्‍यांना वाचन, प्रवास आणि चित्रकलेची आवड आहे. ते 'थिंक महाराष्‍ट्र'ची सुरूवात झाल्यापासून लेखसूची या सदरासाठी काम करतात. 'थिंक'च्‍या 'सोलापूर जिल्‍हा संस्‍कृतिवेध' या मोहिमेमध्‍ये त्‍यांचा सहभाग होता.


सोलापूर शहरातील वास्‍तू आणि वैशिष्‍ट्ये

(1 प्रतिक्रीया) सोलापूर कर्नाटकच्या सीमेवर वसले आहे. सोलापुरात बहुभाषिक नागरिक आहेत. त्यास हजार वर्षांचा इतिहास आहे. ते पूर्वी सोन्नलगी या नावाने प्रसिद्ध होते. बाराव्या शतकात श्रीशिवयोगी सिद्धरामेश्वर यांनी या नगराची रचना केली. त्यांनी तेथे अडुसष्ट शिवलिंगांची स्थापना केली. छत्तीस एकर क्षेत्रफळ असलेले सरोवर निर्माण केले. त्यालाच सिद्धेश्वर तलाव असे म्हणतात. सिद्धरामेश्वरांनी समाजसुधारणेची लोकोपयोगी कामे केली. सोलापूर हे कापडगिरण्यांचे शहर म्हणून प्रसिद्ध होते. कापड उत्पादनास तेथे 1877 साली प्रारंभ झाला. ‘सोलापूर स्पिनिंग अँड विव्हिंग मिल’ ही पहिली गिरणी. ती ‘जुनी मिल’ म्हणून प्रसिद्ध होती. त्या मिलमध्ये तेलगू भाषिक समाज त्यांच्या वस्त्र विणण्याच्या कौशल्याबद्दल नावाजला गेला. ‘जुनी मिल’ हे सोलापूरचे वैभव मानले जाई.

डॉ. प्रतिभा जाधव - प्राथमिक शिक्षिका ते डॉक्टरेट प्राध्यापक

(17 प्रतिक्रीया) प्रतिभा जाधव-निकम यांचा प्राथमिक शिक्षिका ते डॉक्टरेट प्राध्यापक असा प्रवास थक्क करणारा आहे. त्या नाशिक जिल्ह्याच्या निफाड तालुक्यात लासलगाव येथे ‘नुतन विद्याप्रसारक मंडळा’च्या ‘कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालया’त मराठी विभाग प्रमुख आहेत. त्यांना लहानपणापासून वेगळे, नवीन काही करण्याचा ध्यास होता. त्यामुळे त्यांनी उच्च शिक्षणाचे ध्येय जोमाने गाठले. त्या एम.ए., एम.एड., सेट (मराठी, शिक्षणशास्त्र), पीएच.डी. आहेत. त्यांचे भाषा व शिक्षणविषयक शोधनिबंध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय रिसर्च जर्नल्समध्ये प्रकाशित झाले आहेत. त्यांच्या ‘अक्षराचं दान’ या पहिल्याच कवितासंग्रहाला उत्कृष्ट साहित्य निर्मितीचा राष्ट्रीय पुरस्कार 2012 साली प्राप्त झाला व पाच राज्यस्तरीय पुरस्कारही लाभले.

नईमभाई पठाण - पुरातन वस्तूंचे संग्राहक

(6 प्रतिक्रीया) नाशिक जिल्ह्याच्या निफाडमध्ये राहणारे नईमभाई पठाण हे हरहुन्नरी व्यक्तिमत्व आहेत. ते ‘नाशिक जिल्हा ग्रंथालय संघा’चे बावीस वर्षांपासून कार्यवाह म्हणून कार्यरत आहेत. त्यांना 2012 साली ग्रंथमित्र पुरस्कारही मिळाला. ते त्यांचे घड्याळदुरुस्ती व विक्री हे परंपरागत दुकान सांभाळून आजुबाजूच्या गावातून, शहरांतून फेरफटका मारतात. तेथील जुने बाजार धुंडाळतात. दुर्मीळ, अनोख्या वस्तूंचा त्यांचा संग्रह पाहण्याजोगा आहे.

मल्लप्पा ऊर्फ आप्पासाहेब वारद

(1 प्रतिक्रीया) मल्लप्पा ऊर्फ आप्पासाहेब वारद हे देशातील उत्कृष्ट बारा उद्योजकांत नाव असलेले व्यापारी सोलापूरात होऊन गेले. व्यापार, उद्योग, दानधर्म व धार्मिक अधिष्ठान या क्षेत्रांत चतुरस्र कामगिरी करणारे आप्पासाहेब 1851 साली जन्मले. तरुणपणी, ते पुण्याला वास्तव्यास असताना त्यांचा परिचय वैद्य मेहेंदळे, न्यायमूर्ती रानडे, लोकमान्य टिळक, आगरकर, नामजोशी, चिपळूणकर या अग्रणींशी झाला. त्यांनी त्यांच्या पिढीजात व्यापारात लक्ष घालून दोन पेढ्या असलेला उद्योग भारतभर चाळीस पेढ्यांपर्यंत वाढवला. त्या पेढ्यांमधील हिशोब लिहिण्याची पद्धत ब्रिटिशांनीही अंगिकारली.

बसवेश्वर - आद्य भारतीय समाजसुधारक

(2 प्रतिक्रीया) महात्मा बसवेश्वर हे वीरशैव धर्माचे पुनरूज्जीवन करणारी महान विभूती होते. कर्नाटक ही त्याची कर्मभूमी. त्यांनी धर्म, समाज, तत्त्वज्ञान, वाङ्मय, राजकारण इ. क्षेत्रांत केलेले कार्य क्रांतिकारक स्वरूपाचे आहे. बसवेश्वर हे मध्ययुगातील भारताच्या धार्मिक, सांस्कृतिक, साहित्यिक, शैक्षणिक, राजकीय व सामाजिक जीवनातील ज्येष्ठ समाज परिवर्तनवादी युगपुरुष होते. समाजसुधारकांच्या यादीतही यांचे पहिले स्थान आहे. म्हणूनच त्यांना आद्य भारतीय समाजसुधारक, क्रांतीयोगी व युगपुरुष मानले जाते.

जवाहरलाल शेतकी विद्यालय मंगळवेढा

जवाहरलाल शेतकी विद्यालय हे गावकऱ्यांच्या वर्गणीतून बांधले गेले आहे. तेथे इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत वर्ग चालतात. शाळेत कर्मचारी छत्तीस आहेत, त्यांपैकी एकोणतीस शिक्षक. सहाशेपन्नास विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेत विविध उपक्रम राबवले जातात. 1. दैनंदिन पंचांग लेखन, 2. मोफत जादा तास, 3. वस्त्र बँक, 4. शैक्षणिक सहल, 5. वार्षिक हस्तलिखित, 6. शालेय पोषण आहार, 7. व्याख्यानमाला, 8. एस.एस.सी. दत्तक योजना, 9. श्रमदान, 10. परिसर स्वच्छता.

औरंगजेबाचा किल्ला व त्याची मुलगी बेगम हिची कबर

सोलापूरच्‍या मंगळवेढा तालुक्‍यात माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरापासून जवळच औरंगजेबाचा किल्‍ला आहे. औरंगजेबाच्या सैन्याचा तळ 1694 ते 1701 या काळात तेथे होता. स्वत: औरंगजेबही त्या काळात तेथे राहत असे. किल्‍ला व तेथील बुरुज काही ठिकाणी मोडकळीस आले आहेत. किल्ल्याचा परिसर मोठा असून आतमध्ये रान माजले आहे. तेथे वस्ती नाही. जवळूनच भीमा नदी वाहते. किल्ल्यातच एक पडकी मशीद आहे व बाजूला एक कबर दिसते. कबर साधी असून ती औरंगजेबाची मुलगी झेब्बुन्निसाची असावी असे लोक म्हणतात, पण नक्की माहिती कोणालाच नसल्याने ती कबर कोणाची हा प्रश्न पडतो. सोलापूरचे शासकीय पुरातत्त्व खाते तेथील कारभार पाहते. -राजा/राणी पटवर्धन, प्रमोद शेंडे

सोलापूर महापालिकेची देखणी इमारत

जगभरातील सर्वोत्कृष्ट स्थापत्य पद्धतीचा वापर करण्यात आलेली देखणी इमारत ‘इंद्रभुवन’! उद्योजक मल्लप्पा ऊर्फ आप्पासाहेब वारद यांनी सोलापूर शहराच्या सुवर्णवैभवी काळाची साक्ष देणारी ती इमारत 1899 साली बांधण्यास सुरुवात केली. तिचे बांधकाम तेरा वर्षे चालले. त्यांच्या कायमस्वरुपी वास्तव्यासाठी व्हिक्टोरियन स्थापत्य शास्त्राचा उत्कृष्ट नमुना असलेली ती इमारत (नव्हे महालच) बांधली. त्यांना त्या बांधकामासाठी साडेचार लाख रुपये खर्च आला. त्यांनी जगभर दौरे करून त्या इमारतीसाठी सुबक व आकर्षक वस्तू आणल्या; जगभरातील अत्याधुनिक बांधकाम साहित्यही वापरले. जगातील विविध स्थापत्यकलांच्या मिश्रणातून तो प्रासाद साकारला गेला आहे. ती इमारत इ.स. 1912 साली पूर्णत्वास आली, पण त्याआधी 1911 साली आप्पासाहेब वारद यांना मृत्यू आला व त्या भव्य महालात त्यांना राहता आले नाही. वारद कुटुंबीय त्या ‘इंद्रभुवन’मध्ये राहू लागले. त्यांना नंतरही वारद कुटुंबीयांना आणखी दोन लाख खर्च आला.

पुलगम टेक्स्टाइल - सोलापूरची शान

पुलगम, अर्थात सोलापुरी चादरींचे नाव भारतभर आहे. सोलापूरची चादर म्हटले, की पुलगम ब्रँडचे नाव येतेच. फक्त चादरच नव्हे तर टेक्स्टाइल इंडस्ट्रीमध्ये पुलगम यांचे नाव दुमदुमत आहे.

सोलापूरातील बुद्धविहार

(1 प्रतिक्रीया) सोलापूरातील मिलिंदनगर येथे हा बुद्धविहार आहे. बुद्धविहाराने पूर्ण तळमजला व्यापला आहे. तेथे वॉलपेपरवर मोठा वृक्ष व त्याखाली बुद्ध बसलेले आहेत. बाजूला आंबेडकरांचा अर्धपुतळा आहे व दोन्ही बाजूंस दोन बौद्ध भिक्षूक (कार्डबोर्डवर) आहेत. दर पौर्णिमेला तेथे विशेष पूजा करतात व प्रसाद म्हणून गव्हाची खीर वाटतात. तेथे रोज पूजाही होते. लोकांच्या वर्गणीतून नाश्ता दिला जातो. बुद्ध विहार बांधून दहा वर्षे झाली आहेत. - प्रमोद शेंडे

सोलापूरचा भुईकोट किल्ला

सोलापूर शहरातील भुईकोट किल्ल्याचा परिसर मोठा आहे. किल्ल्यात जाण्यासाठी पाच रुपयांचे तिकिट आहे. आतमध्ये बाग आहे, पण देखभाल होत नसल्याचे जाणवले. दोन पोलादी तोफा व एक माहिती देणारा दगडी फलक लावला आहे. आतमध्ये नमाजासाठी पडकी मशिद आढळली. ती अनेक खांबी आहे. पुढे छोटा हौद आहे. त्यात दगडी कलाकुसर हिंदु पद्धतीची आहे. आतमध्ये सभोवताली चिंच, बाभूळ, बदाम, कडुनिंब असे मोठमोठे वृक्ष आहेत. कारंजांच्या जागाही आहे, पण पाणी नसल्याने ते कोरडे आहेत!

सोलापूरातील प्रेरणाभूमी

सोलापूरमधील ‘प्रेरणाभूमी’ म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थींचा कलश ठेवलेली जागा! ती दुमजली सुंदर इमारत असून तळमजला व पहिला मजला अशी ती वास्तू! दोन्ही मजल्यांवर मोठी सभागृहे आहेत. तळमजल्यावर बुद्धाचा व डॉ. आंबेडकरांचा पुतळा आहे. वरच्या मजल्यावर चांदीचा अस्थिकलश व बाबासाहेबांचा अर्धपुतळा आहे. समोरील सभागृहात बुद्धपौर्णिमेला मोठ्या प्रमाणात कार्यक्रम होतो, तर दर पौर्णिमेला एखादे व्याख्यान असते. अस्थिकलशाच्या वरच्या घुमटावर दोन मोठे लाऊडस्पीकर आढळले. त्यावर रोज सकाळी बाबासाहेबांची गाणी ऐकवली जातात.

सोलापूरचे रूपाभवानी मंदिर

सोलापूरातील रुपाभवानीचे देऊळ मोठे आहे. त्‍या देवळातील आतील भाग दगडी व कलाकुसरयुक्त आहे. त्या मंदिराचे बांधकाम व त्यावरील रंगीत शिखराचे काम ‘श्री रूपाभवानी भक्त मंडळ’ व ‘श्री वल्लभदास अग्रवाल’ यांच्या सहकार्याने झाले. रुपाभवानी देवीला सुंदर पितळी मुखवटाही आहे. देवीच्‍या मंदिरात नवस फेडले जातात. विशेष म्हणजे मुस्लिम स्त्रीपुरुषही नवस फेडण्यासाठी आलेली दिसतात. सोलापूरात दुर्गामातेची तीन रुपे विशेष प्रसिद्ध आहेत. एक सोलापूर शहरातील रुपाभवानी, दुसरी माढ्याची माढेश्‍वरी देवी आणि तिसरी करमाळ्याची श्री कमला देवी. - प्रमोद शेंडे

सोलापूरचे श्री सिद्धरामेश्वर मंदिर

(1 प्रतिक्रीया) श्री सिद्धरामेश्वर हे सोलापूरचे ग्रामदैवत! महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेश या तीन राज्यांतील भक्तांचे ते आराध्य दैवत! सिद्धेश्वर मंदिराचा परिसर छत्तीस एकरांचा आहे. तिन्ही बाजूंला सरोवर आहे व ते स्वच्छ ठेवले आहे. मंदिराआधी डाव्या बाजूस ग्रंथालय व पुढे हनुमान मंदिर आहे. मुख्य मंदिर भव्य आहे. मंदिरावर व कळसावर कलाकुसर आहे.

श्री कमलादेवी मंदिर - महाराष्ट्रातील दक्षिणीशैलीचे पहिले मंदिर

(2 प्रतिक्रीया) सोलापूर जिल्ह्यातील करमाळा हे निंबाळकर घराण्याच्या जहागिरीचे गाव! रंभाजीराव (रावरंभा) निंबाळकर हा शिवाजीमहाराजांच्या जावयाच्या पुढील वंशजांपैकी होता. तो 1705 मध्ये मराठ्यांकडून मोगलांशी लढला. पण नंतर शाहू व ताराबाई यांच्या कलहात 1710 मध्ये मोगलांकडे गेला व त्याला पुण्याची सुभेदारी मिळाली. पण पुण्यात पेशव्यांचा उदय झाल्यानंतर मोगलांनी त्याला करमाळा, माढे व परांडे या परगण्याची जहागिरी दिली.

नीरा-भीमेच्या संगमावरील श्री लक्ष्मी नृसिंह देवस्थान

(4 प्रतिक्रीया) श्री लक्ष्मी नृसिंह हे पुरातन देवस्थान नीरा आणि भिमा नद्यांच्‍या संगमावर वसलेले आहे. इंदापूर, माळशिरस, माढा या तीन तालुक्यांच्या सीमारेषांच्या हद्दीत नीरा आणि भिमा या नद्यांचा संगम होतो. पश्चिमेकडून वाहत येऊन पंढरपूरच्‍या दिशेने कूच करणारी भीमा पश्चिमेकडून वाहत येऊन पूर्वेला जाणा-या नीरा नदीला आलिंगन देते. संगम झाल्यानंतर भीमा-निरा नदीचे रूपांतर चंद्रभागा नदीत होते. ती चंद्रभागा पुढे पंढरपूरच्या दिशेने वाहते. त्‍या संगमक्षेत्री असलेल्या नीरा नृसिंहपूर या गावात श्री लक्ष्मी नृसिंह हे पुरातन देवस्थान आहे. देवस्‍थानातील श्री लक्ष्मी नृसिंहाचे मुख्य मंदिर चिरेबंदी असून त्‍याचा आकार षटकोनी आहे. मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी तेहतीस उंच चिरेबंदी पायऱ्या चढून जावे लागते. पायऱ्यांना लागूनच उजवीकडे नीरा नदीवरील ऐसपैस लक्ष्मीघाट आहे. घाटाच्या मध्यभागी लांबरुंद चौथरा व पायथ्याशी नदीपात्रात बुरुज आहे.

दि सासवड माळी शुगर फॅक्टरी लि.

सोलापूर जिल्ह्यात बत्तीस साखर कारखाने आहेत. त्यांतील पाच कारखाने माळशिरस तालुक्यात आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळात नगर जिल्ह्याच्या सासवड, कोपरगाव, श्रीरामपूर या भागातील प्रगतीशील शेतकऱ्यांनी परंपरागत शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढवला होता; पण शेतमालाच्या अनिश्चित भावामुळे, मुंबई राज्य पाटबंधारे खात्याने केलेल्या शिफारशीनुसार कालव्याच्या पाण्याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी एकत्रित होऊन 17 नोव्हेंबर 1932 रोजी ‘दि सासवड माळी शुगर फॅक्टरी लि., माळीनगर’ या कंपनीची स्थापना केली.

इंटरनेट व्यसनाचे बळी – डॉ. अद्वैत पाध्ये

इंटरनेट व्यसनाचे बळी – डॉ. अद्वैत पाध्ये - कुमारवयीन तरुणांमधील आत्महत्या व त्यांच्यातील वाढती हिंसक वृत्ती या गंभीर समस्यांना गढुळलेले कौटुंविक, सामाजिक वातावरण कारणीभूत आहे. तसेच, आधुनिक तंत्रज्ञानाचे कळत-नकळत होणारे दुष्परिणामही. ‘इंटरनेट-व्यसनाधीनता’ हे त्यातील महत्त्वाचे कारण! या ‘दुखर्याण संगती’विषयी, तिच्या दुष्परिणामांविषयी व त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय सुचवणारा लेख. (लोकसत्ता, चतुरंग पुरवणी, १५ डिसेंबर २०१२)

महाराष्ट्रातील कुरणांवर चरतंय कोण? – संजय सोनवणी

महाराष्ट्रातील कुरणांवर चरतंय कोण? – संजय सोनवणी - देशातील पंधरा टक्के जनता पशुपालनावर अवलंबून आहे. देशातील पशुधन गेल्या पन्नास वर्षांत दुपटीने वाढले, पण त्यांच्यासाठी चराऊ कुरणे मात्र अर्धी झाली आहेत. महाराष्ट्र ही पशुपालकांची आद्य भूमी, कारण निमपावसाचा प्रदेश असल्याने कुरणे भरपूर! सद्यस्थिती काय आहे? पर्यावरणावर त्याचे काय दुष्परिणाम होत आहेत, याविषयी अभ्यासपूर्ण लेख. (साप्ताहिक लोकप्रभा, २४ डिसेंबर २०१२)

शनिदेवाचे महात्म्य –यशवंत रायकर

शनिदेवाचे महात्म्य –यशवंत रायकर - शनीचे खगोलशास्त्रीय चौकटीतून महात्म्य. (दैनिक प्रहार, कोलाज पुरवणी, ३० डिसेंबर २०१२)

नवाबी ऐश्वर्याचा मुर्शिदाबादचा राजवाडा – अरुण अग्निहोत्री

नवाबी ऐश्वर्याचा मुर्शिदाबादचा राजवाडा – अरुण अग्निहोत्री - पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथील तब्बल हजार दरवाजे असलेला राजवाडा एकेचाळीस एकर जागेवर बांधलेला आहे. म्युझियममध्ये रूपांतर केलेल्या त्या राजवाड्यातील दरबार हॉलमध्ये ऐंशी फूट उंच घुमटातून लटकणारे शहाण्णव दिव्यांचे प्रचंड झुंबर व पर्यटकांचे प्रतिबिंब पर्यटकाला न दिसता राजवाड्यातून दुसर्या  ठिकाणच्या व्यक्तीला दिसेल असा गंमतीदार (जादूचाच) आरसा आहे. त्या राजवाड्याची माहिती. (लोकसत्ता, वास्तुरंग पुरवणी, ०८ डिसेंबर २०१२)

गीत लिखा है... – संजीव पाध्ये

गीत लिखा है... – संजीव पाध्ये - जुन्या हिंदी चित्रपट काळातील शैलेंद्र, हसरत जयपुरी, शकील बदायुनी, मजरूह सुलतानपुरी, नीरज, प्रदीप, राजेंद्रकृष्ण, कैफी आझमी, प्रेमधवन, इंदिवर, गुलजार, आनंद बक्षी यांच्या गीतांच्या अफलातून कहाण्या व ती अजरामर गाणी याबद्दल अप्रतिम लेख. (अपूर्वाई, दिवाळी अंक २०१२)

मराठी चित्रपट : कथेची पटकथा... – ह्रषीकेश कोळी

मराठी चित्रपट : कथेची पटकथा... – ह्रषीकेश कोळी - महाराष्ट्राच्या मातीतील चित्रपट निघू लागल्याला शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत. शंभर वर्षांतील मराठी चित्रपटांचा मागोवा. (अपूर्वाई, दिवाळी अंक २०१२)

इसवी सनापूर्वी दीड हजार वर्षे! – मुकुंद कुळे

इसवी सनापूर्वी दीड हजार वर्षे! – मुकुंद कुळे - भारताची समृध्द परंपरा म्हणजे मोहेंजदडो व हडाप्पा येथील सिंधुसंस्कृती... पण त्याचवेळी महाराष्ट्राला वेगळी पुरातत्त्वीय ओळख मिळवून देणा-या ‘जोर्वे’ या इतिहासपूर्व काळात महाराष्ट्रात नांदलेल्या पहिल्या कृषिसंस्कृतीची ओळख. - (महाराष्ट्र टाइम्स, दिवाळी अंक २०१२)

त्यांच्या मागावर... – डॉ. विनया जंगले

त्यांच्या मागावर...  – डॉ. विनया जंगले. - पशू-पक्ष्यांची स्वत:ची अशी जगण्याची पध्दत जाणून घेण्यासाठी रेडिओ टेलिमेट्री, मायक्रोचिप वा रेडिओ कॉलर वापरतात. त्यामुळे त्यांच्या प्रवासाचा मागोवा घेऊन त्यांच्याविषयी वेगळी माहिती उपलब्ध होते. प्राणी-पक्ष्यांचे वर्तन समजून घेण्याच्या दृष्टीने माहिती मनोरंजक तर असतेच, पण वन्यजीव व्यवस्थापनाच्या दृष्टीने ती मोलाचीही असते. नव्या जीवनपध्दतीची करून दिलेली ओळख. (महाराष्ट्र टाइम्स, दिवाळी अंक २०१२)

सजिवांच्या शोधात मंगळमोहिमा...! – अविनाश परांजपे

सजिवांच्या शोधात मंगळमोहिमा...! – अविनाश परांजपे. - मंगळावर सजीव सृष्टी अस्तित्वात आहे का यावर पृथ्वीवरील मानवाला कायम कुतूहल! त्यामुळे तो शोध घेण्यासाठी मोहिमा आखण्यात आल्या. ‘नासा’चे ‘क्युरियासिटी’ नावाचे यान मंगळाच्या भूमीवर उतरले आहे. तेथील परिस्थितीचा व मोहिमांचा घेतलेला वेध. (महाराष्ट्र टाइम्स, दिवाळी अंक २०१२)

तंत्रायुषी भव!

तंत्रायुषी भव! – नीरज पंडित तंत्रज्ञानाने मानवी जीवनात आमूलाग्र बदल केले आहेत. पोखरण अणुबाँब चाचणीचा दिवस ‘राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस’ म्हणून साजरा केला जातो. त्या निमित्ताने भविष्यात तंत्रज्ञान आपल्याला कुठे घेऊन जाणार आहे त्याचा वेध! - (लोकसत्ता, लोकरंग पुरवणी ११ मे २०१४) (विशेष पुरवणी)

पर्यटकांची मक्का... हाँगकाँग! – वीरेंद्र तळेगावकर

पर्यटकांची मक्का... हाँगकाँग! – वीरेंद्र तळेगावकर पर्यटनाला अनुकूल अशा सोयिसुविधा आणि विकास जाणीवपूर्वक देणाऱ्या हाँगकाँगला ‘भन्नाट’ हेच नाव शोभेल! जागतिक आर्थिक केंद्रांपैकी एक असलेल्या हाँगकाँगची सफर. (लोकसत्ता, लोकरंग पुरवणी ११ मे २०१४)

जांभळी जर्द जादू...

जांभळी जर्द जादू... – परिमल चौधरी जगभरातील लहानथोरांच्या आवडीचे कॅडबरी चॉकलेट! कॅडबरीच्या निर्मात्याला जाऊन सव्वाशे वर्षे पूर्ण झाली व त्याबरोबरच ‘कॅडबरी’ ब्रॅण्डचा अस्त होऊन ती कंपनी ‘मॉन्देलेज उद्योगसमूह’ या नावाने ओळखली जाईल. कॅडबरीचा इतिहास कथन करणारा लेख. (लोकसत्ता, लोकरंग पुरवणी ११ मे २०१४)

‘चतुरंग’चा शिक्षणरंग – कमलाकर नाडकर्णी

‘चतुरंग’चा शिक्षणरंग – कमलाकर नाडकर्णी कोकणातील चिपळूणजवळील वहाळ गावात ‘चतुरंग’ या संस्थेतर्फे गरीब विद्यार्थ्यांसाठी निवासी अभ्यासवर्ग चालवले जातात. नापास विद्यार्थ्यांसाठी पूर्वतयारी, उजळणी वर्ग चालवून त्यांचा पास होण्याचा निर्धार वाढवण्यात येतो. शिस्त, काटेकोरपणाने निरपेक्ष व निष्ठापूर्वक सेवा देणाऱ्या कार्यकर्त्यांबद्दल व या निवासी वर्गाबद्दल माहिती. गेली चाळीस वर्षे नवे नवे कार्यक्रम करण्यात ख्यातनाम झालेल्या ‘चतुरंग’तर्फे या निवासी अभ्यासवर्गात चौरस आहार देण्यात येतो. मुंबईच्या काही अव्वल शिक्षकांचे मार्गदर्शनही त्यांना दिले जाते. (लोकसत्ता, लोकरंग पुरवणी ११ मे २०१४)

वाहनसौख्य - विदेशातील! – श्रीपाद पु. कुलकर्णी

वाहनसौख्य - विदेशातील! – श्रीपाद पु. कुलकर्णी अमेरिकेत शिकागो येथे कामानिमित्त गेल्यावर गाडी चालवण्याशिवाय गत्यंतर नसल्यामुळे लेखकाने तो अनुभव घेतला आणि लक्षात आले, की भारतात गाडी चालवणे सोपे आहे, कारण नियम पाळायचेच नसतात ना! तेथे मिळालेले मजेदार अनुभव. (साप्ताहिक लोकप्रभा १६ मे २०१४)

शासन म्हणजे व्यवस्था की शिक्षा?

शासन म्हणजे व्यवस्था की शिक्षा? – हृषीकेश जोशी इंग्लंड, स्कॉटलंडमध्ये फिरताना काही आश्चर्यचकित करणारे अनुभव लेखकाला आले. लोकसंपर्कांतर्गत येणाऱ्या सर्वच ठिकाणी सामान्य नागरिकाला मिळणारे प्राधान्य व त्याची घेतली जाणारी काळजी बघून भारतीय नागरिकाला शासनाचा अर्थ फक्त शिक्षा असावा असेच वाटते, पण परदेशात त्याचा अर्थ व्यवस्था हा पण आहे हे उमगते! (साप्ताहिक लोकप्रभा १६ मे २०१४)

निसर्गरम्य बाली

निसर्गरम्य बाली – स्मिता गिरी. इंडोनेशियाचे बाली बेट अनुपम सौंदर्याने नटलेले आहे. ते पंच्याण्णव टक्के हिंदू असलेले इंडोनेशियातील एकमेव बेट! हजारांपेक्षा जास्त मंदिरे असलेल्या बेटाच्या सहलीचा ताजातवाना अनुभव. - (साप्ताहिक लोकप्रभा ०९ मे २०१४)

महाराष्ट्राचा कायदा, गुजरातचा फायदा

महाराष्ट्राचा कायदा, गुजरातचा फायदा – सुलक्षणा महाजन गुजरातमध्ये शहरी नियोजन आणि घरबांधणीसाठी जमीन संपादनाचा ‘बदनाम’ कायदा न वापरता जवळपास नऊशे चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेली जमीन तेथील महापालिकांना सार्वजनिक सुविधांसाठी मिळाली. वस्तुत: त्यासाठीचा कायदा मुंबई इलाख्याचा असूनही महाराष्ट्रात खासगी विकासकांसाठी त्याकडे दुर्लक्ष होत आहे. अभ्यासपूर्ण लेख. (लोकसत्ता १३ मे २०१४)

शिकवा आणि शिका!

(2 प्रतिक्रीया) शिकवा आणि शिका! – जिज्ञासा मुळेकर अमेरिकेत मास्टर्स आणि पीएच.डी. शिकवणाऱ्या प्राध्यापकांना मदतनिसांची गरज असते. अशी मदतनिसाची भूमिका बजावताना मिळालेले काही अनुभव, तेथील कामाचे स्वरूप, विद्यार्थ्यांची मानसिकता, त्यांची कष्ट करण्याची व अभ्यासाची पद्धत वगैरे माहिती सांगणारा मनोरंजक लेख. (माहेर मासिक, मे २०१४)

मराठीचे वय किती?

मराठीचे वय किती? – प्रा. हरी नरके. बोलणाऱ्यांची संख्या बघितली तर मराठी ही जगातील दहाव्या क्रमांकाची भाषा आहे. ‘ती संस्कृतोद्भव आहे व तिचे वय सुमारे आठशे वर्षे असावे’ असे मानले जात होते. पण संशोधन सांगते की तिचे वय दोन हजार वर्षांपेक्षा जास्त असून ती संस्कृत भाषेच्या आधी अस्तित्वात होती. त्या विषयावर निरनिराळे दाखले देत सिद्ध केलेला लेख. - (माहेर मासिक, मे २०१४)

बेजबाबदारीचा वारसा!

बेजबाबदारीचा वारसा! – डॉ. श्रीकांत प्रधान. महाराष्ट्रातील अनेक प्राचीन ऐतिहासिक स्थळे पुरातत्त्व विभागाच्या संरक्षणाखाली आहेत. त्यांची देखभाल, संरक्षण, जतन केले जाते ते या विभागामार्फत! पण अशी काही स्थळे एकाकी ठिकाणी व दूरच्या भागात असतात. तरीही ती ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाची असतात. पण अनेक पर्यटक तेथे जाऊन त्यांची नावे तेथे लिहून, कोरून, तेथील प्राचीन चित्रांवर रंग लावून व तेथील मूर्ती पळवून त्यांचा बेजबाबदारपणा दाखवत असतात. याबद्दल लोकांत जागरूकता आणली पाहिजे. त्या विषयाबाबत एका कला इतिहासतज्ज्ञाचे विचार. (महाराष्ट्र टाइम्स विशेष पुरवणी ११ मे २०१४)

अमेरिकेतील जगप्रसिद्ध ‘गुगल’ कंपनीला भेट

अमेरिकेतील जगप्रसिद्ध ‘गुगल’ कंपनीला भेट – कल्याणी गाडगीळ. माउंटन व्ह्यू कॅलिफोर्निया या अमेरिकन नगरीत ‘गुगल’चे भव्य ऑफिस संकुल आहे. तेथे काम करणाऱ्या गुगलर्सच्या पालकांना एक दिवस त्या ऑफिसेसना भेट देण्याचे आमंत्रण कंपनीतर्फे दिले होते. ‘गुगल’चे सध्या काय काय उपक्रम व संशोधन चालू आहे याची माहिती त्यांना दिली गेली; तसेच ‘गुगलर्स’ना कोणत्या सोयीसवलती उपलब्ध आहेत याचीही माहिती दिली गेली. सर्व जगाला हेवा वाटू शकेल अशा या ‘गुगल’नगरीची सैर. (मासिक विपुलश्री मे २०१४)

किवीज, कांगारूंच्या देशाचे अंतरंग...

किवीज, कांगारूंच्या देशाचे अंतरंग... – महेंद्र महाजन सुंदर, स्वच्छ समुद्र किनारे, आल्हाददायक वातावरण व निसर्गाची उधळण यांनी नटलेल्या न्यूझीलंड व ऑस्ट्रेलियात लोकजीवन कसे असते. ते विकएण्ड कसे साजरे करतात ह्याचा त्या देशातील समाजमनाच्या अंतरंगात डोकावून घेतलेला शोध. - (सकाळ साप्ताहिक ०३ मे २०१४)

टूर- द- पंजाब – श्रीधर पाठक

टूर- द- पंजाब – श्रीधर पाठक पंजाबमधील अमृतसरमध्ये मारलेला फेरफटका. - (सकाळ साप्ताहिक ०३ मे २०१४)

ओळखा! गुड टच... बॅड टच – विलास पाटील.

ओळखा! गुड टच... बॅड टच – विलास पाटील. विकृत पिसाटांच्या वासनेचे बळी ठरत आहेत लहान मुले-मुली! त्यासाठी खाऊ-खेळणी ही कशी माध्यमे बनतात? त्यापासून दूर कसे राहायचे आणि ‘बॅड टच’ कसा ओळखायचा याचे मार्गदर्शन पुण्यातील काही कॉलेज तरुण एका उपक्रमाद्वारे राबवत आहेत. त्यांच्या कार्याबद्दल. - (साप्ताहिक चित्रलेखा ०५ मे २०१४)

‘महापुरा’त सहकाराच्या गटांगळ्या

‘महापुरा’त सहकाराच्या गटांगळ्या – आनंद गोरड. दूधाचा महापूर यशस्वी होत असताना महाराष्ट्रातील सहकारी दूध व्यवसाय डबघाईकडे वाटचाल करू लागल्याची शंका येणे ही मोठी विसंगती आहे. त्यामागील कारणांचा वेध. - (लोकसत्ता २९ एप्रिल २०१४)

घरोघरी मातीच्या चुली

घरोघरी मातीच्या चुली – प्रभाकर भोगले. स्टोव्ह व गॅसच्या जमान्यापूर्वी घरोघरी शेगड्या वा चुली असायच्या. चूल कशी असे? त्याचे विविध प्रकार यांचा घेतलेला मागोवा. - (लोकसत्ता-वास्तुरंग पुरवणी २६ एप्रिल २०१४)

डहाणूचे चिकू वैभव

डहाणूचे चिकू वैभव – वैभव शिरवडकर. चिकू म्हटले की डहाणू तालुक्यातील घोलवड – बोर्डीचे नाव आठवणारच! त्या भागातील चिकूच्या अमाप उत्पादनाला प्रक्रिया उद्योग व कृषी पर्यटन यांची जोड मिळाली आहे. डहाणुकरांनी त्याबाबत कंबर कसली आहे. हव्याहव्याशा चिकू सफारीबद्दल. - (दैनिक प्रहार-कोलाज पुरवणी २० एप्रिल २०१४)

हंगेरी

हंगेरी – गौरी बोरकर. हंगेरी देशाची राजधानी असलेल्या बुडापेस्टची सैर. बुदा आणि पेस्ट ही जुळी शहरे आहेत व ती डेन्यूब नदीच्या एकेका तीरावर वसली आहेत. जुन्या काळच्या नितांत सुंदर इमारती, चर्चेस, राजवाडे, पार्लमेंट हाऊस ही त्या शहरांची वैशिष्ट्ये. - (साप्ताहिक लोकप्रभा २८ एप्रिल २०१४)

मराठी लिपीत सुधारणा : अक्षर आणि ध्वनी

मराठी लिपीत सुधारणा : अक्षर आणि ध्वनी – प्रा. प्रकाश ज. गुप्ते. इतर भाषकांना जर मराठी भाषा शिकायची किंवा मराठी वाङ् मय वाचनाची इच्छा असेल तर त्यांना च, ज, झ यांची दोन्ही रूपे कळत नाहीत. ‘ळ’चा उच्चार जमत नाही. त्यासाठी लेखक, मुद्रक, शिक्षणतज्ज्ञ व वर्तमानपत्रे यांनी पुढाकार घ्यावा तरच मराठी शिकणाऱ्यांना ती अक्षरे व त्यांचे ध्वनी कळू शकतील. त्याविषयी. - (साप्ताहिक लोकप्रभा २८ एप्रिल २०१४)

ठरवणे आणि करणे

ठरवणे आणि करणे – अजित बा. जोशी. नियोजन व अंमलबजावणी म्हणजे ठरवणे आणि करणे यामध्ये सुसूत्रता असणे. ती लोकप्रशासनासारख्या क्षेत्रात आवश्यक का असते हे भारतातील अनेक शहरांच्या अवस्थेकडे पाहून पटू लागते. देशातील फक्त तीन नियोजनबद्ध शहरेदेखील निरनिराळ्या स्थितीत दिसतात यामागे तेच कारण आहे. त्यासाठी काय करण्याची आवश्यकता आहे यासंबंधी विचार करायला लावणारा लेख. - (लोकसत्ता २३ एप्रिल २०१४)

पाणबुड्यांचं पाण्यातील विचित्र विश्व

पाणबुड्यांचं पाण्यातील विचित्र विश्व – हिरेन मेहता. तेथे दिवस रात्र असे काहीही नसते. चहुकडे पाणीच पाणी! आणि ते असूनही हातपाय धुवायलाही पाण्याची टंचाई. खोल पाण्यात राहून शत्रूची दाणादाण उडवणाऱ्या पाणबुडीतील आयुष्य! पाणबुडीच्या अंतरंगातील सफर - (साप्ताहिक चित्रलेखा ०७ मार्च २०१४)

संशोधन वाढतंय पण संवर्धनाचं काय?

संशोधन वाढतंय पण संवर्धनाचं काय? – धर्मराज पाटील. सुशिक्षित वर्ग पर्यावरणाच्या बाबतीत जागरूक झाला आहे. त्यामुळे जंगले व वन्यजीव हा ग्लॅमरस विषय बनला आहे. अभ्यासक व फोटोग्राफर्स हेही त्या क्षेत्राकडे वळले आहेत. ती जागरूकता वनसंवर्धनासाठी खरोखरच उपयोगी ठरते आहे का? - एका अस्वस्थ वन्यजीव संशोधकाची कैफियत - (मासिक महानुभव मार्च २०१४)

द होल नेशन वॉण्ट्स टु नो

द होल नेशन वॉण्ट्स टु नो – जयदेव डोळे. टिव्ही वृत्तवाहिन्यांवर सध्या सुरू असलेले कार्यक्रम, वाद-परिसंवाद-चर्चा ह्या, काही अपवाद वगळता उठवळ व आचरट स्वरूपाच्या असतात. वाहिन्यांच्या हेतूबद्दल आणि नि:पक्षपाती पत्रकारितेबद्दल शंका घेण्यास वाव असतो. वृत्तवाहिन्यांची ‘अंदर की बात’ काय आहे त्याची झाडाझडती - (मासिक महानुभव मार्च २०१४)

सरकार आणि जनतेतील डिजिटल पूल

सरकार आणि जनतेतील डिजिटल पूल – आनंद अवधानी. ‘लालफित’शाहीमुळे साध्या साध्या कामांसाठी शासकीय कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. सर्वसामान्यांसाठी तो मन:स्तापच असतो. आंध्रप्रदेश सरकारने या प्रश्नावर तोडगा काढला आहे. त्यांनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या सहकार्याने ‘ए.पी. ऑनलाईन’ची मुहूर्तमेढ रोवली. या रोल मॉडेलची सरकारी कहाणी. - (मासिक महानुभव मार्च २०१४)

मिशन दामोदर कुंड

 विष्णूच्या शाळिग्राम अवताराचा संबंध असलेल्या नेपाळ मुक्तिनाथ यात्रेतील एक मिशन म्हणजे सुवर्णकड़े वा कंकण. ज्यात दिसते ते दामोदर कुंड! निसर्गरम्य हिमालयाच्या कुशीतील कुंडाबद्दल.

निसर्गसंवर्धनाचे नवे मॉडेल

 निसर्गाचा अभ्यास, त्याचा उपयोग प्रत्यक्ष जमिनीवर करणे व त्यासाठी त्याला व्यावसायिकतेची जोड देणे असे तिहेरी आव्हान केतकी घाटे व मानसी करंदीकर ह्या तरुणींनी स्वीकारून ‘ऑयकॉस’ ही संस्था स्थापन केली. छोट्या मोठ्या विकासप्रकल्पावर निसर्गाचा बळी जाऊ नये ह्या दृष्टीने पण त्या काम करतात. अशा वेगळ्या पर्यावरणवादी नवीन बिझनेस मॉडेल बद्दल.

प्रेमाचे कुलुप

 जर्मनीमध्ये कलोन शहराजवळ ‘होहेनझोलर्स’ हा ऐसपैस पूल आहे. ब्रिजला लागूनच असलेल्या जाळीच्या कंपाऊंडला हजारो कुलुपे लटकावलेली आढळतात. जगातील अनेक जोडपी कुलपावर आपली नावे व विवाहतारीख कोरून तेथे लावतात व चावी नदीत फेकतात. स्थळाची मजेदार व मनोरंजक सैर.  

जेव्हा नऊशे खिडक्या उघडतात!

 भाषा व बोली यांच्या जतनासाठी, लोकांच्या सहभागातून भाषांच्या सर्वेक्षणाचा व्यापक प्रकल्प डॉ. गणेशदेवी यांच्या पुढाकारातून ‘भाषा’ ह्या संस्थेतर्फे राबवण्यात येत आहे. ‘भाषा वसुधा परिषद’ बडोदरा येथे घेण्यात आली. तेव्हा जगातील नऊशे बोलीभाषांचे प्रतिनिधी उपस्थित होते. आगळ्यावेगळ्या परिषदेचा वृत्तांत.

त्यांनी आणलं भारतात बायोटेक्नॉलॉजीचं युग

 भारतात बायोटेक्नॉलॉजिकलचे युग कोणी सुरु केले? त्याचे उत्तर म्हणजे एका इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीयरनं ! वरदप्रसाद रेड्डी ह्या इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीयरने ‘हिपॅटिटस बी’वर स्वदेशी व स्वस्त लस बनवण्यासाठी जिवाचं रान करून, त्याचा पाठपुरावा करून परदेशी कंपन्याच्या नाकावर टिच्चून हे यश मिळवले. त्यांच्या कष्टप्रद यशाची कहाणी.

आभासी ह्या संस्थेचे पाश मायावी

 इंटरनेट गेमिंग हे नव्या पिढीच्या टाइमपासचे मुख्य साधन! हे खेळ म्हणजे आभासी जगच! खेळ ‘प्रत्यक्ष जगण्यावर’ कशी गदा आणतात ते त्या व्यक्तीला अनेकदा समजतच नाही. इटंरनेट गेमिंगच्या भूलभूलैयाची सैर करून त्यातून बाहेर आलेल्या लेखिकेने ‘मानगुटीवरच्या भूता’कडे तटस्थपणे बघून सांगितलेला अनुभव.

अतिप्रचंड अद्भुत गुहा

 लांबच लांब व आश्चर्यकारक प्रचंड गुहा ‘मॅमथ’ गुहा म्हणून प्रसिद्ध आहे. दर वर्षी दोन लाख पर्यटक तेथे जातात. प्रचंड गुहेची माहिती

कांचनजुंगाच्या कुशीतले सिक्किम

 निसर्गरम्य सिक्किम राज्याची सैर

‘मोतिमहल’ची कहाणी

 दिल्लीतील प्रसिद्ध ‘मोतिमहल’ ह्या हॉटेलात राजकारण, बॉलीवूडमधील भल्या भल्या लोकांची झुंबड उडालेली असते. नेहरु, शास्त्री, इंदिरा गांधी, फक्रुद्दीन अली अहमद, मौलाना आझाद, दिलीप कुमार, नर्गिसपासून परदेशातील राष्ट्राध्यक्षही ह्या ‘मोतिमहल’च्या खाद्यपदार्थांवर लुब्ध होते. फाळणीच्या वेळी पाकिस्तानातून दिल्लीत आलेल्या कुंदनलाल गुजराल यांच्या खाद्यउद्योगाची यशस्वी गाथा.

पक्षी जाय दिगंतरा

 परदेशात व्यापार करतांना अनेक कसरती करायला लागतात! मूळ मराठी महिलेने पतीसमवेत बॅंकॉक (थायलंड), इंडोनेशिया व चीन ह्या देशांत, तेथील भाषा शिकून, तेथील सर्वसामान्यांत मिळून-मिसळून एक्सपोर्ट व्यवसायात यश मिळवले, त्याची कहाणी.

उजाड माळावरी घेतले सोन्याचे पीक

 पुण्यातील महर्षी कर्वे स्त्री शिक्षणंसंस्थेचा अवाढव्य परिसर अठ्ठावीस एकरांवर पसरलेला आहे. परिसर सुंदर व रम्य असून सर्वत्र झाडे व वनस्पतींनी सजवलेला आहे. संस्थेचा फेरफटका.

संमोहक फूल – ऑर्किड

 ऑर्किड फूलाचे फूल सर्वात मोठे व प्रगत फुलधारी परिवारात मोडते. त्याच्या पंचवीस हजार प्रजाती असाव्यात व अजूनही नव्या प्रजातींचा शोध लागत आहे. ऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त ऑर्किड उष्णकटिबंधीय क्षेत्रात आढळतात. जगातील फुलझाडांमध्ये सर्वांगसुंदर, विविधपूर्ण जाती आणि आकर्षक रचना व रंग असणार्‍या अशा ह्या अनोख्या ऑर्किड फुलांबद्दल, फोटोसहीत माहिती.

समर्थांची टाकळी

 श्री रामदासाच्या वास्तव्याने पावन झालेल्या काही महत्त्वपूर्ण स्थळांचा विस्तृत परिचय.

दास डोंगरी राहतो

   विश्ववंद्य राष्ट्रगुरु म्हणून सुपरिचित असलेले समर्थ रामदासस्वामी हे शिवशाहीतील महत्त्वपूर्ण संतसत्पुरुष होते. केवळ धर्मप्रचारक म्हणूनच नाही तर धर्मविषयक मार्गदर्शनपर वैचारिक लिखाणाचे जनक म्हणूनही ते महाराष्ट्रास परिचित आहेत. त्यांच्या वास्तव्याने आणि सहवासाने ‘पुण्यभूमी’ अशी ख्याती मिळवलेल्या काही महत्त्वपूर्ण श्रीसमर्थस्थळांचा हा विस्तृत परिचय.

ह्या समर्थास समर्थ, किती म्हणौनि म्हणावे!

भारतात सध्या ‘आरईबीटी’चा बोलबाला आहे- अल्बर्ट एलिस ह्यांनी ह्या ‘आरईबीटी’मध्ये जे सांगितले आहे ते तर तब्बल चारशे वर्षांपूर्वी समर्थांनी सांगितले आहे. त्यासाठी वाचा हा लेख.

एक आगळा संत

पारंपारिक संप्रदायातील शिकवणुकीतून प्रस्थापित झालेल्या ‘निरिच्छ’ वादाला सर्वप्रथम छेद देणार्‍या समर्थांनी सांगितले की प्रपंच करण्यात काही कमीपणा नाही व तो चांगला झाला तर अनेकांना ईश्वर भेटल्याचे समाधान मिळते. ह्या आगळ्या संतवृत्तीबद्दल.

समर्थांची करुणाष्टके

श्री समर्थानी दासबोधात व मनाच्या श्लोकांत विशद केलेल्या ‘विदेही’ अवस्थेबद्दल.

संतवाड्मय व श्रीसमर्थ वाङमयांचे महत्व

अज्ञानाला ठोस प्रहार करत अंधश्रद्धेच्या बेड्या तोडणार्‍या व मानवाला डोळस बनवणार्‍या श्री समर्थांच्या वाङ्मयाची, मानवधर्माचा पुरस्कार करणारी शिकवण सांगणारा लेख.

पंचेचाळीस फूट लाटा व लॉबस्टर क्रुझ

कॅनडातील न्यू ब्रुन्स्विक नोव्हास्कोशिया प्रांतामध्ये असलेल्या ‘बे ऑफ फंडी’ येथे समुद्राच्या उंचच उंच लाटांचा थरार जवळून अनुभवता येतो. त्याशिवाय लॉबस्टर क्रूझ व टायटॅनिक म्युझियम म्हणजे सोनेपे सुहागा. बे ऑफ फंडी मधील दहा कोटी टन पाणी दिवसातून दोन वेळा आत-बाहेर जात-येत असते. तो अविस्मरणीय ‘अनुभव’

करताना पर्यटन

पर्यटन कोणत्याही प्रकारचे असो, ते करताना आनंद मिळायला पाहिजे. पण कधीकधी अतिउत्साहात वा अज्ञानामुळे आनंदावर पाणी पडते. अशा गोष्टी टाळण्यासाठी पर्यटनाला उपयुक्त शंभर टिप्स.

अनोखे वैभव

मध्यप्रदेशातील ओर्च्छा, आंध्रातील विशाखापट्टणम् व छत्तीसगडमधील बस्तर ह्या प्रदेशात केलेली भटकंती.

ऐतिहासिक वारसा

बिहारमधील नालंदा विद्यापीठ ही प्राचीन वास्तू. अनेक स्तूप, काही पुरातन गावे, मंदिरे ह्यांनी आसपासचा प्रदेश व्यापला आहे. ह्या ऐतिहासिक ठेव्याची ओळख.

दोन खंडांच्या संगमी

आशिया व युरोप या दोन खंडांना जोडणारा बॉस्फोरस ब्रिज इस्तंबूल येथे आहे. पूर्वी कॉन्स्टंटिनोपॉल ह्या नावाने प्रसिद्ध असलेल्या इस्तंबूलमध्ये अल्फावर्ल्ड सिटीची बांधणी होत आहे. ह्या शहराची मनोरंजक सैर.

कथा यशाची

पशुखाद्य विक्रेता ते मल्टिनॅशनल कंपनीचा ‘एशिया पॅसिफिक सीईओ’ अशी उत्तुंग झेप घेणारा मराठमोळा कॉर्पोरेट बॉस अशी सचिन अधिकारी यांची ओळख सांगता येईल. कामावरील निष्ठा व तत्त्वांशी बांधिलकी यांतही अधिकारी असलेल्या सचिनच्या यशाचे रहस्य.

मेणाची कला

केरळच्या सुनील कंडल्लूर यांनी मेणाच्या पुतळ्याची कला शिकून लोणावळा येथे तीस पुतळे व कन्याकुमारी येथे अठ्ठावीस पुतळे बनवलेले आहेत. मेणाचे पुतळे पूर्वी नव्वद किलोचे असत, पण सुनील कंडल्लूर यांनी बनवलेले पुतळे बारा ते पंधरा किलोचे आहेत. त्यांच्या छंदाविषयी...

कच्छ नही देखा तो कुछ नही देखा!

कच्छच्या भूमीमध्ये इतिहास आहे, विविध रंग व आकर्षक ग्रामीण संस्कृती आहे. ‘रण फेस्टिव्हल’ आयोजल्यामुळे देशी व परदेशी पर्यटकांना झालेली कच्छची रंगीबेरंगी ओळख.

राष्ट्रपतींचे बाशिंदे

आकर्षक वेशभूषेतील राष्ट्रपतींच्या अंगरक्षकांची तुकडी भारतीय लष्कराच्या सर्वांत जुन्या दलांपैकी एक आहे. ते दल प्रतिष्ठित गणले जाते. त्या दलाची ओळख.

एक ‘पर्सिस्टंट’ धडाडी

अलिकडच्या भारतीय तरुणांना ‘ग्लोबल व्हिजन’ मिळाले, ते इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रामुळे! अनेक आयटी कंपन्यांची सुरूवात ज्या बुद्धिमान तरुणांनी केली. त्यांना जागतिक उद्योगाचे व बदलांचे भान होते. त्याला कष्ट, धडाडी व बुद्धिमत्ता यांची जोड देऊन त्यांनी व्यवसाय भरभराटीस आणला. मध्यमवर्गातून आलेल्या आनंद देशपांडे यांच्या ‘पर्सिस्टंट’ कंपनीची कहाणी वाचण्यासारखी आहे. सहा हजारांवर कर्मचारीसंख्या असणार्‍या त्यांच्या कंपनीच्या जोरदार वाटचालीची कथा.

‘हरियाली’ची हरितवाट

मुंबई–ठाणे परिसरात पर्यावरणविषयक जागृतीच्या क्षेत्रात ‘हरियाली’ हे नाव प्रसिद्ध आहे. ही संस्था गेली पंधरा वर्षे विविध मार्गांनी बियावाटपाचे, वृक्षलागवडीचे व संवर्धनाचे काम करत आहे. त्याचबरोबर आम नागरिकांत पर्यावरणविषयक भान तयार व्हावे यासाठी विविध तर्‍हेचे कार्यक्रम योजत आहे. त्यापाठीमागे पुनम सिंघवी यांच्यासारखा तळमळीचा व जनमानसात स्थान असलेला कार्यकर्ता आहे आणि त्यामुळे ‘हरियाली’ ही संस्था न राहता चळवळ बनली आहे.

मातृपूजन विश्वभजन-देशोदेशीच्या लक्ष्मी

जगातील सर्व देशांत समृद्धीची देवता व देव, या दोघांचीही पूजा केली जाते. जगातील इतर देशांमध्येही शेतकरी घरात पीक आल्याचा आनंद साजरा करतो, तो व्यक्त करण्याच्या तर्‍हाही त्या त्या देशात वेगवेगळ्या आहेत. त्यांपैकी काही मातृदेवतांचा परिचय.

देवदासींच्या वेदना माझ्या संवेदना

देवदासींना अंधश्रध्देच्या जोखडातून व वेश्यांना देहविक्रीच्या व्यवसायातून मुक्त करण्याचे कार्य गेली तीस वर्षे साधना झाडबुके करत आहेत. महिला व दुर्बल घटकांसाठी शासनाच्या योजनांचा लाभ त्या ह्या कार्यासाठी घेत आहेत. त्यांच्या कार्याबद्दल.

अशक्य तेच केले शक्य

आधुनिक तंत्रज्ञान, पारदर्शी व्यवस्थापन आणि जागतिक बाजारपेठेची अचूक-अद्यावत माहिती, ही आहे कोणत्याही उद्योग–व्यवसायात यश मिळवून देणारी त्रिसूत्री! ती वापरून भैरवनाथ ठोंबरे यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील रांजणी गावाच्या माळरानावर ‘नॅचरल शुगर अॅण्ड अलाईड इंडस्ट्री (एन् – साई)’ हा साखरकारखाना उभारला आणि त्याच्या अनुषंगाने ऊसाच्या चिपाडापासून व शेतातील काडीकचर्‍यापासून वीजनिर्मिती, मिश्र पोलादनिर्मिती या प्रकल्पांची जोड देत त्या परिसरातील एकशेपंचेचाळीस गावांचा अक्षरश: कायापालट करून दाखवला. त्यांच्या अफाट कार्याबद्दल.

बहादूरपूरचे नाव गोधडीने केले सार्थ

मॅगसेसे अॅवार्ड सन्मानित नीलिमा मिश्रा यांनी बहादूरपूर या जळगाव जिल्ह्यातल्या गावात बायाबापड्यांना रोजगार मिळवून दिला. त्यातून तिथे तयार होणार्‍या गोधडीला देशी व विदेशी बाजारपेठ मिळाली. ही सारी ‘अदभुत’ कहाणी.

वाईचा सांस्कृतिक चेहरामोहरा

‘वाई : कला आणि संस्कृती’ हे पुस्तक म्हणजे वाईचा ऐतिहासिक कला-संस्कृतीचा वारसा जतन करण्याच्या ‘आस्था’ या पर्यावरण मैत्री संघटनेच्या प्रयत्नांचे फलित आहे. सामाजिक-सांस्कृतिक वैशिष्टय़ांसह लिहिलेला हा जणू वाईचा स्थानिक इतिहास आहे. वाई या सांस्कृतिक शहराचे अस्सल रूप दाखविणारा आरसा म्हणजे ‘वाई’ हे पुस्तक होय.