प्रभाकर भिडे


संपर्क : bhideprabhakar@gmail.com9892563154

प्रभाकर भिडे हे डोंबिवलीचे. भिडे यांनी पदवी मिळवून पत्रकारिताचा कोर्स पूर्ण केला. प्रभाकर भिडे यांना वाचनाची आवड आहे ते ग्रंथाली वाचक चळवळीमध्ये सक्रिय (विश्वस्त) होते. तसेच भिडे यांनी वृत्तपत्र व मासिकांमध्ये विविध विषयांवर लेखन केले आहेत.


रॉबी डिसिल्वा नावाच्या अवलीयाचा कलाप्रवास

(2 प्रतिक्रीया) ‘रॉबी डिसिल्वा हे पहिले मराठी/भारतीय ग्राफिक आर्टिस्ट, की ज्यांना युरोपीयन डिझायनरच्या बरोबरीने सन्मानाने वागवले गेले! रॉबी यांनी ग्राफिक डिझाईन क्षेत्रात जागतिक दर्जा व कौशल्य सिद्ध केल्यानेच त्यांना इटालीच्या मिलान शहरातील प्रसिद्ध ‘स्टुडिओ बोजेरी’ ह्या ठिकाणी सन्मानाने बोलावले गेले. तसेच, लंडनच्या ‘जे. वॉल्टर थॉम्पसन’ जाहिरात संस्थेत ज्येष्ठ कला दिग्दर्शक ह्या त्या काळातील अत्यंत दुर्मीळ पदाने सन्मानित केले गेले. रॉबी हे एकमेव भारतीय डिझायनर, की ज्यांना इंग्लंडच्या राजघराण्याकडून F.C.S.D. पदवीने सन्मानित केले गेले. फॅशन डिझाईनच्या नवनवीन वाटा पॅरिसला सुरु होतात हा समज असलेल्या काळात रॉबी डिसिल्वा व इतर काही युरोपीय प्रतिभावंत यांनी तो मान काही काळ लंडन व मिलान (इटली) येथे खेचून आणला! रॉबी यांचा जन्म मुंबईजवळ वसईचा. त्यांची युरोपातील प्रतिभाशाली पंधरा-वीस वर्षांची कारकीर्द वगळली तर त्यांचे सारे आयुष्य वसई-मुंबईत गेले. त्यांनी आई-वडिलांची व कुटुंबाची काळजी वाहिली. ते स्वत:च वृद्धावस्थेत वसईला राहतात.

अरुण दाते व त्यांचे गायन

(2 प्रतिक्रीया) काही कलाकार सोन्याचा चमचा तोंडात धरून जन्माला येतात, त्यांना अनेक संधी सहज उपलब्ध होतात. ज्येष्ठ भावगीत आणि गझल गायक अरुण दाते हे त्याचे उत्तम उदाहरण. त्यांचे वडील म्हणजे इंदूरचे प्रसिद्ध रामुभैया दाते. ते स्वत: गायक व दर्दी रसिक, ते संस्थानामध्ये सेक्रेटरी दर्ज्याचे अधिकारी होते, त्यामुळे घर प्रशस्त, स्वभाव दिलदार, खानदानी रईस!   

गाणारे घर!

(2 प्रतिक्रीया) विश्वास पाटणकरांच्या आजोबांना गाण्याचा छंद जडला आणि गाण्याच्‍या सूरांनी घरातील प्रत्येकाच्या मनात रूंजी घालण्‍यास सुरूवात केली. संगीताचा हा झरा पाटणकरांच्‍या पाचव्‍या पिढीपर्यंत येऊन पोचला आहे. प्रभाकर भिडे आपल्‍याला या गाणा-या घराची ओळख करून देत आहेत.

नीलेश बागवे - सुंदर हस्ताक्षर अर्थात सुंदर जगणं!

(9 प्रतिक्रीया) सुंदर अक्षर म्‍हणजे आनंदी मन... आनंदी मन म्‍हणजे सकारात्‍मक विचार सकारात्‍मक विचार म्‍हणजे आकर्षक व्‍यक्तिमत्‍त्‍व... आकर्षक व्‍यक्तिमत्‍त्‍व म्‍हणजे सुसंस्‍कृत वर्तन सुसंस्कृत वर्तन म्‍हणजे आदर्श नागरिक... आदर्श नागरिक म्‍हणजे प्रगत समाज प्रगत समाज म्‍हणजे सर्वोत्‍तम देश... सर्वोत्‍तम देश म्‍हणजे सुंदर जग आणि सुंदर जग म्‍हणजे सुंदर जगणं.... हा विचार प्रत्‍यक्षात आणण्यासाठी चित्रकार नीलेश बागवे गेल्‍या आठ वर्षांपासून सुंदर हस्ताक्षर सराव वर्ग तसेच सुलेखन कार्यशाळेच्‍या माध्‍यमातून कार्यरत आहेत.

दधीची देहदान मंडळ

(1 प्रतिक्रीया) कल्‍पवृक्षाप्रमाणे माणसाच्‍या मृत्‍यूनंतर त्‍याच्‍या शरिराच्‍या अनेक अवयवांचा वापर इतरांची आयुष्‍ये सुखी करण्‍यासाठी होउ शकतो. या उद्देशातून गुरूदास तांबे यांनी मरणोत्‍तर देहदानाचा प्रचार करणा-या ग. म. सोहनी यांच्‍या प्रेरणेतून 1987 साली ‘दधीची देहदान मंडळाची’ची स्‍थापना केली. तांबे यांनी चर्चा-बैठकांमधून हा विषय अनेकांपर्यंत नेला आणि त्‍यास चांगला प्रतिसाद मिळू लागला. आतापर्यंत मंडळाचे सोळाशेपेक्षा जास्‍त सभासद असून साडेतीनशेहून अधिक व्यक्तींचे देहदान विविध वैद्यकीय महाविद्यालयातून केले गेले आहे.

वसा सैनिकांच्या कल्याणाचा आणि देशाच्या संरक्षणसिद्धतेचा!

अनुराधा गोरे यांचा मुलगा विनायक यास अतिरेक्यांशी लढताना काश्मिरमध्ये २६ सप्टेंबर १९९५ला वीरगती प्राप्‍त झाली. पुढे गोरे यांनी त्‍या विषयात वाचन केले, पुस्तके-लेख गोळा केले आणि देशसंरक्षणासाठी तरुणांनी सैन्यात भरती व्हावे या प्रचारासाठी भाषणे सुरू केली. त्यांनी ‘वॉर विडोज’ना बोलते केले. त्यातून ‘वारस होऊ अभिमन्यूचे’ हे पुस्‍तक लिहीले गेले. एखादी गृहिणी मुलाच्या देशासाठीच्या बलिदानातून स्फूर्ती घेऊन किती विविध प्रकारची सकारात्मक कामे करू शकते याचे हे आदर्श उदाहरण आहे.

डॉ. लहाने यांची जीवनदृष्टी

‘महाराष्ट्राच्या आयडॉल्स’मध्ये डॉ. तात्यासाहेब लहाने यांचा समावेश होतो. त्यांचे डोंबिवलीत भाषण झाले, त्यामुळे प्रभावित झालेले प्रभाकर भिडे यांनी व्यक्त केलेल्या भावना...