नारायण पराडकर


संपर्क : nrparadkar9@gmail.com9272677916

नारायण पराडकर हे कोकणातील रोहा गावचे राहणारे. ते 'रोहा टाइम्स' साप्‍ताहिकाचे सहसंपादक आहेत.  त्‍यांनी पाचशे कविता लिहिल्या आहेत. त्यांचा 'कृपा आशीर्वाद' या नावाचा कविता संग्रह प्रसिद्ध आहे. त्यांनी साईबाबांवर अनेक गीते लिहिली आहे. त्यांना 'संख्याशास्त्र पुरस्कारा'ने गौरवण्‍यात आले आहे. पराडकर भाजीपाल्याची शेती करतात. त्यांची स्वत:ची नारळाची वाडी आहे.


उद्योजक गौरी चितळे : क्षमता आणि जिद्द यांचा समन्वय

(2 प्रतिक्रीया) गौरी चितळे या रायगड जिल्‍ह्याच्‍या मेढे गावच्‍या राहणा-या. त्‍यांचे शिक्षण कमी. मात्र मेहनत करण्‍याची क्षमता मोठी. त्‍या गुणाला जिद्दीची जोड मिळाली आहे. म्‍हणूनच त्‍या मेढ्यासारख्‍या लहानशा गावातूनही उद्योजिका म्‍हणून नावारुपाला येत आहेत. गौरी यांनी लग्‍नानंतर घरच्‍या परिस्थितीला आधार म्‍हणून कुक्कुटपालन (पोल्ट्री) करण्‍याचा निर्णय घेतला. त्‍यास घरच्‍यांचीही साथ मिळाली. तो उद्योग उभारण्‍याकरता त्‍यांना जमीन तयार करण्‍यापासून सर्व कामे स्वतः करावी लागली. त्‍यांनी त्‍यांचे पती किशोर आणि एक गडी यांच्‍या साथीने दगडही फोडले. किशोर नोकरीवर जात असल्‍याने उद्योग निर्मितीची आणि चालवण्‍याची जबाबदारी गौरी यांच्‍यावर आली. त्‍यांनी ती सक्षमपणे सांभाळली. त्‍यांनी पोल्‍ट्रीशेजारी तळे खोदून मत्स्यपालनाचा व्‍यवसाय सुरू केला. त्‍यांची ती धडपड परिसरातील स्त्रियांसाठी आदर्शवत ठरली.

ताठरे कुटुंब - छांदिष्टांचा मळा

(2 प्रतिक्रीया)      रायगडातील ताठरे कुटुंबाचा प्रत्‍येक सदस्‍य कोणता ना कोणता कला-छंद जोपासतो. कुणी करवंट्यांपासून वस्‍तू तयार करतो, तर कुणी चित्र-रांगोळ्या काढतो. कुणी वास्‍तूरचनाकार आहे, तर कुणी नर्तक! अंगी ना ना कळा असलेल्‍या त्‍या परिवाराची ओळख करून देत आहेत नारायण पराडकर..

कडव्या वालाची कथा आणि पोपटी

(2 प्रतिक्रीया) नागोठण्याचा कडवा वाल हा उत्तर कोकणच्‍या वैशिष्‍ट्यांपैकी एक खोपोलीपासून पुढे घाटावर व इतरत्र जो वाल होतो तो थोडा गोड असतो. उग्र किंवा तुरट नसतो. म्हणून नागोठणा–मेढ्याकडच्या वालास ‘कडवा वाल’ म्हटले जाते. त्‍या वालाची चव वैशिष्ट्यपूर्ण असते. कडव्‍या वालापासून विविध प्रकारचे खाद्यपदार्थ, भाज्‍या केल्‍या जातात. त्यांची पाककृतीही वेगळी असते. रायगड-पेण भागात या वालापासून केला जाणारा हुरड्यासारखा पोपटी हा प्रकार विशेष प्रसिध्द आहे. 

प्रितालीची दौ़ड सायकलवर!

(2 प्रतिक्रीया)     प्रितालीची शाळेत जाण्‍यासाठीची सायकलची गरज आधी छंदात आणि मग ध्‍येयात रूपांतरीत झाली. तिने परिश्रमांच्‍या बळावर गावपातळीपासून राष्‍ट्रपातळीवर झेप घेत अनेक सन्‍मान मिळवले. या हि-याची पारख करून त्‍यास पैलू पाडणारे तिचे शाळेतील मार्गदर्शक प्रकाश पानसरे या यशाचे खरे शिल्‍पकार होय. पुण्‍याच्‍या शिवछत्रपती क्रीडा संकुलात अभ्‍यासासोबत सायकलिंगचा सराव करणारी प्रिताली देशाला आंतरराष्‍ट्रीय पातळीवर सन्‍मान मिळवून देण्‍याची मनिषा बाळगून आहे.

समृद्ध सुखद

(5 प्रतिक्रीया)    महाराष्ट्रातील एकशेआठ किल्ले पादाक्रांत करणारा, मुंबई-कन्याकुमारी-मुंबई अशी सायकल भ्रमंती करणारा, तरुणाईने इतिहासाचा मागोवा घ्यावा, इतिहासातून स्फूर्ती घ्यावी यासाठी रायगड जिल्ह्यात छायाचित्रांची प्रदर्शने भरवणारा व व्याख्याने करणारा सुखद राणे हा तरुण अक्षरश: स्वप्न जगतो. निसर्ग गिरिभ्रमण आणि सृष्‍टी फाउंडेशनसारख्‍या संस्‍थांची उभारणी करून त्‍याने या क्षेत्रातील संस्‍थात्‍मक कार्याची उणीव भरून काढण्‍याचा प्रयत्‍न केला आहे.