किरण क्षीरसागर


संपर्क : kiran2kshirsagar@gmail.com9029557767

किरण क्षीरसागर हे 'व्हिजन महाराष्‍ट्र फाउंडेशन'चे मुख्‍य कार्यकारी अधिकारी. ते 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम'चे सहाय्यक संपादक आहेत. त्‍यांनी ग्रॅज्‍युएशननंतर पत्रकारितेचे शिक्षण घेतले. त्‍यानंतर वृत्‍तसंस्‍था, दैनिक 'मुंबई चौफेर' आणि आकाशवाणी अशा ठिकाणी कामांचा अनुभव घेतल्‍यानंतर ते 2010 साली 'थिंक महाराष्‍ट्र'सोबत जोडले गेले. त्‍यांनी चित्रपट निर्मितीचे शिक्षण घेतले असून त्‍यांचा डिपार्टमेन्‍ट, अब तक छप्‍पन - 2, अॅटॅकस् ऑफ 26/11, क्विन, पोस्‍टर बॉईज अशा व्‍यावसायिक चित्रपटांच्‍या संकलन प्रक्रियेत सहभाग होता.


औट म्हणजे साडेतीन

‘औट घटकेचं राज्य’ किंवा ‘औट घटकेचा राजा’ असे शब्दप्रयोग मराठीत आहेत. त्याचा अर्थ अल्प काळाचे राज्य आणि अल्प काळाचा राजा असा होतो. एक घटका म्हणजे चोवीस मिनिटे. औट घटका किंवा साडेतीन घटका म्हणजे चौऱ्याऐंशी मिनिटे. त्यामुळे एखादे सरकार वर्षा-दीड वर्षांत पडले तर त्याचा उल्लेख औट घटकेचे राज्य असा केला जातो. अनेक पक्षांच्या कडबोळ्यातून आणि अपक्षांचा टेकू घेऊन उभी राहिलेली राज्य सरकारे आघाडीत बिघाड झाला किंवा अपक्षांचा टेकू सरकला की महिन्या-दोन महिन्यांत कोसळतात. त्यामुळे औट घटकेची सरकारे आणि त्यांचे औट घटकेचे सरदार खूप पाहण्यास मिळतात. माणसाच्या शरीराचा उल्लेख ‘औट हाताचा देह’ असा काही वेळा केला जातो. अंगुळ, वीत, हात ही माणसाची प्राचीन काळापासूनची परिमाणे आहेत. बोटांमधील रुंदी म्हणजे अंगुळ, ताणलेला अंगठा व करंगळी यांच्या टोकांतील अंतर म्हणजे एक वीत, तर कोपरापासून मधल्या बोटाच्या टोकाइतके अंतर म्हणजे एक हात. माणसाची उंची त्याच्या साडेतीन हाताइतकी म्हणजे औट हात असते.

मराठीच्‍या नावाने 'टाहो'ची गरज नाही

'मराठी भाषा दिन' जवळ आला, की मराठी भाषेच्‍या नावाने उदोउदो करणं किंवा गळे काढणं सुरू होतं. त्‍यानिमित्‍तानं इंग्रजीचं मराठी भाषेवर होणारं आक्रमण, मराठीला समाजमानसात नसलेलं स्‍थान, मराठीचं खच्‍चीकरण, मराठी भाषेवरून होणारं राजकारण आणि मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्‍याचा प्रलंबित मुद्दा अशा अनेक 'महत्‍त्‍वाच्‍या' गोष्‍टींवर चर्चा होते. त्‍यात मराठी भाषेची चिंताजन‍क परिस्थिती, म्‍हणजे एकूणच 'रड' जास्‍त असते. खरंच परिस्थिती एवढी वाईट आहे? मराठीवर इंग्रजी भाषेचा वाढणारा प्रभाव अनेकांच्‍या मनात अस्‍वस्‍थता निर्माण करतो. रविवारच्‍या (२६ फेब्रुवारी २०१७) 'लोकसत्‍ते'ची लोकरंग ही पुरवणी पाहा. सई परांजपे यांनी 'टोहो' या मथळ्याखाली लिहिलेल्‍या लेखात इंग्रजीचं मराठीवर आक्रमण होत असल्‍याचा सूर आळवला आहे. (त्‍या लेखाचं उदाहरण यासाठी देत आहे, कारण त्‍यातले विचार हे प्रातिधिक आहेत.) मराठीत इंग्रजीची चलती कशी, चित्रपटांची नावं इंग्रजीतून कशी, बोलता-लिहिताना आंग्‍ल शब्दांचा भडीमार कसा होतो याबाबतचं नको तेवढ्या विस्‍ताराने लिहिलं आहे. पण परांजपे त्‍यावर उपाय सांगत नाही. कारण तो कुणाकडेच नाही. (कल्‍पना असतील हो, पण अंमलबजावणी?)

विवेक सबनीस - जुन्या पुण्याच्या शोधात

(2 प्रतिक्रीया) 'स्मरणरम्य पुणे' किंवा 'पुणे नॉस्टॅल्जिया' हे कॅलेंडर मराठी आणि इंग्रजी अशा दोन भाषांत तयार केले गेले आहे. पुणे शहर काळाच्या ओघात बदलत गेले. ते कॅलेंडर जुन्या काळच्या आठवणी जागवण्याचे काम करते. त्यावेळी पुणे शहर बकाल नव्हते, तेथे रहदारी नव्हती, स्वच्छता आणि शांतता नांदत होती. विवेक सबनीस यांची ती निर्मिती. सबनीस म्हणतात, की “पुस्तकांपेक्षा कॅलेंडर सर्वसामान्य माणसांपर्यंत चांगल्या रीतीने पोचते. ते भिंतीवर सतत डोळ्यांपुढे राहते.” सबनीसांचे कॅलेंडर म्हणजे केवळ जुने फोटो नव्हेत तर ते जुन्या पुण्याची भेट शब्दांमधूनही घडवून देते. सबनीस यांनी 'ते क्षण त्या आठवणी' या सदरातून दुर्मीळ छायाचित्रांच्या सोबतीने पुण्याची रंजक, मजेदार माहिती मांडली आहे.

ज्ञानेश्वर बोडके - अभिनव प्रयोगशील शेतकरी

(7 प्रतिक्रीया) भारतीय समाज शेतीकडे ‘डबघाईला आलेला व्यवसाय’ म्हणून पाहत असताना ज्ञानेश्वर बोडके यांनी शेतकऱ्यांना शेतीतून प्रत्येकी लक्षावधींचे उत्पन्न मिळवण्याची ‘सिस्टिम’ शोधून काढली आहे! ती यशस्वीपणे राबवली जात आहे. त्यांच्या प्रयत्नाचा परिणाम असा, की त्यांच्याशी जोडले गेलेले महाराष्ट्रातील आणि देशभरातील पंचेचाळीस हजार शेतकरी गेल्या सतरा वर्षांच्या काळात सुस्थित झाले आहेत. सर्वांच्या गाड्या आहेत, सर्वांचे परदेश दौरे झाले आहेत.

श्रीराम जोग - बहुरंगी नाट्यकलावंत

(1 प्रतिक्रीया) श्रीराम जोग हे इंदूर येथील नाट्यकलावंत. वय वर्षे छप्पन. त्यांना अभिनयाची उत्तम जाण आहे. त्यांच्या कलात्मक व्यक्तिमत्त्वाला नाट्यदिग्दर्शन आणि कलादिग्दर्शन असे इतरही पैलू आहेत. ते गेल्या छत्तीस वर्षांपासून इंदूर येथे ‘नाट्यभारती इंदूर’ या संस्थेशी संलग्न राहून काम करत आहेत.

नेहा बोसची ओढ कलेची!

राधिक वेलणकरबाबत ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’वर लिहिलेल्‍या लेखाला चांगला प्रतिसाद मिळाला. 'जय महाराष्‍ट्र न्‍यूज'चे कार्यकारी संपादक प्रसन्‍न जोशी यांनी तो लेख आवडल्‍याचे जातीने कळवले. ते लिखाण करण्‍यामागील हेतू नवी पिढी परंपरागत जीवनचाकोरी सोडून आयुष्‍याच्या नवनव्‍या वाटा धुंडाळण्याचा प्रयत्‍न करत आहे हे अधोरेखित करणे हा होता. योगायोगाने राधिकाचा लेख प्रसिद्ध झाला त्याच दिवशी तशाच आणखी एका मुलीशी माझी भेट घडून आली.

राधिका वेलणकर स्वतःच्या शोधात

राधिका वेलणकर ही बायोमेडिकल डिझाइन इंजिनीयर. ती अॅम्प्लिट्यूड ऑर्थो या कंपनीत दोन वर्षे काम करत होती. राधिका नोकरी करताना माहितीपट किंवा इतर कार्यक्रम यांना आवाज पुरवण्याचेही काम करत असे. त्यातून तिला कलात्मक आनंद लाभे. मात्र तिला त्या आनंदाला नोकरीच्या बंधनामुळे मोकळेपणाने सामोरे जाता येत नव्हते. तिला तिचा ‘आवाज’ अस्वस्थ करत होता. ती नोकरी आणि इतर अॅक्टिव्हीटी यांमध्ये गुंतलेली असली तरी तिला स्वतःचे ध्येय गवसल्याची भावना झाली नाही. म्हणून तिने नोकरीचा राजिनामा दिला!

रवी गावंडे - अवलिया ग्रामसेवक

(1 प्रतिक्रीया) रवी गावंडे हा माणूस अफलातून आहे. ते रूढार्थाने ग्रामसेवक नाहीत. मात्र त्यांनी स्वीकारलेली जबाबदारी तीच आहे. ते यवतमाळ जिल्ह्याच्‍या नेर तालुक्‍यातील त्यांच्या पाथ्रड गावात शेती आणि पाणी व्यवस्थापन यांच्या संदर्भात 'आदर्श ग्रामविकास' योजनेअंतर्गत 2012 सालापासून काम करत आहेत. ते काम जेवढे विशेष वाटते, तेवढाच रवी गावंडे यांचा जीवनप्रवास सुद्धा!

नाशिक जिल्हा संस्कृतिवेध - वेध सिन्नर आणि निफाडचा!

(3 प्रतिक्रीया) 'थिंक महाराष्ट्र डॉट काम'वर सादर केल्या जाणा-या माहितीमध्ये समाजातील सकारात्मकता आणि विधायक घडामोडी यांचा विचार आणि शोध अंतर्भूत आहे. 'थिंक महाराष्ट्रा'ने समाजातील सकारात्मकतेचा आणि चांगुलपणाचा वेध घेण्याच्या उद्देशाने जिल्हावार मोहिमा सुरू केल्या. त्यातून 'नाशिक जिल्हा‍ संस्कृतिवेध' ही मोहिम राबवण्‍यात आली. त्या मोहिमेत गावोगावी भटकणा-या 'थिंक महाराष्ट्र'च्या कार्यकर्त्यांना तेथे घडलेले समाजाचे दर्शन उत्साहवर्धक आणि चकित करणारे होते. 'नाशिक जिल्हा संस्कृतिवेध' मोहिमेच्या पहिल्या टप्‍प्‍यात 3 फेब्रुवारी 2016 ते 6 फेब्रुवारी 2016 या चार दिवसांत सिन्नर आणि निफाड या दोन तालुक्यांचे माहिती संकलन करण्यात आले. 'थिंक महाराष्ट्र'च्या एकूण सोळा कार्यकर्त्यांनी तेथील गावखेड्यांतून स्‍थानिक कर्तबगारीची आणि समाजाभिमुख उपक्रमांची नोंद केली. त्‍यानुसार मोहिमेच्‍या आदल्‍या रात्री कार्यकर्त्‍यांच्‍या दोन टिम नियोजित स्‍थळी पोचल्‍या. दुस-या दिवशी, 3 फेब्रुवारी 2016 रोजी सकाळी सिन्नर आणि निफाड या दोन्ही ठिकाणी एकाचवेळी कामाला सुरूवात झाली. महेश खरे आणि मकरंद कर्णिक सिन्नर आणि निफाड येथील कार्यकर्त्यांच्या टिमचे नेतृत्व करत होते.

कारिट - नरकासूराचे प्रतिक

(2 प्रतिक्रीया) कारिट हे भारतात सर्वत्र आढळणारे रानवेलीचे फळ आहे. या फळास कारिंटे, कार्टे, चिरट, चिरटे, कोर्टी, चिर्डी, चिड्डी अशी अनेक नावे आहेत. खेडेगावात या फळाला चिभडं, शेरनी किंवा कर्टुलं या नावाने ओळखतात. कारिटाची चव कडवट असते. दिवाळीत नरक चतुर्दशीच्‍या पहाटे अभ्‍यंगस्‍नानापूर्वी ते फळ फोडण्‍याची परंपरा आहे. ते फळ नरकासूर या राक्षसाचे प्रतिक मानले जाते. नरक चतुर्दशीच्‍या दिवशी भगवान कृष्‍णाने नरकासूर राक्षसाचा वध केला. म्हणून या दिवशी पहाटे लवकर उठून अभ्‍यंगस्‍नानाच्‍या पूर्वी घराबाहेर किंवा तुळशी वृदांवनाजवळ डाव्‍या पायाच्‍या अंगठ्याने कारिट ठेचले जाते. त्यातून बाहेर पडणारा रस हे नरकासुराच्‍या रक्‍ताचे रुपक आहे. कारिट फोडल्‍यानंतर त्याचा रस जिभेला तर त्‍याची बी कपाळाला लावण्‍याची पद्धत आहे.

माळवद

(2 प्रतिक्रीया) महाराष्‍ट्रात माळवद या नावाने ओळखली जाणारी घरातील वातावरण नियंत्रीत ठेवण्‍याची पारंपरिक पद्धत होती. माळवद या शब्‍दाचा अर्थ घराचे छप्‍पर, गच्‍ची अथवा टेरेस असा विविधांगांनी समजून घेता येतो. वर्तमानात एकमजली घरांना छप्‍पर म्‍हणून सिमेंट-लोखंडाचे पत्रे वापरले जातात. पूर्वीच्‍या काळी घराला छपराच्‍या जागी मोठमोठे लाकडी ओंडके टाकले जात असत. त्‍यावर सागाच्‍या लाकडाच्‍या पट्ट्या लावल्‍या जात. लाकडाचे ओंडके आणि सागाच्‍या पट्ट्या यांची एकसंघ आणि अनेक स्‍तरांची रचना केली जाई. त्‍यानंतर त्‍यावर भरपूर पांढरी माती मोठा दाब देऊन टाकली जाई. या प्रकारच्‍या छपरांना माळवद असे म्‍हणत. माळवद तयार करण्‍यामागे घरातील वातावरण नियंत्रीत राहावे हा उद्देश असे. माती आणि लाकूड, दोन्‍ही घटक उष्‍णतोरोधक असल्‍याकारणाने उष्‍णतेस अटकाव होई आणि माळवद असलेल्‍या घरातील वातावरण नियंत्रीत राही. त्‍यामुळे माळवदाखालील घरामध्‍ये वातावरण उन्‍हाळ्यात थंडगार तर हिवाळ्यात उबदार राहत असे.

नगारा

नगारा हा शब्‍द मूळ अरबी शब्द 'नकारा' पासून उदयास आला आहे. नगारा हे एकमुखी मोठे वाद्य आहे. हे जुन्या भेरी-दुंदुभी यांसारखे जुन्‍या काळचे युद्धवाद्य होते. एक मोठ्या अर्धगोलाकार धातूच्या (तांबे, पितळ वा लोखंड) भांड्यावर कातडे ताणून चढवले जाते. तोच नगारा! त्‍यास चौघडा असेही म्‍हणतात. हे वाद्य दोन काठ्यांनी वाजवतात. घोड्यावर बांधून वाजवण्याच्या लहान नगाऱ्यासारख्या दोन वाद्यांच्या जोडवाद्याला ‘डंका’ म्हणतात. लढाईत नगारा वाजवण्याची प्रथा बहुतांश संस्‍कृतींमध्‍ये आढळून येते. सैनिकांना हुरूप यावा किंवा लढाईत विजय मिळवल्यानंतर नगारा वाजवण्‍यात येई. सेनापतीचे निरनिराळे हुकूम सैन्यास समजण्यासाठी निरनिराळे आवाज काढून नगारा वाजवला जाई. शत्रूचा हल्ला होण्यापूर्वी सैनिकांना सावध करण्यासाठी, शत्रूवर हल्‍ला करायचा असल्‍यास किंवा शत्रूच्‍या दिशेने चालून जाण्‍यासाठी त्‍या-त्‍या संकेताप्रमाणे नगारा वाजवला जाई. युद्धप्रसंगी वाजवल्‍या जाणा-या तशा नगा-यास नौबत असे म्‍हणतात.

सोलापूर जिल्हा संस्कृतिवेधचे साफल्य

(1 प्रतिक्रीया) ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’च्या माहिती संकलनासाठी 10 डिसेंबर ते 21 डिसेंबर अशी बारा दिवसांची मोहीम संपवून ‘सोलापूर जिल्हा संस्कृतिवेध’ची टीम सोमवारी, 22 डिसेंबरला सकाळी मुंबईत परतली. त्याच सुमारास, गावोगावचे टीममधील भिडूदेखील त्यांच्या त्यांच्या गावी गेले. बारा दिवसांचा हा दौरा यशस्वी रीत्या संपला. तालुक्या तालुक्यातील माहिती संकलन बऱ्या प्रमाणात झाले आहे. ते अजून त्या त्या भिडूकडे आहे. त्याला पूर्णाकार देऊन, नंतर ते वेगवेगळ्या विभागात पोर्टलवर येत्या एप्रिलपासून प्रसिद्ध केले जाईल. त्याच बरोबर, त्यातील महत्त्वाचे लेख एकत्र करून साधारण पाच-सात महिन्यांत ग्रंथरूपाने प्रसिद्ध करण्याचा बेत आहे. ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ने ‘महाराष्ट्राचे संस्कृतिसंचित’ हा वर्ष-दीड वर्षांपूर्वी प्रकाशित केलेला ग्रंथ पाहण्या-वाचण्यात आला असेल तर जिल्ह्या जिल्ह्यातील असा ठेवा ग्रंथरूपाने उपलब्ध होण्याचे मोल कळू शकेल. टीममधील भिडूंकडील जमा माहितीमध्ये लेखी मजकुराबरोबरच ध्वनिचित्रफिती आणि छायाचित्रे चांगल्या प्रमाणात आहेत.

अंधांच्या वाचनासाठी कार्यरत

(2 प्रतिक्रीया) अंधांना अभ्यासाव्यतिरिक्त इतर साहित्य वाचायला मिळावे यासाठी धडपडणाऱ्या ठाण्याच्या सुखदा पंतबाळेकुंद्री, पुण्‍याचे उमेश जेरे आणि त्यांच्या तीनशेहून अधिक सहकाऱ्यांनी चौदा हजार पुस्तकांचा खजिना ब्रेलमध्ये रूपांतरित केला आहे.

टिक्केवाडीचे ग्रामदैवत – भुजाईदेवी

(3 प्रतिक्रीया) कोल्हापुरातील भुदरगड तालुक्यात दक्षिणेकडे टिक्केवाडी हे गाव आहे. सह्याद्रीच्या दोन डोंगरांमध्ये वसलेल्या टिक्केडवाडीची लोकसंख्या दोन-अडीच हजारांची. टिक्केवाडी गावाचे ग्रामदैवत म्हणजे भुजाईदेवी.

रुपवेध - जाणिवेतून नेणिवेपर्यंतचं नाट्य

(3 प्रतिक्रीया) डॉक्‍टर श्रीराम लागू यांनी रंगभूमीवर साकारलेल्‍या भूमिका - त्‍या रंगवताना त्‍या भूमिकांमागचा त्‍यांचा सर्वांगीण विचार, त्‍यांचं ‘नाटक’ या माध्‍यमाबद्दलचं व अभिनयाबद्दलचं चिंतन आणि त्‍यांनी पाहिलेला–घडवलेला मराठी रंगभूमीचा काळ...  अशा विविध विषयांना स्‍पर्शणा-या लेखनाचं संकलन म्‍हणजे ‘रूपवेध’ हे पुस्‍तक होय. या पुस्‍तकाचा विशेष असा, की यात डॉक्‍टर लागूंनी लिहिलेले काही लेख प्रथमच पुस्‍तकरुपात प्रकाशित होत आहेत. पुस्‍तकाच्‍या प्रस्‍तावनेत रामदास भटकळ लिहितात, की डॉक्‍टरांनी त्‍यांच्‍या रंगभूमीवरील  कामाचा ‘लमाण’ या पुस्‍तकातून आढावा घेतला. मात्र त्‍यानंतर त्‍यांनी त्‍यांचे चित्रपटसृष्‍टीतले अनुभव, त्‍यांचे सामाजिक आणि सांस्‍कृतिक विचार आणि त्यांची त्‍यांवरील वैयक्तिक निष्‍ठा यांविषयी लिहिणं आवश्‍यक होतं. त्‍यांना त्‍यांच्‍या वृत्‍ती आणि प्रकृती यांमुळे ते लेखन करणं शक्‍य नव्‍हतं. ती उणीव डॉक्‍टरांच्‍या मुलाखती आणि त्‍यांचे इतर लेख यांमधून दूर करण्‍याचा हा प्रयत्‍न आहे.’

पवनामाईची जलदिंडी

(5 प्रतिक्रीया) मावळ तालुक्‍यातील पवना नदीचे प्रदूषण रोखण्‍यासाठी व्‍यंकट भताने यांनी 'पवनामाई उत्‍सवा'ची सुरूवात केली. त्‍यास जोड मिळाली आहे, ती डॉ. विश्‍वास येवले यांच्‍या जलदिंडीची. स्‍वच्‍छ पाण्‍यासाठी सुरू असलेला ही चळवळ...

साडेसात लाख पाने तय्यार!

(1 प्रतिक्रीया) नाशिकचे दिनेश वैद्य यांचे नाव DIGITIZATION OF MANUSCREEPTS अर्थात जुन्‍या पोथ्‍यांच्‍या छायांकनासाठी ‘लिम्‍का बुक ऑफ वर्ल्‍ड रेकॉर्ड’मध्‍ये पुन्‍हा चौथ्यांदा नोंदवले गेले आहे. दिनेश पोथ्‍यांच्‍या चार लाख पानांचे स्‍कॅनिंग करून मोकळाही झाला आहे. स्वत:च्या खर्चाने एवढे मोठे सार्वजनिक काम केल्याचे उदाहरण जगात नाही. म्हणून त्याच्या नावावर हा विक्रम नोंदला गेला.

अभिवाचन – नवे माध्यम!

     समाज ज्‍या गोष्‍टी स्‍वीकारतो किंवा नाकारतो तो एकतर स्थित्‍यंतराचा भाग असतो किंवा समाजाची त्‍यावेळची गरज असते. महाराष्‍ट्रात जागोजागी होत असलेले अभिवाचनाचे वाढते प्रयोग काळाची गरज म्‍हणून होत आहेत का? समाजावर माध्‍यमांचा मारा होत असताना साहित्य वाचन आणि नाटक यांच्याशी नाते सांगणारे अभिवाचन हे नवे माध्‍यम भोवतालच्‍या गोंधळात समाजाला थोडा विसावा देण्‍यास हातभार लावू शकेल का? अभिवाचनासंबंधीची ही मालिका सादर करण्‍यामागे एकाच उद्देशाने प्रयत्‍नशील असलेल्‍या व्‍यक्‍तींचे नेटवर्क व्‍हावे ही इच्‍छा आहे. तसे घडल्‍यास अभिवाचनाबद्दलचे विचारमंथन आणि प्रयत्‍न परस्‍परांना उपयुक्‍त आणि पूरक ठरतील आणि त्‍या नेटवर्कचा फायदा या माध्‍यमाला आणि पर्यायाने समाजाला होऊ शकेल.

हळदीचे पेव - जमिनीखालचे कोठार!

(2 प्रतिक्रीया) सांगलीतील हरिपूरात हळद साठवली जाते ती जमिनीखालच्‍या पेवांमध्‍ये! जगभरात केवळ हरिपूर गावात आढळणा-या माण मातीच्‍या अंगभूत वैशिष्‍ट्यामुळे हळद साठवणुकीचा हा (कदाचित जगातील एकमेव) पर्याय वैशिष्‍ट्यपूर्ण ठरतो.

अभाव व्यंगचित्रांच्या साक्षरतेचा

   आपल्‍याकडे एकूण चित्रकलेची आणि व्‍यंगचित्रांची जाण कमी आहे. शंभर वर्षे होऊन गेली तरीही वाचक-प्रेक्षक चित्र जसेच्‍यातसे अपेक्षित करतात किंवा व्‍यंगचित्र ढोबळ असले तरी आनंद मानतात. जीवन गुंतागुंतीचे होत जाते तेव्‍हा कला अधिकाधिक सूक्ष्‍म होत जाते, हा साधा विचार त्‍यांना स्‍पर्श करतो असे वाटत नाही. त्‍यामुळे चित्रकला व त्‍याचा एक विभाग व्‍यंगचित्रकला याबद्दलची साक्षरता वाढली पाहिजे असे वाटते. ‘व्‍यंगचित्रे’ या विषयावरील तीन वेगवेगळ्या दृष्‍टीकोनातील लेखन ‘थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम’वर प्रसिद्ध करत आहोत. व्‍यंगचित्र कलेचा प्रवास, त्‍या कलेशी संबंधित असलेल्‍या व्‍यक्‍ती असे स्‍वरूप मांडत असताना नुकत्‍याच झालेल्‍या व्‍यंगचित्र वादावरील एक टिपण येथे उद्धृत करत आहोत.

मराठयांचा गाळीव इतिहास!

मराठे! क्षत्रिय कुलवंत, चातुर्वर्णातील क्षत्रिय वर्ण, उच्चकुलीन, बलवान, अटकेपार झेंडा नेणारे राज्यकर्ते, बहुजन समाजाचे रक्षण करण्यास पात्र... मराठा समाजाची यांसारखी अनेक वर्णने अनेक इतिहासकारांनी केली आहेत. बाबाजी विष्णुराव राणे यांनी ‘हो! आम्ही शहाण्णव कुळी मराठे’ या पुस्तकात तीच माहिती नव्याने देण्याचा प्रयत्न केला आहे.

फियोर्डलॅण्ड ,डोंगर, समुद्र व धबधबे

आताशा मनुष्याचे पाऊल पडले नाही, अशा जागा पृथ्वीवर फारशा शिल्लक नाहीत. फियोर्डलॅण्डमध्ये मात्र रांगड्या, नैसर्गिक आणि अजूनही माणसाचे पाऊल न पडलेल्या कितीतरी जागा असतील. अशा जागांची झलक इथल्या ट्रेकिंग रुट्सवरून चालताना येते. तीन-चार दिवसांचे ट्रेकस् इथलं जंगल, जागा, उंची, खोली, द-या, डोंगर, झरे, धबधबे आणि शांतता यांची खरीखुरी ओळख करून देतात....

अफलातून पुस्तकाचा समर्थ अनुवाद

 समाजशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी शिकागो विद्यापीठात दाखल झालेल्या सुधीर व्यंकटेश यांचा हा खराखुरा ‘कार्यानुभव’ वृतान्त आहे. शिकागोच्या समाजरचनेत सर्वात खालच्या स्तरावर असलेल्या काळ्या लोकांच्या अंतरंगात डोकावण्यासाठी सुधीर बनतो औटघटकेचा दादा अर्थात गँगलीडर (फॉर अ डे )! तो ‘कार्यानुभव’ त्याने या पुस्तकात मांडला आहे…

ग्रेट इंडियन पेनिनशुलर रेल्वे आणि व्हिक्टोरिया टर्मिनल

 पहिली रेल्वेगाडी बोरीबंदर येथून सुटली. ते  तेव्हा लाकडी स्थानक होतं. बोरिबंदरसमोरील परिसर धोबी घाट म्हणून ओळखला जायचा. धोबी घाट महालक्ष्मीला जाईपर्यंत तिथे कपडे धुण्याचं काम चालत असे. फ्रीअर मार्गाकडे जाणारा एक भाग फाशी तलाव किंवा गिबेट पाँड म्हणून प्रसिद्ध होता. तिथे 1800 सालापर्यंत खुन्यांना जाहीर फाशी देण्यात येई. तर कमी गंभीर गुन्हा करणा-या गुन्हेगारांवर नासकी अंडी, चपला, चिखल, विटांचा चुरा फेकण्यात येई. 1840 मध्ये या प्रकारची शिक्षा रद्द करण्यात आली. बोरिबंदर आणि व्हिक्टोरीया टर्मिनल परिसराच्‍या इतिहासास उजळणी देणारा हा लेख.

शब्दांचे जीवनचक्र

काळाच्‍या ओघात अनेक शब्‍दांचा वापर कमी होत जातो. दुर्लक्षित झालेले शब्‍द समाजमनातून पुसून जातात त्‍यांची जागा नवे शब्‍द घेतात. मात्र शब्‍द मेल्‍याचे दुःख त्‍याच अर्थाच्‍या दुस-या शब्‍दाच्‍या जन्‍माने भरून निघत नाही. असे कितीतरी शब्‍द आपल्‍यातून निघून गेले. काही निघून जाण्‍याच्‍या वाटेवर आहेत. रोजच्‍या वापरातून नाहीशा झालेल्‍या शब्‍दांची आठवण.

‘पुंडलिक’ची १०० वर्षे!

दादासाहेब तोरणे यांनी श्रीपाद नाटक मंडळीच्या ‘श्री पुंडलिक’ या नाटकाचे चित्रीकरण करून, त्याचे चित्रपटात रूपांतर घडवले. ‘पुंडलिक’ चित्रपट मुंबईच्या कॉरोनेशन थिएटरात १८ मे १९१२ रोजी झळकला. तोरणे यांनी ब्रिटिश कॅमेरामनच्या सहकार्याने आणि पुरेशा प्रकाशासाठी गिरगावातील रस्त्यांवर भरदुपारी सेट उभारून हा चित्रपट तडीस नेला. त्याच्या शताब्दीनिमित्त,  दादासाहेब तोरणे यांची जीवनकहाणी.

गणपतीचे काही अप्रसिद्ध पैलू

वेगवेगळी शास्त्रे गणपतीचे रूप वेगवेगळेच सांगतात. वैदिक ग्रंथांमध्ये आपल्याला विनायक, गणेश ही नावे आढळत नाहीत. उत्तर वैदिक काळात चार विनायकांचे वर्णन सापडते. एवढेच नाही तर गणपती हे दैवत गजवदन झाले ते नंतरच्या काळात.

गणेशमूर्तीचे सौंदर्यशास्त्र!

गणपतीच्या मूर्तींची मागणी वाढली तसे हाताने मूर्ती बनवण्याच्या कलेचे व्यवसायात रूपांतर झाले. मूर्ती हे औद्योगिक उत्पादन झाले. मूर्ती तयार करण्याच्या स्टुडिओचे कारखान्यात रूपांतर झाले. साचा तयार करून मूर्ती बनवली जाऊ लागली... मूर्तीचे सौंदर्यशास्त्र बदलत गेले.

किती किती रूपे तुझी...

गणेशोत्सवाशिवाय एरवीच्या जगण्यातही गणपती हे आराध्यदैवत असते. अष्टविनायकाला, सिद्धिविनायकाला उसळणारी गर्दी तेच सुचवते. अष्टविनायकांमधील प्रसिद्ध गणपती मंदिरांशिवायही अशी अनेक गणपती मंदिरे आहेत, जी फारशी परिचित नाहीत. कोकणातल्या अशा काही गणेशांची माहिती देत आहोत.

शोध रूपाकाराचा!

गणपतीच्या विविध फॉर्म्स मध्ये आपल्याला आकर्षून घेतो  तो दोन हातांचा गणपती. चित्रकार वासुदेव कामत यांनी साकारलेला हा गणपती सगळ्यांनाच आपलासा वाटतो, कारण तो अधिक मानवी आहे. त्याच्यात देवत्वाच्या पलीकडे जाणारा आपलेपणा आहे. कामतांच्या मनात तो कसा आकाराला आला?  मुळात कलाकार म्हणून त्यांचा गणपतीच्या फॉर्मशी परिचय कधी झाला?  नेमके काय वाटते त्यांना या फॉर्मबद्दल आणि पर्यायाने गणपतीबद्दल?

औषधी पत्रींना धार्मिक महत्त्व

गणपतीला आवडणार्‍या एकवीस पत्रींचा बारकाईने विचार केला तर लक्षात येते, की पत्री म्हणजे वेगवेगळ्या आजारांवरची गुणाकारी औषधे आहेत. औषधी वनस्पतींचा आपल्याला परिचय व्हावा, आपण त्यांचा जपून वापर करावा यासाठी त्यांना धार्मिक महत्त्व दिले. गणपतीला आवडणार्‍या पत्रींचा जीवशास्त्रीय परिचय-

गणपती नावाचे दैवत

आपल्या पुराणकथा भन्नाट आहेत. त्यांची कल्पनेची भरारी गरुडापेक्षाही मोठी असते. त्यामुळे गणपतीबद्दल पुराणकथांमधून जे काही वाचायला मिळते ते अद्भुत असेच आहे.

बाप्पा असेही...

गणेशोत्सवाच्या आधी काही दिवस स्टॉलवर जायचं, आपली मूर्ती नोंदवायची आणि गणेशोत्सवाच्या दिवशी जाऊन ती घेऊन यायची ही आपली पद्धत. पण अजूनही कित्येक गावांमध्ये खरीखुरी इको फ्रेंडली मूर्ती असते...

आमची गाणपत्य परंपरा

आमचे कुलदैवत गणपती आणि कुलस्वामिनी कोल्हापूरची अंबाबाई. या उपासनेमुळे आम्ही स्वत:ला गाणपत्य म्हणवतो. गणपतीचा आगमाधिष्ठित असा संप्रदाय दक्षिणेत आहे; कदाचित काळाच्या ओघात तशी उपासना खंडित झाली असली तरी पार्थिव पूजेच्या रूपाने ‘रिद्धिसिद्धीसहित वरद पार्थिव गणेशा’चे आम्ही उपासक आहोत आणि त्या अर्थाने गाणपत्य आहोत.

बाप्पा येता घरा

बाप्पांना घरी आणण्याचे वेध लागलेले असतात. मूर्तीची नोंदणी आधीच करून ठेवलेली असते. निवडलेल्या मूर्तीबद्दल मनात जिव्हाळा निर्माण झालेला असतो. ग्राहकाची अशी अवस्था तर मूर्ती घडवणार्‍या कलाकारांचे काय होत असेल? त्यांच्या घरची मूर्ती ते कशी तयार करत असतील..

मावळातला तिकोना!

पवनेच्या मावळातला तिकोना फारसा इतिहास सांगत नाही. पण त्याचा सहवास आपल्याला शिवकाळाची आठवण करून देतो. त्याची बांधणी, त्याचे बुरूज, दरवाजे महाराजांच्या किल्यांचा अभेद्यपणा सांगतात आणि पावसाळ्यात आपण निसर्गाची ‘रंगपंचमी’ तिकोण्यावरून पाहू शकतो.

कास्ट अवे ऑन द मून - कोरियन प्रेमकथा!

दक्षिण कोरियाच्या चित्रपटांचा जगात मोठा चाहतावर्ग असला, तरी या चित्रपटांना टाळणारा वर्ग साधारणत: पूर्वग्रहांनी व्यापलेला असतो. हिंसाचार आणि रक्ताचा उघड सडा दाखविण्याचा चित्रकर्त्यांचा अट्टहास याला कारणीभूत असेल. एक मात्र खरे, की कोरियन सिनेमा केवळ हिंसा आणि रक्ताळलेले जग दाखवीत नाही. केवळ हिंसाचार असल्याच्या अपसमजामुळे दक्षिण कोरियाई सिनेमांपासून फारकत घेणाऱ्या सिनेभक्षकांना बदलण्यासाठी आज यू टय़ूबद्वारे कोरियन सिनेविद्यापीठच उपलब्ध झाले आहे. ‘कास्ट अवे ऑन द मून’ त्यांच्या केवळ अपसमजांवर उतारा ठरणारा नाही, तर या विद्यापीठाचे कायमस्वरूपी विद्यार्थी बनण्यासाठीची पूर्वपरीक्षा ठरू शकतो.

महाकाली

   महाकाली हे आदिशक्‍ती महामायेचे एक रूप असून ती परात्‍पर महाकालीची संहारक शक्‍ती आहे. आदिशक्‍तीच्‍या तमःप्रधान रौद्ररूपाला महाकाली असे म्‍हणतात. ती दुष्‍टांचा संहार करण्‍यासाठी प्रकट होते. मधु-कैटभ या दैत्‍यांचा नाश करण्‍यासाठी ती अवतरली, असा उल्‍लेख देवी भावतात आढळतो.

महालक्ष्मी

(1 प्रतिक्रीया)    महालक्ष्‍मी हे जगदंबेचे एक नामरूप. दुर्गा, महिषासूरमर्दिनी ही तिची अन्‍य नावे आहेत. ही देवी म्‍हणजे विष्‍णूपत्नी नसून शिवपत्‍नी दुर्गाच होय. भाद्रपद महिन्‍यात गणपतीच्‍या उत्‍सवाबरोबर महालक्ष्‍मीचाही उत्‍सव साजरा केला जातो. हा उत्‍सव भाद्रपद शुद्ध अष्‍टमीला सुरू होतो. त्‍या तिथीला दुर्वाष्‍टमी म्‍हणतात.

हबल दुर्बीण

   गॅलिलिओने दुर्बिणीचा शोध लावून अवकाश संशोधनास दिलेली गती ‘हबल’ दुर्बिणीच्‍या माध्‍यमातून वेगाने सुरू आहे. ‘हबल’ने मानवाला केवळ संशोधनात मदत केलेली नाही तर विश्‍वनिर्मितीपासून ब्रम्‍हांडाची अनेक रहस्‍ये भेदण्‍यापर्यंत साह्य केले आहे. गेल्‍या वीस वर्षांपासून कार्यरत असलेली दुर्बीण हा मानवासाठी अवकाशात असलेला ज्ञानवृक्षच म्‍हटला पाहिजे!

बदलाच्या दिशेने...

रेखा कालिंदी. केवळ चौदा वर्षाच्‍या या मुलीने झारखंडमधील बालविवाहाविरोधात आवाज उठवला. तिने स्‍वतःचे लग्‍न थांबवत आपल्‍या वयाच्‍या इतर मुलींच्‍या आयुष्‍यातही हाच बदल घडवून आणला. लग्‍नासंबंधीची ही मोहिम तीने शिक्षणाशी जोडली आणि तिच्‍या परिवारातल्‍या अनेक मुलींना शाळा पहायला मिळाली. रेखाला मोठे होउन शिक्षिका व्‍हायचे आहे. अंधार दूर करू पाहणा-या एका लहानशा प्रयत्‍नाची ही कहाणी...
मलाना गावाचे विहंगम दृश्‍य

एक आहे ‘मलाना’ गाव...

(3 प्रतिक्रीया)    मलाना गावात पूर्वापार काळापासून प्रजासत्‍ताक पद्धतीनं कारभार पाहिला जातो. जगातील ही सर्वात जुनी प्रजासत्‍ताक यंत्रणा समजली जाते. गावाबाहेरील सर्व व्‍यक्‍ती या गावकर्‍यांच्‍या दृष्‍टीने अस्‍पृश्‍य आहेत. गावक-यांचा आपल्‍या परंपरांवर फार विश्‍वास आहे. अनेक शतकांपासून चालत आलेली ही समाजीवनाची त-हा गावक-यांनी प्रयत्‍नपूर्वक जपलेली आहे. आधुनिकीकरणाचे वारे तेथे पोचले आहेत. त्यातून गावापुढे वेगळेच प्रश्न तयार होत आहेत. तथापी एक जुनी ग्रामसंस्कृती लयाला चालली आहे हे नक्की.  

अस्वस्थ मी...

(2 प्रतिक्रीया) लोकल ट्रेन ही मुंबईची लाईफलाइन समजली जाते. दररोज लाखो व्‍यक्‍ती ट्रेनमधून प्रवास करतात. गर्दी, गोंधळ, भांडणं, या गोष्‍टी या व्‍यवस्‍थेचे अविभाज्‍य भाग म्‍हणायला हवेत इतके लोकांच्‍या अंगवळणी पडले आहेत. मात्र हा सारा प्रवास त्‍यांच्‍या शरीरावर, मनावर आणि पर्यायाने त्‍यांच्‍या माणूसपणावरही कुठेतरी आघात करत असतो, याची त्‍यांना कल्‍पना आहे का?

फेरीवाले विरुद्ध शासन - संघर्षाची बीजे

(2 प्रतिक्रीया)      हाजी अली येथे पंपिंग स्‍टेशनजवळील अनधिकृत फेरीवाल्‍यांवर पालिकेच्‍या अतिक्रमणविरोधी पथकाने कारवाई केली. मात्र यामुळे संतप्‍त झालेल्‍या फेरीवाल्‍यांनी या पथकावर दगडफेक केली. त्यात एक अधिकारी जखमी झाला. गुंडाने पोलिस कर्मचा-यावर गोळी झाडावी, तेवढा हा प्रकार गंभीर आहे.