अंजली कुलकर्णी


संपर्क : anjalikulkarni1810@gmail.com9922072158

अंजली कुलकर्णी या पुण्‍याच्‍या कवयित्री. त्‍यांनी आतापर्यंत काव्‍यसंग्रह, ललित लेखसंग्रह, संपादीत अशी एकूण बारा पुस्‍तके लिहिली आहेत. त्‍यांनी लिहिलेले 'पोलादाला चढले पाणी' हा रशियन कादंबरीचा अनुवाद प्रसिद्ध झाला आहे. त्‍यांनी अनेक कवितांचे हिंदी आणि इंग्रजीतून अनुवाद केले आहेत. त्‍यांच्‍या लेखनाला आतापर्यंत महाराष्‍ट्र राज्‍य शासन, यशवंतराव प्रतिष्‍ठान यांसारख्‍या संस्‍थांकडून अनेक पुरस्‍कार प्राप्‍त झाले आहेत. त्‍या 'बाईंची कविता' (स्‍त्रीयांच्‍या कवितांवर आधारित), जन्‍मजान्‍हवी (स्‍वतःच्‍या कवितांवर आधारित), कवितेतील बापूजी (गांधीजींनी केलेल्‍या कवितांवर आधारित), कवितेची कार्यशाळा असे विविध कार्यक्रम सादर करतात. त्‍या 'शब्दमित्र' या पुण्‍यातील साहित्‍ि‍यक संस्‍थेच्‍या संस्‍थापक अध्‍यक्ष आहेत. अंजली कुलकर्णी बँक ऑफ इंडियात कामाला होत्‍या. तेथून निवृत्‍ती घेतल्‍यानंतर त्‍यांनी त्‍यांचा पूर्ण वेळ सामाजिक आणि साहित्यिक उपक्रमांना दिला आहे.


विश्वास येवले यांच्या ध्यासाची जलदिंडी

विश्वास येवले. पेशाने डॉक्टर. नामांकित स्त्री-रोगतज्ज्ञ. पण त्यांनी त्यांच्या बालपणापासून पाण्याशी झालेल्या मैत्रीतून, पाण्यावर असलेल्या निस्सीम भक्तीतून आळंदी ते पंढरपूर अशी जलदिंडी सुरू केली. तिला २०१६ साली पंधरा वर्षें होऊन गेली. दिंडी दर वर्षी ऑक्टोबरच्या दुसऱ्या रविवारी निघते आणि बारा दिवसांच्या जलप्रवासानंतर पंढरपूरला पोचते. त्यातून नदिस्वच्छतेच्या अभिनव उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवली गेली आहे. सकारात्मक स्वास्थ्य, पर्यावरण आणि अध्यात्म असा त्रिवेणी संगम म्हणजे येवले यांची जलदिंडी असे वर्णन करता येईल. त्यांच्या त्या उपक्रमाचे लोण महाराष्ट्रात स्थिरावले असून चक्क भारतभर पसरत आहे! अनेक गट व संस्था यांनी त्यांच्या त्यांच्या प्रदेशात नदीपात्र-स्वच्छतेचा मंत्रजागर सुरू केला आहे.

शुभांगी साळोखे - कृषी संशोधक

डॉक्टरकी, इंजिनीयरिंग, विमानसेवा, अंतराळभ्रमण, कॉम्प्युटर, आयटी... भारतीय नारी सगळ्या क्षेत्रांमध्ये स्थिरावली आहे. ती नवनवीन क्षेत्रे धुंडाळत आहे. परंतु भारत देशाचा पारंपरिक आणि सर्वात मोठा व्यवसाय म्हणून जो ओळखला जातो त्या शेतीमध्ये मात्र आधुनिक शिक्षण घेणाऱ्या स्त्रिया संख्येने कमी आहेत. खरे तर, स्त्रियाच प्रत्यक्ष शेतीमध्ये पेरणी, निंदणी, खुरपणी इत्यादी बहुतांश कामे करत असतात. परंतु आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून किफायतशीर शेती कशी करता येईल, शेतकऱ्यांच्या उत्पादनाचा दर्जा वाढवता कसा येईल याचा विचार करणाऱ्या स्त्रिया दुर्मीळ आहेत. डॉ. शुभांगी साळोखे या शेतीमध्ये संशोधन करून डॉक्टरेट मिळवणाऱ्या विदर्भामधील पहिल्या महिला आहेत. त्यांना ‘मराठाभूषण’ हा सन्मान मिळाला आहे. त्‍यांनी त्यांचे संशोधनकार्य मांजरी येथील ‘वसंतदादा पाटील शुगर इन्स्टिट्यूट’मध्ये पूर्ण केले.

सुरंजन खंडाळकर - गाणारा मुलगा

(2 प्रतिक्रीया) सुरंजन खंडाळकर याच्या घरी गाणे हॉलभर जणू भरून राहिलेले आहे. हॉलमध्ये मृदुंग, तबला, वीणा, हार्मोनियम तर शोकेसमध्ये लहानमोठी सन्मानचिन्हे आणि भिंतीवर संगीतातील दिग्गजांसह सुरंजन आणि शुभम् या भावंडांची छायाचित्रे! त्यातूनच त्या मुलांच्या भरीव वाटचालीचे दर्शन होते.

आलोक राजवाडे - प्रायोगिक नाटकातील नवा तारा!

(1 प्रतिक्रीया) आलोक राजवाडे याने वयाची तिशीही गाठलेली नाही, मात्र त्याने वैचारिक प्रगल्भतेचा मोठा पल्ला गाठला असल्याचे त्याच्या बोलण्यावरून जाणवते. आलोकचे काम त्याच्या ‘पुरुषोत्तम’ स्पर्धेतील ‘दोन शूर’ ’सारख्या एकांकिकेपासून ‘गेली एकवीस वर्षें’ या मोठ्या व महत्त्वाच्या नाटकापर्यंत नजरेत भरते. आलोक पुण्यात वाढला, मोठा झाला. त्याने त्याचे शालेय शिक्षण ‘अक्षरनंदन’’सार‘ख्या प्रयोगशील शैक्षणिक संस्थेत पूर्ण केले. त्या शाळेत त्याच्यामधील ‘’वेगळ्या’’ माणसाची बीजे रुजली गेली आहेत. तो वेळ मिळेल तेव्हा ‘अक्षरनंदन’’मध्ये शिकवण्यासही जातो.

जीवशास्त्रज्ञ माधव गाडगीळ - पर्यावरण रक्षणाचा गौरव बिंदू

(1 प्रतिक्रीया) जीवशास्त्रज्ञ माधव गाडगीळ यांनी भारताचे पर्यावरण मंत्रालय निर्माण होण्यात-घडण्यात पुढाकार घेतला. तेव्हा त्यांच्या डोक्यात होता गांधीजींचा इशारा. “सृष्टी साऱ्यांचे भरणपोषण करण्यास समर्थ आहे, मात्र ती मानवाची लालसा भागवण्यास समर्थ नाही. तिला ओरबाडून घ्याल तर निसर्गाचा तोल बिघडेल!” गाडगीळांनी गांधीजींचा तो इशारा तोच त्यांचा संदेश मानला, त्यातून गाडगीळ निसर्गप्रेमी, संस्कृतिप्रेमी बनले. त्यांनी १९६० च्या दशकात परिसरशास्त्र, निसर्गसंरक्षणशास्त्र, पर्यावरण या विषयांमध्ये देशातील धोरणकर्त्यांना जागे केले. त्यांनी सह्याद्रीच्या खोऱ्यात, रानावनात हिंडत परिसराचा आणि मानवी जीवनाचा अभ्यास केला; स्वतःला परिसरशास्त्र आणि उत्क्रांती या विषयांमध्ये झोकून दिले.

उद्योगसौदामिनी अरुणा भट

(1 प्रतिक्रीया) अरुणा अशोक भट यांना उद्योगसौदामिनीच म्हणता येईल. साधीसुधी गृहिणी ते बड्या दोन कंपन्यांची संचालक असा त्यांचा जीवन प्रवास आहे. त्या 'भट ग्रूप'च्या संचालिका म्‍हणून कार्यरत आहेत.

अरुणा सबाने – बाईमाणूस अन् बापमाणुसही!

(3 प्रतिक्रीया) अरुणा सबाने हे विदर्भातील आजचे स्त्रीनेतृत्व आहे. अरुणा सबाने या विदर्भातील दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्या. त्यांचे व्यक्तिमत्त्व अनेकपदरी आहे. संवेदनाशील लेखिका, संपादिका, प्रकाशिका आणि खंदी समाज कार्यकर्तीअशी त्यांची ओळख आहे. आकांक्षा मासिक, आकांक्षा प्रकाशन, माहेर महिला वसतिगृह, बहुजन रयत परिषद, अखिल भारतीय जलसंस्कृती मंडळ, दलित मानवाधिकार समिती, प्रगतीशील लेखक संघ अशा अनेक संस्था-संघटनांच्या माध्यमातून त्यांचे काम सुरू आहे. परंतु या सगळ्या कामाच्या तळाशी एकच एक गोष्ट आहे. ती म्हणजे अरुणा यांना स्त्रीजीवनाबद्दल वाटणारी आत्यंतिक तळमळ. त्यांच्या मनाजवळून वाहणारा मानवतेचा, सहृदयतेचा, स्त्रियांविषयी ममत्वाचा झुळझुळ झरा आहे. त्या झऱ्यापाशी दोन क्षण विसावून शांत व्हावे आणि त्या झऱ्यातील जल प्राशन करून, त्यातून चैतन्य घेऊन मार्गक्रमणा करावी असा अनुभव त्यांच्याजवळ येणाऱ्या प्रत्येकीला येतो. अरुणा हे त्यांच्या सगळ्या प्रकारच्या कामांचे आस्था केंद्र आहे.

धनंजय पारखे - चित्रकलेतील सामाजिक कार्यकर्ता

(3 प्रतिक्रीया) सोलापूर जिल्ह्यात कुर्डूवाडी येथे राहणारे धनंजय व सुनीता पारखे हे कुटूंब सर्वसामान्य जीवनात स्वत:मधील असामान्यत्व जपणारे, प्रतिकूल परिस्थितीतही त्यांच्यापुरते न पाहता आजुबाजूच्या समाजालाही कवटाळू बघणारे आहे. धनंजय अरुण पारखे यांचा जन्म 28 मे 1976 चा. कुर्डूवाडी इथला. त्‍यांच्‍या वडिलांचे नाव अरुण बाबुराव पारखे. वय चौ-याहत्तर वर्षे. ते रेल्वे वर्कशॉप, कुर्डुवाडीमधून सर्व्हिस पूर्ण करून निवृत्त झाले. आई निर्मलाबाई ही गृहिणी.

संत सावता माळी आणि त्यांची समाधी

(53 प्रतिक्रीया) संत सावता माळी यांचा जन्म सोलापूर जिल्ह्यात पंढरपूरच्या जवळ अरणभेंडी या गावात शके 1152 मध्ये झाला. त्यांच्यामुळे अरणभेंडी हे क्षेत्र झाले. अरणभेंडी येथे ज्या मळ्यात सावता माळी भाज्या पिकवता पिकवता विठ्ठलभक्ती करत, त्या मळ्यातच विठ्ठलाला पाहत. त्यांनी त्यांचा देहदेखील त्या मळ्यातच विठ्ठलाचे नाम घेत ठेवला. त्या ठिकाणी समाधिमंदिर बांधण्यात आले आहे. पंढरपूरला जाताना भक्तमंडळी आवर्जून अरणभेंडी येथे थांबतात आणि सावता महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतात. संत सावता माळी यांनी त्यांच्या अभंगांमधून आणि जगण्यामधून कर्म हाच ईश्वर हा संदेश महाराष्ट्राला दिला.

हिंदस्वराज्य परिचर्चा

 ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ आणि गांधी राष्ट्रीय स्मारक निधी यांच्या संयुक्त विद्यमाने गांधीजींच्या ‘हिंदस्वराज्य’ या पुस्तकावर 26-27 ऑक्टोबर 2013 रोजी पुण्यात गांधीभवन येथे परिचर्चा झाली. गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष कुमार सप्तर्षी हे आजारी असल्याने उपस्थित राहू शकले नाहीत परंतु निधीचे विश्वस्त अन्वर राजन आणि डॉ. उर्मिला सप्तर्षी, दोघे जण दोन्ही दिवस उपस्थित होती. परिचर्चेबाबत संयोजनाच्या सुरुवातीपासून उत्सुकता होती आणि विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक, विचारवंत स्वत: होऊन परिचर्चेविषयी विचारणा करत होते. प्रत्यक्ष परिचर्चेत दोन दिवसांत तब्बल एकशेपस्तीस जण सहभागी झाले; तरी जवळजवळ पस्तीस लोक, ज्यांनी येऊ म्हणून कळवले होते ते काही ना काही कारणाने उपस्थित राहू शकले नाहीत.

ऐसा ज्योती पुन:पुन्हा व्हावा!

  नाटककार-चित्रपटकर्ते अतुल पेठे यांनी गो. पु. देशपांडे लिखित ‘सत्यशोधक’ या नाटकाचे सद्यकालीन महत्त्व जाणून नाटकाचे पुनरुज्जीवन केले. महात्मा ज्‍योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या आचारविचारांचे आजच्या काळात अर्थ लावून पाहण्याचा या नाटकात प्रयत्न आहे. हे नाट्य म्हणजे फुले विचारांचा शोध अन् बोध आहे. पुण्यातील मनपा सफाई कामगारांनी सामाजिक जाणिवेतून या नाट्याची निर्मिती केली आहे. नाटकाचा बाज हा सत्यशोधकी जलशाचा असून, गाणी, नृत्य व नाट्य यांतून ज्‍योतिबांचा जीवनपट कलात्मकरीत्या उलगडण्याचा हा प्रयत्न आहे. सलग पावणेदोन तास चालणारा प्रयोग हा एक अर्थपूर्ण अनुभव आहे!

अवकाश निर्मिती - समाजहिताची तळमळ

(1 प्रतिक्रीया)    विज्ञान आणि तंत्रज्ञानाची ताकद, वैज्ञानिक दृष्‍टीकोन आणि समाजाचं जीवन यांतलं नातं लोकांपर्यत पोचवायचं असेल, तर शिक्षण हेच त्याचं माध्यम असलं पाहिजे हा समीर शिपूरकर यांचा आग्रह आहे. त्‍यांनी आणि त्‍यांच्‍या अवकाश निर्मिती टिमने शिक्षण केंद्रस्‍थानी ठेवून वेगवेगळ्या माहितीपटांची निर्मिती केली आहे. त्‍यांच्‍या प्रयत्‍नांचा आणि विचारांचा अंजली कुळकर्णी यांनी घेतलेला हा वेध...

अष्ट‘भुजा’ माधवी मेहेंदळे

माधवी मेहेंदळे हे पुण्याच्या सामाजिक-सांस्कृतिक जीवनात गेल्या दशकात एकदम पहिल्या रांगेत आलेले नाव. माधवी मेहेंदळे या एका व्यक्तीत अनेक माधवी मेहेंदळे वस्ती करून आहेत! वाड.मयीन सभा, सामाजिक जागृतीसाठी पथनाट्य संयोजन, त्यांच्या पेटिंगचे प्रदर्शन वा तत्संबधात लेखन.... असा त्‍यांचा विविध संचार चालू असतो. माधवी मेहेंदळे प्रसिद्ध नेत्रतज्ञ तर आहेतच; पण चित्रकार, कलावंत, लेखक, चांगल्या व्यवस्थापक आणि मुख्य म्हणजे समाजात विधायक, चांगलं काही घडून येण्यासाठी धडपडणारं कृतिप्रवण व्यक्तिमत्त्वही आहेत. सध्या त्यांनी रोटरीच्या माध्यमातून रस्तावाहतुकीसंबंधात जनजागृतीचे काम हाती घेतले आहे....

पुण्याची ग्रामदेवता – तांबडी जोगेश्वरी

(1 प्रतिक्रीया) पुण्‍याची ग्रामदैवतं म्‍हणजे कसबा गणपती आणि तांबडी जोगेश्‍वरी देवी. ही पुण्‍याची ग्रामसंरक्षक देवता समजली जाते. जोगेश्‍वरीचा उल्‍लेख पुराण आणि इतिहासातही आढळतो. ‘तांबडी जोगेश्‍वरी’ या नावाचा संबंध देवीच्‍या शेंदूराशी नसून ताम्रासूराचा वध केल्‍यामुळे तिला हे नाव पडले आहे. पुण्‍यात देवींची बत्‍तीस मंदीरे असली तरी पुण्याची ‘ग्रामदेवता’ म्हणून तांबड्या जोगेश्वरीला अग्रपूजेचा मान आहे.

कवितेचं नामशेष होत जाणं...

- ज्ञानदा देशपांडे/सदानंद डबीर/अंजली कुळकर्णी      “ज्ञानदा देशपांडेचा लेख केवळ अप्रतिम आहे! तो डोळ्यांत झणझणीत अंजन घालतो व परिस्थितीचं अचूक विश्लेषण करतो. कवितासदृश कविता लिहिली जाण्यापाठीमागचं तिचं विश्लेषण अंतर्मुख करायला लावणारं आहे. ‘कवितेसारखी कविता’ या प्रकाराची मुळं व्हर्च्युअल अस्तित्वामध्ये लपलेली आहेत याची दुखरी जाणीव ज्ञानदानं करून दिली आहे” -  कवितेबाबतचं एक विधान आणि त्यावरील दोन आभिप्राय