Member for

1 year

गणेश प्रभाकर प्रधान हे महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती होते. त्यांचा जन्म 26 ऑगस्ट 1922 साली झाला. ते समाजवादीविचारवंत, राजकारणी व मराठी भाषेमधील लेखक होते. त्यांनी 'समाजवादी कॉग्रेस पक्ष' व 'राष्ट्रसेवादला'साठी काम केले. त्यांनी 'भारत छोडो आंदोलनात'ही सक्रिय भाग घेतला. त्यामुळे त्यांना तेरा महिन्यांचा कारावास भोगावा लागला. ते आणीबाणीच्या काळात पुन्हा वर्षभर येरवड्याच्या तुरुंगात होते. त्यांनी 'महाराष्ट्राचे शिल्पकार - ना. ग. गोरे', 'साताउत्तरांची कहाणी', 'सत्याग्रही गांधीजी', 'माझी वाटचाल', 'डॉ. बाबासाहेब आंबेडकरत्यांच्याच शब्दांत' ही मराठी पुस्तके लिहिली; तसेच 'कमान्य टिळक – अ बायोग्राफी', 'इंडियाज फ़्रीडम स्ट्रगल: ऍन एपिक ऑफसॅक्रिफाइस अँड सफरिंग', 'लेटर टु टॉलस्टॉय' ही इंग्रजी पुस्तके लिहिली आहेत. त्यांना 'लोकमान्यांची राजकीय दूरदृष्टी आणि ज्ञानाचे उपासक' या पुस्तकासाठी राज्य शासनाचा वाङ्मय पुरस्कार (2009) मिळाला आहे. त्यांचे 29 मे 2010 साली निधन झाले.