Member for

2 years 6 months

अंजली कीर्तने यांनी बी. ए.ला मराठी विषय घेऊन मुंबई विद्यापीठात सर्वप्रथम क्रमांक पटकवला आहे. त्यांनी 'मोलिएरचा मराठी नाटकावरील प्रभाव' याविषयावर पि.एच.डीसाठी प्रबंध लिहिला आहे. त्यांनी महाराष्ट्र टाईम्स, लोकसत्ता, नवशक्ती, तरुण भारत, सकाळ या वृत्तपत्रातून अनेक सदरलेखन केले आहे. त्यांची प्रवासी पावलं, नोंदवही कवितेची, लिबर्टी बेल, संगिताचं सुवर्णयुग अशी अनेक सदरलेखने प्रसिद्ध आहेत. त्यांचे डॉ. आनंदीबाई जोशी(चरित्र), पाऊलखुणा लघुपटाच्या यांसारखे चरित्र, अनुभवकथा, लघुकथा, प्रवासवर्णनावर पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांनी अनेक पुस्तकांचे आणि विविध विषयांवर संपादन आणि लघुपट केले आहे. अंजली कीर्तने यांना 'दादोबा पांडुरंग तर्खडकर' सुवर्णपदक, शिष्यवृत्ती, सर्वोत्क्रृष्ट लघुपट पुरस्कार, दूरदर्शन मुंबई तर्फे मायालेकी पुरस्कार, मधुसूदन सत्पाळकर जीवनगौरव पुरस्कार असे अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

लेखकाचा दूरध्वनी

99675 16913