Member for

9 months 3 weeks

धोंडिराम दत्तात्रय पाटील हे सांगली जिल्ह्यातील बिसूर गावचे राहणारे. ते त्‍यांच्‍यावर शेती आणि माती यांचे संस्कार झाले असल्‍याचे सांंगतात. त्‍यांनी शिवाजी विद्यापीठातून बी. ए.(हिंदी) बी.जे.सी. पर्यंत शिक्षण पूर्ण केले. गारगोटीच्या कर्मवीर हिरे महाविद्यालयात बी.ए.बी.एड (स्पेशल) करत असताना त्‍यांना वाचन, लेखन आणि काव्यरचना यांचा छंद जडला. त्‍यांनी बी.ए.ची पदवी मिळवल्यानंतर त्‍यांना पत्रकारिता खुणावत राहिली. पाटील 'अंनिस' चळवळीशी संलग्‍न आहेत. त्‍यांनी गावात 'लोकजागर' मंच स्थापन करून त्याद्वारे लोकांचे प्रबोधन करण्‍याचा प्रयत्‍न केला. त्‍यांनी लेखन, भाषण, चित्रकला, रांगोळी, निबंध, खेळ, अंधश्रद्धा निर्मूलन, स्पर्धा परिक्षा यांविषयक उपक्रम राबवले. त्‍यांचे ते काम दोन दशकांहून अधिक काळ काम सुरु आहे. पाटील सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघात सक्रिय आहेत.

लेखकाचा दूरध्वनी

9922430680