रिमा राजेंद्र देसाई


संपर्क : reemadesai@gmail.com

9324134280

रिमा देसाई या ठाण्‍याच्‍या. त्‍या व्‍यवसायाने कमर्शिअल आर्टीस्‍ट आहेत. त्‍यांना ठाण्‍यातील इंग्रजी संभाषणाच्‍या क्‍लासमध्‍ये शिकवण्‍याचा पंधरा वर्षांचा अनुभव आहे. त्‍यांची मुलगी ऋग्‍वेदी देसाई हीने अंध व्‍यक्‍तींसाठी लेखनिक पुरवणारी 'आय-डॉल' नावाची संस्‍था चालवली आहे. रिमा त्या संस्‍थेत ऋग्‍वेदीच्‍या सहकारी म्‍हणून काम करतात. 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम'कडून जानेवारी २०१७ मध्‍ये आयोजित करण्‍यात आलेल्‍या 'कल्‍याण तालुका संस्‍कृतिवेध' या मोहिमेमध्‍ये त्‍यांचा सहभाग होता.


कल्याणचा वझे यांचा ‘खिडकीवडा’!

(30 प्रतिक्रीया) ‘खिडकी’ संदर्भात आलेली, लिहिलेली वर्णने खूप आहेत. त्यात काव्यरचनांचाही समावेशही आहे. जसे, की शांता शेळके यांच्या ‘खिडकीबाहेर निळे आभाळ, पाखरांचे किलबिल सूर, अर्धकच्ची तुरट स्वप्ने, क्षितिज दूर’ या ओळी किंवा सोपानदेव चौधरी  यांच्या ‘खिडकीपाशी एक मुलगी... स्वत:मध्येच गढलेली’ इत्यादी. ‘खिडकी’बाहेरील दृश्यांची ललित वर्णने तर अनेक आहेत. कथांमध्येही खिडकी डोकावते. हिचकॉकचा सिनेमा ‘रिअर विंडो’ फारच प्रसिद्ध आहे. घराचा अविभाज्य घटक म्हणजे खिडक्या आणि दरवाजे. दरवाज्याशी असणारे नाते हे आत-बाहेर येण्या-जाण्याचे, पण ‘खिडकी’पाशी मात्र मनुष्यप्राण्याचे, पशुपक्ष्यांचे, झाडावेलींचे भावनिक नाते असते. रुसूनफुगून बसण्यासाठी किंवा एखादी खास वाट बघत बसण्याची जागा म्हणजे खिडकी. ब्राँझ शिल्पकार नागेंद्रराज भंडारी यांनी तर केवळ ‘खिडकी’ हा विषय घेऊन अनेक शिल्पे तयार केली आहेत.